एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०१५

इंद्राणिच्या पाठी ...

इंद्राणिच्या पाठी, नवऱ्यांची यादी
भंगली समाधी, मारियांची

साद्य पती राजा दावतो नेणीव
नव्हती जाणीव, मागच्यांची

रोजपडे थोडा नात्यांचा उजेड
मिडियात झाड फॅमिलीचे

अनाडी राहिले ओरड करून
मिडीया, अर्नब, एनडीटिव्ही

"केश्या" म्हणे झाला देशाचा हा प्रश्न
विसरा दुष्काळ, महागाई

ओक्साबोक्शी हसावं...

ओक्साबोक्शी हसावं जीच्या पायी , अशा कविततेचे लफ़डे घेउन तू आलीस
हसलीस फक्त तुच्छतेने...
कचकन् चावा घेतलास माझ्या विडंबक असण्याचा
खिजवलंस... झुंजवलंस....हसलीस
च्यालेंजची भीती घालत माझ्याकडे
तुझी अताची पोस्ट कंपुबाजीवर, वाचतानाच फक्त हासताहेत
अताशा मी फ़िरकत नाही दिवेलागणीच्या वेळी
किंवा शोधतही नाही शब्द कुजबुजत्या समुहातले
वर वर, वर वर, वर वरच राहतो....
इथे तिथे... तिथे इथे

तुमचं ठाऊक नाही ...

आज व्यग्रतेतून थोडा वेळ मिळाला तेव्हा लक्षात आले की बरेच फुलटॉस चेंडू आपल्या हातून सुटले ...तरी हा चेंडू सोडवला नाही  ...

तुमचं ठाऊक नाही ,
पण शिक्रेटग्रूपच्या चर्चेकडे
माझे विषेशपणे लक्ष असते .
एखाद्याच्या चर्चेत बाहेरच्यांची माप काढण्याचे
प्रयत्नपूर्वक भान जेवढे जास्त जाणवते
तेवढा तो ग्रूप मला
अधिक लक्षणीय वाटू लागतो .
बहुतांश शिक्रेटग्रूप हे
बाहेरच्यांची सतत काहीतरी थट्टा करत असतात,
त्यामध्ये आपण शहाणे आहोत आणि बाहेरचा मूर्ख आहे ,
असे अंतस्थ म्हणणे गोवलेले असते .
एक साधं उदाहरण देतो
आपल्या भिंतीवर कुणीतरी येतो
आणि भिंतीवर काय असायला हवे
त्याचे उपदेश करू लागतो
जसे की ,
'' नावापुढे L लावा ''.
तेव्हा मला वाटतं की हेच म्हणणे
- नावापुढे L लावयची ही कल्पना छान आहे नाही
- मी असतो तर नावापुढे L लावले असते
अशा अनाक्रमक रचना करत सुचवता येईल की !
पण नाही ,
लोकांना अक्कल पाजळायची असते
आणि शिक्रेटग्रूप हा मानसीक रोग आहे
हे बहुतेकांच्या गावी देखील नसतं .
व्देषभावनेतून एखाद्या व्यक्तीविषयी
-फार काय आसपासच्या समाजाविषयी-
काहीबाही सुचणे ही सहज प्रवृत्तीच असते …
प्रश्न आहे तो आपले म्हणणे कसे
आणि कोणत्या चर्चेत सांगावे ह्याचा
जेणेकरून चोरूनवाचणाऱ्याला ते
आक्रमक / लादल्यासारखे वाटणार नाही .
सुचल्यानंतर ओपन ग्रुपवर किंवा आपल्या भिंतीवर मांडले तर
कटू वाटणारी गोष्ट देखील सांगता येते
This is nonsense असे म्हणण्या ऐवजी
Thank you for not making sense
असे जोडलेल्या हातांची दृक - जोड देऊन
सांगण्यासारखे सोपे आहे ते !
मात्र त्यासाठी इथल्या शिक्रेटग्रूपवर
सतत लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे असते .
आणि तरीही बाहेरच्याला
ते दर वेळी कळतेच असे नाही.
मुद्दा भान असण्याचा आहे ,

आधुनिकोत्तर साहित्यातील पहिलं पाउल...

आमची प्रेरणा Patilशेठची अफलातून कविताhttps://www.facebook.com/groups/576341029120570/permalink/768804886540849/ वाचून आम्हाला काही आधुनिकोत्तर लेखकू आठवले...

आधुनिकोत्तर साहित्यातील पहिलं पाउल...
..................................
संपादकांच्या गंडी चाटून
ठरवला जाणारा प्रस्थापित लेखक
सोबत प्रलोभनाची सुरनळी

चाकोरीबद्धतेची पाटी
साहित्यमुल्याच्या डोइवर
भादरलेला
प्रतीकात्मक संताप

व्यामिश्र निष्ठेचे जानवे
सोयिस्कर सव्य-अपसव्य
आणि आपद्धर्मात
खुंटीला...

संध्यानंद !
संध्यानंद !!
संध्यानंद !!!

- केश्या

कोणा कशी कळावी, कंपुत काय खोडी...

आमची प्रेरणा गेले काही दिवसातील घडामोडी आणि राजा बढे यांचे कुमार गंधर्व यांनी गायलेलं सुरेख गाणे "कोणा कशी कळावी..."
http://www.aathavanitli-gani.com/Song/Kona_Kashi_Kalavi

कोणा कशी कळावी, कंपुत काय खोडी
शिक्रेटग्रुपची ती असते अवीट गोडी

शोधून दांभिकांना
अचरट स्टेटसांना
भरवीत चर्चिलांची ही करमणूक थोडी

फेबुवरी फिरावे
टिंगल करित जावे
हासोनि चाललेली कंपुत छेडछाडी

दिसती अजाण साने
परि हे फितूर होणे
इथल्या प्रतिक्रियांची करतात ते चहाडी

पोचलेल्या बाबाची ही कहाणी तुम्हाला !...

"वा! सुंदर! " अस म्हटलं ग कोणी
वयस्कर माणसाची चळलेली वाणी
लंपट वाटतो जर तरुण असेल
कस ही बोललं तरी पुरुष फसेल
समजले आहे कटू सत्य ग हे मला
भीती माझी अशी कशी सांगावी मी तिला
कालौघात मध्ये नको कोमेजून जाऊ
स्टेटस टाकून सल्ला फेसाबुकी घेऊ
सांगायाची आहे कधीपासून ही मला...
पोचलेल्या बाबाची ही कहाणी तुम्हाला !

जेव्हा पाळी आलीये ...

प्रत्येकरात्री बायकोस उद्देशून एक स्वगत - भारतीय नवरे

जेव्हा पाळी आलीये
तेव्हाच पाळी आलीय म्हणून सांग
रक्त विस्कटलेलं नसताना
फक्त पॅडला फसण्याइतपत
मी नाहीये मूर्ख का बच्चा
अंग दुखत असेल तरच
अंग दुखतं म्हणून सांग
सर्वांगानं मी भरून आलोय म्हणून
हाडे थिजवत मला घडऊ नकोस देहउपास
दोन दिवसांच्या खाण्याने अजिर्ण्याइतका
मी नाही अद्याप संभोगोत्तम तृप्त
तुझ्या देहाचा रेडियो चोवीस तास भजन लावतो
हे खरंय
पण याचा अर्थ
मी जेव्हा- तेव्हा माळकरी असतो असे नाही
प्रामणिक रहा
मोकळेपणाने स्पष्ट काय वाटतं ते सांग
मी कम्युनिकेशनमध्ये पक्का आहे
संकेतशास्त्राची एबीसीडी मला अवगत आहे
तेव्हा जे काळजात आहे
ते थेट माझ्या काळजात ओत
मूड नसेल तरच मूड नाही म्हणून सांग
प्रत्येक रात्रीचे तेच काय घेऊन बसलीयेस ?
शिष्टाचार साजरा करण्यात कसलं आलंय सुख
एक आहे
पाठ करून झोपून जा
माझ्या मिठीत उशी
लाइट ऑफ कर
झोपेत ती माझी
आणि मग स्वप्नात...........