एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०१०

कटोरी

आमची प्रेरणा : मिपावरची अनेक बुडीत खाती , त्यांना मिळालेले उदंड प्रतिसाद आणि प्रदीप कुलकर्णींची अप्रतिम गझल "फांदी".


........................................
कटोरी
........................................

ही जरा घटना तशी आहे अघोरी!
मालकाने आपली भरली तिजोरी!

नाव खादाडी असे हे ठेवलेले...
सोबतीला टंच अन आहेत पोरी!

लोक सामोरे कसे एकेक आले...
समजता हाती अता उरली कटोरी!

बात फाट्यांची तशी ही ओळखीची...
आमचे तू बांधले बिस्तर नि बोरी!

जर तुझ्या केलेच होते धन हवाली...
का तरी केलीस लेका सांग चोरी?

वाचली कर्मे तुझी एकेक जेव्हा...
गाठली होतीस तू सगळीच गोरी!

आयडीबाहेर काढा ठेवणीतिल...
हा अता तुमचा लढा; ही बंडखोरी!

आयडी भलतेच बघ चमकून गेले
ओकले त्यांनी गरळ समजून मोरी

लोक या धाग्यास कंटाळून गेले...
"केशवा" तू बंद कर लिहिणे टपोरी

- केशवसुमार

........................................
रचनाकाल १४ मे २०१०
........................................

दिसू लागले स्पष्ट जसे हे

आमची प्रेरणा चित्त यांची नित्तांत सुंदर गझल दिसू लागले स्पष्ट जेवढे आणि मिपावरच्या गेल्या काही दिवसातील घटना

दिसू लागले स्पष्ट जसे हे पैसे सगळे धूसर झाले
सर्व निवासी परदेशी मग एक एक दृग्गोचर झाले

चुकली त्याची वाट म्हणूनच कमावलेले नाव गमवले
तोवर होता उशीर झाला आणिक मग हस्तांतर झाले

संपादक झाल्यावर शिकला विनायास प्रतिसाद खरडणे
अधी बरा तो लेखक होता, त्याचे माकड नंतर झाले

वाचन करता-करता इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला
शरदिनितैंची पाटी फुटली अन् त्यांचे भडकमकर झाले

पवार थत्ते धाग्यामध्ये इतिहासाचा चोथा कुटला
जितके जितके वादळ उठले शांत कुठे सावरकर झाले

नाना, टार्‍या, बेला, पंगा, मिभो, शुचि, शिल्पा ब वगैरे...
पुर्ण वाट धाग्याची निश्चित , कैच्या कैच अवांतर झाले

आज अचानक धागे उडले, अन रोषाची रेघ उमटली
सहमतले संपादक काही , हे भलते वेषांतर झाले

जुन्या जाणत्या कंपुमधले मला आयडी काल म्हणाले,
"तिथे अता ते लपून जाती ज्या जाली ते बेघर झाले"

तिला बघितले आणि एकटक, अधाशा'परी' बघत राहिलो
मुखपृष्ठावरचे मग खाणे चवीहूनही सुंदर झाले !

(किमया)

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम गझल किमया

एक पेग आता भर माझा  उदकाने!
मजा न आली  पिल्यावरती"खडका़"ने!

आज पहाटे स्वप्न तरी काय पडावे...
चिकन सूप मागावे एका बदकाने!

लगेच "केश्या"लाग बघू  विडंबनाला...
बदल जरा वेलांट्या, मात्रा अन काने!!

लयीत एका शांतपणे घोरत असता...
का उठवले, फेकून मज तू तबकाने?

बघा कशी ही येते चव विडंबनाला...
बाप, बाटली अन बाई या  घटकाने!

दोघींमधला फरक मला तर कळला ना...
फरक मला ना पडतो पण त्या  फरकाने!

जरी म्हणालो पडल्याने सुजली टेरी
खरे 'हिने' केली किमया ही कळकाने!

- केशवसुमार

मूळ

आज बरेच वेळाने मिपावर आलो आणि बघतो तर काय विडंबनाचा पाऊस... सगळी विडंबने वाचता वाचता एका स्थळावर आमचा मूळापासून केलेला बंदोबस्त आठवला

प्रतिसादाला प्रतिसाद
देत आम्ही खेचायचो
तो एका मुद्यावर पाय ठेवायचा अन्
मी दुस-या मुद्यावर पाय ठेवायचो

काड्या करत
खरडत असतांना 'जीबोल'त असतांना
सहज जालावरचा टिआरपी ही संभाळायचो
एकमेकांना हलकेच व्यनितुन सांगायचो

संपादकांनी कंटाळून
कधीतरी त्याचा आयडि बंद केला
मी मात्र अजून आहे त्याच स्थळावर
नसबंदी केल्यासारखा वाचनमात्र... धागा टु धागा.

एका स्थळात लिहिली, जी धोरणे अनेक

केसुरंगाशेठांचे विडंबन झळकले तेव्हा आम्ही चौपाटीवर भेळ खाण्यास गेलो होतो.. तिथे काही जालकंटकांची एक टोळि ही आली होती.. त्याच्या म्होरक्या मोठमोठ्याने जे काही बडबड होता, ते तुमच्या कानावर घालावे असे वाटले म्हणून हा धागाप्रपंच..

एका स्थळात लिहिली, जी धोरणे अनेक
शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही लोक

आधी विचारलेले, अपुल्या मतास सांगा
चर्चेस लोक तुम्ही म्हणता कशास दंगा?
अन पाहुनि अम्हाला, चेकाळती अनेक
शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही लोक

पाध्यास खाज भारी, नडतो सदा अम्हासी
पंचास काय बोलू, बोलू अता कुणाशी ?
चौपाटीच्या वरी हा , दावी उगाच धाक
शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही लोक

पंचास काय ऐसे एके दिनी कळाले ?
शंका विचारणारे, फटक्यामधे उडाले !!
प्रतिसाद आणि धागे त्या चौकशा अनेक
होते खरे तरी ते टिकले इथे क्षणैक

-केशवसुमार

हळूहळू हा तापच झाले संपादन...

काल आम्ही संपाकांची वेदना विडंबनातून मांडली आणि ती वाचून एक श्री.रा.रा.जालकंटक आमच्याकडे तक्रार घेउन आले की तुम्ही फक्त संपादकांचीच बाजू मांडता आम्हाला पण आमची बाजू आहे आणि ती ही तुम्ही मांडली पाहिजे.. म्हटलं बरं बाबा सांग तुझी बाजू..

हळूहळू हा तापच झाले संपादन
वाचनमात्र रहावे आता कन्क्लूजन

येतो कंपू 'तो' जसा जसा हा जाली
वेगाने प्रतिसादांचे होते कर्तन.

जीव घेतला त्यांनी सगळ्या धाग्यांचा
फक्त मीच करतो नियमांचे उलंघन?

हेडफोन लावुन कानी, मी शांतपणे-
अवांतराचे रोज अता करतो टंकन.

उगाच पण हे निळे काळे झाले पाध्ये
चौपाटी जणू घेतले त्यांचे चुंबन

ड्रूपल सहा हे काय मला अधी सांगा ..
नंतर सांगा काय चालले संशोधन...

कधीच ना हा सुधारेल "केश्या" मेला
सुरूच राहिल जालावर कविता मुंडन

धागा काढलाया बयेन धागा काढलाया

समस्त मिपाकरांना दिवाळीच्या हर्दिक शुभेच्छा!!
ध्वनी आणि हवा प्रदुषण टाळण्या साठी आम्ही ह्या दिवाळित साहित्यिक फटाके उडवायचे ठरवले आहे..
दिवाळीच्या पुर्व संध्येला हा आमचा एक फुसका बार..

आमची प्रेरणा


धागा काढलाया बयेन धागा काढलाया
डोकं उठलंया म्हणते मनातलं लिवलया

काय सांगावी ही बडबड, सार्‍या जालाची परवड
धागं निघती धडाधड, बया झालीया डोईजड
वाचक घावलंया मिपाचं वाचक घावलंया
डोकं उठलंया म्हणते मनातलं लिवलया

मन नाही हिचं स्थिर, हिला राहीला ना धीर
ही डो़क्यावर वाटते मिरं, हिची सुरुच ती पिरपिर
भूतानं घेरलंया हिला भूतानं घेरलंया
डोकं उठलंया म्हणते मनातलं लिवलया

हिला समजना साध कसं, अधी लिहवं कशाला असं
जानं आपलच होई हसं, लोक सोलून काढती पिसं
वारं भरलंया अंगात वारं भरलंया
डोकं उठलंया म्हणते मनातलं लिवलया

नवानवाच बकरा घावी, ह्यो लगेच हिस्का दावी
सारं करून नाही गावी सांगे 'केसु' ह्यो अनुभवी
पाणी पिलंया बुधवारच पाणी पिलंया
डोकं उठलंया म्हणते मनातलं लिवलया

वंगाळ लिवलया "केश्या"चे डोकं फिरलंया
वंगाळ लिवलया "केश्या"चे डोकं फिरलंया
डोकं फिरलंया "केश्या"चे डोकं फिरलंया
डोकं फिरलंया "केश्या"चे डोकं फिरलंया

कोणत्या मापात मी पेला भरू?

आमची प्रेरणा चित्त यांची अप्रतिम गझल कोणत्या चिमटीत मी त्याला धरू

कोणत्या मापात मी पेला भरू?
आमचे होईल मग फुलपाखरू

आमची होणार वाताहत अता
लागली दारू जशी ही ओसरू

रोज मी तेव्हाच गुत्ता सोडतो
लागता ती बारबाला आवरू

सोडती घरला बरोबर सोबती
लागते अमुचे जसे माथे फिरू

लडखडाया लागला पाया किती!
बिल भरू ? की हा अधी गल्ला धरू ?

प्यायली इतकी अता मग मी कसे
प्यायलो नक्की किती पेले स्मरू?

---------कलम १ -----------------

खूप नक्षीदार आहे बाटली
ही उद्या पाण्यास आता वापरू

पेग भरण्या वेळ दवडाया नको
बाटली उघडू, तिचे पेले करू

बायकोने  नेत्र आहे रोखले
(सांग मी पुढचा कसा पेला भरू?)

ही विदेशी आणि देशी  हातभट्टी
बोल "केश्या" ही भरू की ती भरू

१. देशी किंवा विदेशी मदिरेत बेवड्याला जेव्हा झिंगायचे असते (चार किंवा त्यापेक्षा जास्त पेग) , तेव्हा त्या पेगाच्या वर किंवा मध्ये किंवा दोन क्वार्टरच्या नंतर तिथे  हाफ़ असे मोजून पुढील पेये  ही एकत्रितपणे ओतावीत, असा बेवडांचा निर्देश असतो. मराठी विडंबनात ही पद्धत राबवायची असल्यास मला कलम हा शब्द किंवा क हे अक्षर मला प्रस्तुत वाटते. कलम ह्या शब्दाचा एक अर्थ तुकडा करणे किंवा पाडणे. आणि दुसरा अर्थ दोन वस्तू मिसळणे असाही आहे.   (ह्याबाबतीत मार्गदर्शन केल्याबद्दल मी उर्दू-फारशीचे माझे जाणकार मित्र श्री. चित्त ह्यांचा अत्यंत आभारी आहे. )


कोणत्या शब्दात दम त्याला भरू ?

आमची प्रेरणा पुन्हा एकदा चित्त यांची अप्रतिम गझल कोणत्या चिमटीत मी त्याला धरू आणि काही खरडवह्या ;;)

कोणत्या शब्दात दम त्याला भरू ?
माजले जालात जे फुलपाखरू

तू अता बघशील वाताहत खरी
लागले पाध्ये जसे हे अवतरू

पंचही तेव्हाच खाते कापतो
लागले उधळायला जर शिंगरू

पटवती सार्‍या पुरातन ओळखी
बघ पुन्हा आले जुने माथेफिरू !

फुरफुराया लागले धागे किती !
लागले कंपू पुन्हा कल्ला करू

आठवू इतके कसे मी आयडी ?
आठवू कोणास, कोणा विस्मरू ?

---------कलम १ -----------------

खूप नक्षीदार आहे लेख हा
एकमेकांना चला वाव्वा करू

आपल्या दोघांमधे कोणी नको
ये खरड टाकू जरा व्यनी करू

हा मला पाध्ये किती छळातो इथे
सांग मी आता कशा काड्या करू ?

काव्य, चर्चा, कौल, धागे, वा फिफा
(हे करू की ते करू की ते करू)


--------------------------------------------------------------------------------

१. मराठी संकेतस्थळांवर प्रतिसादकाला एखादा धागा भरकटवायचा असेल (एक किंवा त्यापेक्षा जास्त ) तर तेव्हा त्या धाग्यावर किंवा मध्ये किंवा दोन प्रतिसादांच्या मधल्या मोकळ्या जागेत तिथे +१ हे चिन्ह ठेवून खाली निर्धास्तपणे गप्पा चालू कराव्यात, असा प्रतिसादक निर्देश करतो. मराठी विडंबनात ही पद्धत राबवायची असल्यास मला कलम हा शब्द किंवा क हे अक्षर मला प्रस्तुत वाटते. कलम ह्या शब्दाचा एक अर्थ तुकडा करणे किंवा पाडणे. आणि दुसरा अर्थ ग्राफ्टिंग असाही आहे. (ह्याबाबतीत मार्गदर्शन केल्याबद्दल मी उर्दू-फारशीचे माझे जाणकार मित्र चित्त ह्यांचा अत्यंत आभारी आहे. )

कंटकांचे मनोगत

निवेदनः कंटकांच्या कारवायांबाबत नाराजी व्यक्त करून वातावरण सुधारण्याचा प्रयत्न केल्याचे प्रायश्चित्त म्हणून काही दिवस स्वसंयमाची रजा घ्यायचे ठरवले आहे. त्यामुळे गढुळलेले वातावरण निवळेल असे वाटते.

परंतु दुसर्‍या बाजूकडून अपेक्षित असलेला संयम दिसत नाही. आणि मुद्दाम खाजवून काढल्याप्रमाणे धागा आला. (आणि तो उडाला नाही). म्हणून प्रायश्चित्त घेण्या आधी लेखन करीत घेतो. तो धागा उडाला नसल्याने हा ही उडणार नाही अशी अपेक्षा आहे.

अजून एक: विडंबन या लेखनप्रकारात माझा पहिलाच प्रयत्न नाही. तरीही यातल्या व्हेटरन्सनी सांभाळून घ्यावे ही विनंती.

कंटकांचे मनोगत


कोणती युक्ती अता मी वापरू |
शांतता लागो न येथे वावरू ||

जाहले निर्माण नव येथे जरी |
पालथे धंदे तरी अमचे सूरू ||

मूळ कारण आणिबाणी, हेच आहे |
प्रायश्चिता पूर्ण मी कैसे करू ||

ठोक हा पाध्या जरी देतो अम्हा |
काव्य पाडू सहज त्याला उत्तरू ||

मीच तो "तो साळसुद" मी सांगतो |
चांदणे चोरा मनी हो रूबरू ||

आमच्या कंपूस काही लाज नाही |
कंटकाची जात अमची "क्या करूं?" ||

चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !

आमची प्रेरणा गेले १-२ दिवसातले सैपाकाचे धागे आणि संदिप खरे यांची अप्रतिम कविता चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

जरा चुकीचे, जरा बरोबर खर्डू काही !
चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !

नव्या-नव्यां ह्या किती आयडी बघ धाग्यातुन -
आजच आहे आला म्हणतो खर्डू काही
चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !

हवेहवेसे 'शतक' तुला जर हवेच आहे
नकोनकोते हलके चावट खर्डू काही
चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !

उगाच वळसे प्रतिसादांचे देत रहा तू
उडले नाहीत धागे तोवर खर्डू काही
चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !

तुफान पाहुन धाग्यावर कडकडल्या थोड्या
लाज निघू दे त्याची ऐसे खर्डू काही
चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !

शब्द असू दे हातामध्ये शस्त्र म्हणुनी
आज "केशवा" थोडे परखड खर्डू काही
चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !

हा आयटिच्या सर्व मुलांचा दोष असावा

आमची प्रेरणा हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा

हा आयटिच्या सर्व मुलांचा दोष असावा
सैपाकाचा वर्थ कसा त्यांना उमजावा

कधीतरी भेंडीची भाजी मला जमावी
कधीतरी मज भात मसालेही समजावा

घर-ऑफिस ह्या दोन मितीच्या प्रतलामध्ये
सैपाकाचा वेळ कसा सांगा बसवावा

युगे बदलली काळ बदलला किती बघा हा
पतीपत्नी संवाद ट्विटरनेच घडावा

करू कशाला घरी परतल्यावर मी कामे
पती कामसू आणिक सुग्रण मज लाभावा

उगाच चर्चा तू तेव्हा केली तायांशी
राग तुझ्यावर घरातला सगळा काढावा

अता तरी संपावी इतिहासाची चर्चा
धाग्यांमधला लोकांचा दंगा थांबावा

अजून किती मी घासू "केसु" गुर्जी सांगा
कसा लेख शतकी एखादा मी खरडावा

हा दारूच्या 'फुल'पात्रांचा दोष असावा

आमची प्रेरणा पुन्हा एकदा हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा

हा दारूच्या 'फुल'पात्रांचा दोष असावा
पेगलिपीचा अर्थ कसा कोणा समजावा

कधीतरी दारूची भाषा तिला कळावी
कधीतरी मज पेग तिने ही मग मागावा

ग्लास-क्वार्टर ह्या दोन्हीही मापामध्ये
पीण्याचा सारांश कसा सांगा बसवावा

किती पेग मी पिऊन झाले तरी न मजला
कधीच हा तळ या पिंपाचा ना लागावा

उगाच चर्चा पील्यावर केली माझ्याशी
चुकले माझे अखेर हा निष्कर्ष निघावा

उद्या सकाळी उतार्‍यास ही घ्यावी थोडी
मेंदूमधला मुंग्यांचा दंगा थांबावा

आज गटारी मुहुर्त उत्तम आहे "केश्या"
एक आयडीया, घरीच गुत्ता उघडावा

कशे कावळे येती

सध्या मिपावरचे धागे कावळ्यांनी शुचिर्भूत झालेत, त्यामुळे आमच्याही डोक्यात कवकवाट सुरु झाली आणि आम्ही एका अप्रतिम गाण्याचे श्राध्द घालून बसलो..

कशे कावळे येती आणिक पिंड शीवूनी जाती
पंध्रवड्याची अंगत पंगत पितरांसंगे खाती

साप काल मज स्वप्नी दिसला
फणा काढुनी उभा राहिला
जरा दचकुन जाय उठोनी काळोखाच्या राती

सकाळ होता मिपा उघडले
मुखपृष्ठावर काक पाहिले
कळली नंतर जलावरती मज पितरांची महती

लगे एक मी भटजी धरला
शीधा दक्षीणे त्याला पुजला
उध्दरली मंत्रांनी त्यांने तीन पिढ्यांची नाती

अनुभव तुमचा सांगा मजला
ह्यासाठी मी धागा रचीला
फुटकळ धागे काढत फिरतो अशीच माझी ख्याती

अमुच्यावरच्या धाग्यासंगे युद्ध आमुचे सरू

आमच प्रेरणा: ओळखा बघू

अमुच्यावरच्या धाग्यासंगे युद्ध आमुचे सरू
टंकू आणिक मरू

पकतिल प्रेक्षक, पको नागरिक
पकतिल महिला, पकतिल वाचक
विडंबने पण करू, टंकू आणिक मरू

लेख आमुचा आढाव्याचा, स्वप्नामधल्या संदेशाचा
अट्टहास हा सुरू, टंकू आणिक मरू

विडंबनाला लगेच उत्तर, वेळ न देऊ आम्ही क्षणभर
पुरून त्यांना उरू, टंकू आणिक मरू

हानी होवो कितीही भयंकर, प्रतिसादांचे चालो संगर
अंती विजयी ठरू, टंकू आणिक मरू

काम करी दाम येड्या काम करी दाम रे

नेहमी प्रमाणे आम्ही संगीत तबकडी सुरु केली आणि मिपा वाचायला सुरुवात केली... पराशेठचा खुषखबरी धागा वाचून संपायला आणि तबकडीवर खेबुडकरांचे दाम करी काम येड्या लागयला एकच गाठ पडली आणि आम्हाला तबकडीतून भलतेच बोल ऐकू येउ लागले

बारा डोळ्यांनी धागं सारी वाचकजन बगतो
प्रतिसादावर माणूस मरतो प्रतिसादावर जगतो

प्रतिसादाला पैसं मागतो 'परा'स नाही काम रे
काम करी दाम येड्या काम करी दाम रे

टिआरपीची जादू लई न्यारी, सार्‍या जालाला त्याची हाव
काम सोडून लिवतय लेख, प्रतिसादा मागूनी धाव
जल्मापासून सारी माणसं ह्या रोगाची गुलाम रे

कुनी टुकार कौलेबाज कुनी कुनी टंके पांचट फुटका
चांडाळ चौकडी जमवी कुनी रमवी जिव दो घटका
शंभर अकडा नक्की ठरला, सोडला त्यानं लगाम रे

ह्या वाव्वा बाडिस पाई, कुनी भंपक लावी जीव
कुनी खरडी निरोप धाडी, कुनी बदलून टाकी नाव
बगलंमंदी सुरी दुधारी, मुखी मैत्रीचं नाम रे

अचरटावानी लेखनी, धाग्याच्या गळ्याला फास
टंकल्यालं लगीच उडवितं. लेखाच होतय फसं
वाचक मेलं शरमंदीनं, वाचन होई हराम रे

पानावर पुढच्या जाती, हे धागं टाकोटाक
प्रोत्साहन मंडळ निघते, पॅकेज काढल झाक
शेड्युल ठरवून प्रतिसादाच,अता करावा अराम रे

वाढेल टिआरपी आता छनछन्नुक तालावरती
पैशानं नवोदित खुस, पैशानं ज्येष्ठ बी खुलती
प्रतिसादांच्या बादशहाला, "केश्या" करतो सलाम रे

हडळ जागी भूत जागे

आमच्या संगीत तबकडीवर खेबूडकरांचे चंद्र आहे साक्षिला वाजत होते आणि आम्ही मिपावर प्रियालीताईंचे भयंकर, भेसूर आणि अमानवी काव्य वाचायला सुरवात केली .. आणि पान जागे फूल जागे च्या ऐवजी भलतेच काही गुणगुणायला लागलो..

हडळ जागी भूत जागे, खविस सुद्धा जागला,
प्रेत आहे साक्षिला, प्रेत आहे साक्षिला

लाकडांचा गंध आला, पौर्णिमेच्या रात्रिला,
प्रेत आहे साक्षिला, प्रेत आहे साक्षिला!

कफन हे रेशमी, सुतळकाथ्या बोचतो
सूर हा, ताल हा, धूप थोडा लावतो
तेरड्यांच्या या फुलांनी, देह आहे झाकिला!

कावरा, बावरा, हा कुणाचा आतमा
अंग ना सोडिसी, हो जीवाचा खातमा
आज मुक्तीच्या भयाने, देह त्याचा कंपिला!

सल्ल्यासाठी विजूभाऊनी, इथ फोडिला टाहो,

सल्ल्यासाठी विजूभाऊनी, इथ फोडिला टाहो,
प्रतिसादातून पडती लाथा, श्रोते ऐका हो !

त्याच्या धाग्याचीच वाट आज लावली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

गंगेवानी निर्मळ होतं, असं पुण्य गाव
सुखी समाधानी होतं, रंक आणि राव
त्याची गुणगौरवानं किर्ती वाढली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

अशा गावि आला एक चालू जालवंत
महाचालू म्हणती त्याला, कुणी म्हणे चंट
त्याला पुण्यामंन्दी नोकरी हि लागली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

स्वस्त घरासाठी त्यांन शोधाशोध केली
हवेशीर कोठी एक पाहण्यात आली
पण अट मालकानं, अशी घातली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

फॅमिलीस आणा अधी असा हट्ट केला
घरासाठी विजूभाऊ त्या पार येडा झाला
त्यांनी लाज भीड निती सारी सोडली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

करारस गेला तेव्हा, त्याने केला डाव
मैत्रिणीस करूनी पत्नी सांगितले नाव
त्यानं लबाडीने वेळ होती मारली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

खुळ्यास त्या कळला नाही, नियतिचा खेळ
मैत्रिणीच्या नवर्‍यानेच पुढे केला घोळ
त्याने घरमालकाची कामं घेतली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

योगायोग पाहा तरी कसा अता झाला
कामासाठी मालक त्याच्या ऑफिसात गेला
तिथे मैत्रीण त्याला ह्याची भेटली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

क्षणामध्ये ओळखले त्याने फसगत झाली
सत्य शोधणास त्यांने खेळी एक केली
त्याने दोघींना त्या अवतान धाडली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

सुटण्यास लफड्यातून ह्या, ह्याने केला डाव
सल्ल्या साठी मिपावरती घेतली ही धाव
त्याच्या लेंग्याची अयती नाडी घावली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

मार बायकोला खोट्या, खरीस तू आण
किंवा त्याचा पापा घे तू गालावरी छाण
अश्या सल्ल्याची ही रांग बघा लागली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

याची देही याची डोळा पाहिले मरण
वाचकांनी देउन सल्ले रचिले सरण
त्यांचा कर्मसोहळ्याची यात्रा चालली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

मीपावरती मी पितरांचा कौल काढला नवा

काल रात्री घासूगुर्जीचा स्वप्नांचा कौल आणि आमच्या कशे कावळे येती आणिक...या विडंबनाला शुचितैनि दिलेला प्रतिसाद वाचून झोपलो, पण नेहमी सारखी गाढ झोप काही येईना, मध्यरात्री गदिमांचा मोर आमच्या स्वप्नात नाचू लागला आणि आम्ही झोपेतच गाण म्हणायला सुरुवात केली

मीपावरती मी पितरांचा कौल काढला नवा
बाई मला प्रतिसाद ठासू हवा

टाकला सैलसर सवाल धाग्यावरी
घावला अतरंगी बकरा ग त्यावरी
मोकळे करा या मनास जालावरी
पितरं आली कितीदा स्वप्नी मोजून हळू टंकवा

त्या विडंबनातील अंजन लई झोंबते
क्युरीऑसीटी कुठे पण माझी थांबते
फिरफिरुनी फुटकळ धागे मी काढते
सार्‍या जाली प्रसिद्ध झाला पितरांचा चांदवा

बघ चीज कराया येतील गुर्जी ते
किती हुषार, त्यांच्या गुणास मी जाणते
पहा कौला त्यांच्या नगरी वाखाणते
अक्कल नाही , तुला जरा ही कळते हे "केशवा"