एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१३

देऊ मी किती, कश्या, शिव्या, तुला ?



काल दिवसभर आमच्या मित्र यादीतील बऱ्याच भिंतीवर शिव्या द्याव्यात नाही द्याव्यात, कश्या द्याव्यात कुठे द्याव्यात , शिव्यांचे फायदे तोटे असा बराच ओहापोह सुरू होता...चर्चेत नेहमीच्या आयुष्यात न दिसणारी स्त्री पुरुष समानतेचा आलेला अनुभव धक्कादायक असला तरी नक्कीच स्वागतार्ह होता... ह्या दर ४-५ महिन्यांनी डोके वर काढणाऱ्या चर्चेने आमच्या डोक्याची मंडई केली ..आणि नेहमी प्रमाणे आम्ही एका चांगल्या गाण्याचे श्राद्ध घातलं (तो कसला पंधरवडा सुरू आहे न ;) )

http://www.aathavanitli-gani.com/Song/Shodhu_Mi_Kuthe_Kashi

देऊ मी किती, कश्या, शिव्या, तुला ?
ज्याची ना येइल लाज ही तुजला !

देई कुणी ते अपशब्द इथे गं
छळते का सांग तुला !
नयनी ते दृश्य सारे दिसते रे
डसते जे आत मला !
मेंदूचा हा घोळ न कळे मजला !

ओळखीची खूण लगे पटते गं
बघ शिवी देत खरी
मैतरीतल हे अंतर मिटते गं
उमटे हे प्रेम उरी
येती उपयोगि शिव्या अशा मजला !

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१३

सर समुहात नाही, सर नाही उठाठेवी ...



Waghmareशेठ च्या उठठेवरील एका पोस्ट वर कॉमेंट लिहिताना Prabhudesaiशेठ ह्या अज्ञानी बालकाच्या हातून अजाणतेपणी खूप मोठ्ठ प्रमाद घडला आहे.. ह्या अज्ञ बालकाला सर माफ करतीलच ..पण त्याच्या हातून परत अशी चूक होऊ नये म्हणून हा सर्व काव्य प्रपंच...

सर समुहात नाही, सर नाही उठाठेवी
विकी चोरुन लिहिल , अशी सरांची पुण्याई

सर आंतरजाली कोंदे, सर सर्व विषयी नांदे
सर आभासी वावरी, सर आहे चराचरी
सर शोधूनिया पाही, सर फेक आय्डीच्या ठायी

सर भिंतीत ना मावे, ब्लॉगविश्वात ना दावे
सर आपणात आहे, डोळे उघडोनिया पाहे
तुझ्या-माझ्या सर्व चर्ची सर भरूनिया राही

सर स्वये इतिहास , सर 'अगाध' अनंत
सर स्वगुण, बहुगुण, सर शैवाचे तारण
काळ येई, काळ जाई, सर आहे तैसा राही

निघालो आज तिकडच्या घरी...

परवा एका अति प्रसिद्ध दूरचित्रवाणी वाहिनीवर एका अतीच प्रसिद्ध व्यक्तीची मुलाखत बघण्याचे आणि त्यावर स्वतःचे मत लोकांच्या भिंतीवर/समूहात मांडायचे महान पाप आमच्या हातून झाले. त्या पापाचा विसर पडावा म्हणून आम्ही नेहमीप्रमाणे जाल संगीताला शरण गेलो. बाळ कोल्हटकरांचे 'निघाले आज तिकडच्या घरी' गाणे कानात वाजायला लागले आणि आम्ही भलतंच गाण गुणगुणू लागलो ...
(ह्या गाण्यातील सर्व व्यक्ती/व्यक्तींची नावे व प्रसंग काल्पनिक आहेत ;) . प्रत्यक्षातल्या कुठल्याही व्यक्तीशी अगर प्रसंगांशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा :P )


निघालो आज तिकडच्या घरी

ऐकताच हे खुशीत येईल आज 'विदेशी बाई'
जगा लाडका लेखक मी हे घरकुल सोडुनि जाई
तव 'माये'चा 'हात' मागतो 'अनंत' जन्मांतरी

पडतो पाया 'राउळ-बाबा' काय मागणे मागू
तुम्हीच आता आधार देशा कसे कुणाला सांगू
तव छत्राच्या छायेखालुन सात समुद्रावरी

येतो 'भौरू', विसर आजवर जे काही बोललो
प्रसिद्धीसाठी म्हणून तुझ्याशी तावाने भांडलो
येईल आता 'नरेंद्र-बाबा' एकच चिंता उरी

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

छोटी विडंबनं...



आमची प्रेरणा मनीषा साधू यांच्या सुरेख छोट्या कविता (http://www.manogat.com/node/16641)




(छोटी विडंबनं)


१) ह्या अथांग जालावर
तो एकुलता एक दिवे लावत होता
गझलेचे
कशाच्या आधारावर
तो आणि येव्हढ बरळत होता!

२) वाचक मला व्याकुळपणे सांगत होते
त्याच्या गझलियतेची कहाणी
आणि मी
वाचण्यात तल्लीन होतो
त्याची गझल
मुक्तछंदाप्रमाणे!

३) ह्या
निर्लज्ज "केश्या"ला
प्रतिसाद कसे मिळतात काय कोण जाणे
कारण
माझाच प्रतिसाद
तेव्हढा आढळत होता
माझ्या कवितांवर!

४) शब्दांना धरून
अर्थापर्यंत जावं म्हटलं
तर लक्षात आलं
मीच कवी आहे
आणि वाचक ही
मग मी
स्वतःलाच प्रतिसाद बहाल केला!

५) वाच वाच वाचली
रात्रीच्या कुठल्यातरी घटकेला पाडलेली
अस्वस्थतेचं सबंध मूळ
त्या कवितेत आहे असं वाटून
मग लक्षात आलं
ती कविता वाचणं
हेच अस्वस्थतेचं कारण होतं!

६) आता मी काहीही लिहीत नाहीये
आणि तरीही मी अस्वस्थ नाहीये!

प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही...



आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम रचना पाहून वादळाला झाला पसार नाही (http://www.manogat.com/node/16718)


प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही
मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?

गेले अनेक वाचक सांगून रोज मजला
पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!

कवितेत रोज लिहितो मी काहणी 'मनोहर'
वृतात खरडले पण प्रतिसाद फार नाही!

कविता करीत जातो कडवी पाहत नाही
हा मोह लेखनाचा, की रोजगार नाही ?

थकतील वाचणारे मुक्ताफळांस माझ्या
ह्या शब्द-सागराला पण अंत, पार नाही

मी का न बडबडावे प्रस्थापितांप्रमाणे?
मी शाहजोग आहे! करतो विचार? नाही!!

गझलेत "केशवा"च्या , ना गझलियत जरा ही
ह्याच्या परीस कोणी इतका सुमार नाही

धिक्कार खूप झाला, वरती निषेध सुद्धा
वृतीत, "केशवा"च्या झाला सुधार नाही

काव्य...



आमची प्रेरणा अजय जोशी यांची रचना प्रेम (http://www.manogat.com/node/16852)

वाचकाला वाचताना कष्ट झाले पाहिजे
त्याचसाठी फक्त.. करता काव्य आले पाहिजे

मी लिहावे की नको हा प्रश्न मग उरतो कुठे?
अर्थ ओळींचे कशाला ते... कळाले पाहिजे!

'कान' हा पकडू 'नका' अपुलाच पहिल्या वाचनी
जाणण्या हे.. काव्य थोडेसे कळाले पाहिजे

तेल डोळा घालुनी ते वाचकांना सांगती..
रत्न जाली यायच्या आधी पळाले पाहिजे!

मी विडंबन पाडण्याला नेहमी आतूर पण..
चांगले मज.. काव्य एखादे मिळाले पाहिजे!

जोडले मी हात "केश्या" काव्य लिहिण्याला तुझ्या...
कोपऱ्या पासून मेल्या का जुळाले पाहिजे?

(गंड)

आमची प्रेरणा खोडसाळ गुरुजींची अप्रतिम कविता गंड (http://www.manogat.com/node/17230)

मी कवी आहे, मला ही कंड आहे
फक्त वृत्ता चा मला हा गंड आहे

'र' पुढे 'ट' ठेवुनी मी रोज लिहितो
पाडला नाही कधी मी खंड आहे!

वाचले तर पाहिजे हे काव्य कोणी
दोनशे कडव्यात लिहिला खंड आहे

चांगल्या मिळती न आता जमीनी
ह्या मुळे धंदा विडंबन थंड आहे

मुक्तछंदालाच आम्ही काव्य म्हणतो
वृत्त अन बाराखडी हे बंड आहे

बोलले काका, मुळी हे काव्य नाही
जाउ दे तो गर्व, अन पाखंड आहे

कैकदा निवृत्त मी झालो तरी ही
शमत नाही हा विडंबन कंड आहे

'प्रौढ' ह्या वाचू नको "केश्या" कविता!
संपले नाही तुझे पौगंड आहे...

(गलका!)

आमची प्रेरणा प्रदीप कुलकर्णी यांची अप्रतिम गझल गलका! (http://sureshbhat.in/node/1483)

(गलका!)

धक्का बसला तिला जरासा, मला लागला झटका!
सॉरी म्हणता... कानाखाली तिने लावला फटका!

सजावटींच्या दिव्यांत बसतो शांत चाखतो मदिरा...
जरी चघळतो 'मावा', 'पोलो' तिला जाणवे भपका!

उगीच का डोळ्यांत अचानक माझ्या आले पाणी?
नाव घेतले माझे तू अन, मला लागला ठसका!

असा आज का, लंगडतो मी काय तुम्हाला सांगू?
तिच्या घरातिल कुत्र्याचा मी पार घेतला धसका!

झोप हवीशी सुट्टीची... पण सासू ही तडमडते...
जागे होणे भाग अता मज, अन सुट्टीचा पचका!

मौन आमचे घरात असते, घरात असता पत्नी...
ती माहेरी गेल्यावरती घरी मित्रांचा गलका!

जागा झाला माझ्यामधला आज बेरकी "केश्या"...
काव्य मिळाले सुरेख इतके जणू लागला मटका!

(शेवट)


आमची प्रेरणा चक्रपाणि यांची सुंदर गझल शेवट (http://www.manogat.com/node/18433)

भात मी असा हाती घ्यावा.. खाता खाता
ओघळ अन तेव्हाच गळावा.. खाता खाता

सोबत घेतो तूप वरण अन लिंबू मी ही
असा रोज सहभोज घडावा.. खाता खाता

रोज असा हा पंगतीमध्ये बेत बनावा
बोटांवरती स्वाद उरावा.. खाता खाता

एक घास ही पुढे मला खाता ना यावे
अग्रह हा इतका न करावा.. खाता खाता

खूप वाढले अग्रह अन, भरपेट जेवलो
मुखशुद्धीला विडा मिळावा.. खाता खाता

तृप जेवला "केश्या" आता पडतो क्षणभर
डुलकीने या शेवट व्हावा.. खाता खाता

गमक-२

आमची प्रेरणा मिल्याचे गमक (http://www.manogat.com/node/18522)

कसे लपावे घरात लफडे कळेल का हे मला गमक
अहो असा मी भितो कशाला? कलत्र अमुचे असे कडक

कधीतरी छंदमुक्त जगणे जमायला ही मला हवे
कुणा बरोबर तरी अगोदर, हवेच जुळवायला यमक

कुठेच नामोनिशाण मागे उरायला जर नको मला
हवेच सोडायला मला मग अधीर ओठांवरी उदक

उगाच बोभाट ह्यायचा जर दिलीस उत्स्फूर्त दाद तू
इथे जगाला कळेल सगळे निघून येईल ती तडक

लगेच बडवेल खेटराने तिला जरा लागता खबर
टिकायचे तर तिला न याची कधीच लागो जरा भणक

क्षणात पडतील दात माझे क्षणात होईल बोळके
अशीच घावामध्ये तिच्या हो खरेच आहे बरे धमक

विडंबनाचा गुलाम झाला... दिलेस सोडून काव्य तू
शहाणपण का सुचेल "केश्या" अता तुला लागली चटक

पूर्वीगत पण आता काही करवत नाही...

आमची प्रेरणा अनिरुद्ध१९६९ यांची कविता पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही (http://www.manogat.com/node/18659)

पूर्वीगत पण आता काही करवत नाही
पूर्वीगत अन आता काही झेपत नाही

भेटलो तर हल्ली आम्ही चोरून भेटतो
गळ्यात आम्ही गळे घालुनी हिंडत नाही

बंद घेतली करून आधी खिडक्या दारे
जरासुद्धा मज जोखिम हल्ली घेवत नाही

खरेच मग आम्ही इतके निर्धास्त जाहलो
खरेच हा आवाज कुणाला पोचत नाही

खूप शोधतो बाप तिचा मज गावामधुनी
चुकून सुद्धा घरी स्वतःच्या शोधत नाही

हाच फायदा इतक्या साऱ्या तडजोडींचा
तिच्या कधी बापास सुगावा लागत नाही

जरी नसे ही सेफ योजना तिचीच होती
उगाच मी ती गप्पगुमाने ऐकत नाही

पुढे व्हायचे काय परी सापडल्यावरती
किती बडवले कुणास आता सांगत नाही

कशास "केश्या" करतो असली विडंबने तू
कसे चांगले काही तुजला बघवत नाही

केवढी मारली या कवींनी मजल...

आमची प्रेरणा 'बेफिकीर' यांची गझल केवढे चालणे हे मजल दरमजल (http://www.manogat.com/node/19314) ..... आणि खोडसाळगुर्जींचे विडंबन कैकदा वाचली पण सुटेना पझल (http://www.manogat.com/node/19326) ...

केवढी मारली या कवींनी मजल...
रोजची एक बघ पाडती हे गझल

खूप थैमान त्यांनी जरी घातले
एकपण वाचण्यासारखी ना गझल

आज हे वृत्त आहे... उद्या वेगळे
पाडली ही गझल पाडली ती हझल

काय चेकाळल्यासारखे वाटते?
पाडले काव्य आहे किती बघ तरल

मी कितीदातरी खोड काढायचो
पण कुठे गझलपाडीत यांच्या बदल

रोज दुर्लक्ष केले तरी पाडल्या...
शेवटी आज मी घेतली मग दखल

बेफिकिर "केशवा" खरडणे ना बरे
चल अवर चल अवर लेखणी अवर चल

पांढरी...

आमची प्रेरणा मिल्याची सुंदर गझल पंढरी (http://www.manogat.com/node/19374)

वदंता वाटते आता.. कहाणी जी खरी होती
त्वचा ही आमची काळी कधी ती पांढरी होती

तिच्या बद्दल मते माझी जराशी वेगळी होती
जवळ जाता मला कळले..दरी होती बरी होती

तशी नव्हती भिती मजला जरा ही सासऱ्याची पण
घरामधली तिच्या कुत्री.. जराशी चावरी होती

तिला भेटायला जाईन का मी रिक्त हातांनी?
चिलखताच्या बरोबर ढाल ही माझ्या करी होती

तिच्या हातातले डाव्या लाटणे वाटले साधे
बुडावर अदळता कळले अरे ती डावरी होती

घरी यावे नि समजावे, कुणी मुक्काम ठोकावा
शयनकक्षी निजे सासू.. अम्हाला ओसरी होती

म्हणे येणार ती जी शेवरी सम ऐकले होते
उडालो पाहता ती दोनशे(च्या ही) वरी होती

मला सांगूनही "केश्या" न कळला अर्थ कवितेचा
तुला पण वाटले.. केली तुझी मी मस्करी होती

फांदी-२

आमची प्रेरणा : प्रदीप कुलकर्णींची अप्रतिम गझल "फांदी". (http://www.manogat.com/node/19730)
........................................
फांदी-२
........................................

अर्थ शब्दांचा जरा आहे अघोरी!
काव्य आहे आमचे थोडे मुजोरी!

येव्हढा गलका इथे का चाललेला?
तोकड्या कपड्यातल्या जमल्यात पोरी!

बायको समजून धरलेले जिला मी...
नेमकी सासू निघावी पाठमोरी!

का अधी केलेस त्याच्या धन हवाली?
अन जगाला सांगतो झालीय चोरी...

पाहता कविता नवी मजला कळवती...
"केशवा" कविता नवी आलीय कोरी!

पोच 'काट्या'ची कमी पडते जराशी...
उगिच ना देहास या, म्हणतात बोरी!

येव्हढे हे काय जे चमकून गेले?
आरसा ना आमचे टक्कल बिलोरी!

मी तुझ्या कवितेस कंटाळून गेलो...
"केशवा" झाली तुझी कितवी लगोरी?

आमची दुसरी कुठे नाहीच 'फांदी'...
ही पुणेरी धन्यता, ना ही मुजोरी!

- केशवसुमार
........................................
रचनाकाल ः १४ मे २०१०
........................................

लिहिण्यास आज आम्हा आली नवी खुमारी!...

आमची प्रेरणा प्रोफ़ेसर यांची गझल जगण्यास अमृताची आली जणू खुमारी! (http://www.manogat.com/node/23588) , कुमार जावडेकरांच्या साथ (http://www.manogat.com/node/23579) या गझलेवर झालेली चर्चा आणि आमच्या गुर्जींचे फर्मास विडंबन जगण्यास का फुकाची येते अशी खुमारी? (http://www.manogat.com/node/23601)

लिहिण्यास आज आम्हा आली नवी खुमारी!
जालावरी कवींची आली नवीन स्वारी!!

थकले न ते कधीही मज काव्य पुरवताना.....
जावू दिली न मीही पुकटातली सवारी!

नाही कधीच जमल्या मज ऎसपैस गझला;
बदलीत शब्द काही करतो तरी सुमारी!

आवाज बंद झाले! काही चकीत झाले!
मी काव्यकर्तनाची घेताच ही सुपारी!!

आजन्म हिंडलो मी जालावरी मराठी ....
जेव्हा मिळेल तेव्हा मी दावतो हुशारी!

'दोघां'मधेच चर्चा रात्रीत रंगलेल्या ;
होता अलामतीचा मुद्दा तिथे विचारी!

घेऊ नये कधी ही गझलेत सूट कुठली....
वर्षानुवर्ष लागे थांबायची तयारी!

छळतोस "केशवा"का जाली सदा कवींना;
तू लाज शरम मेल्या का सोडलीस सारी !

आली गजल 'कुमारी', 'साथी'स अन दुरुस्ती
हृदयात "केशवा"च्या उसळे नवी उभारी !!


...........प्रोप्रा.केशवसुमार

केशवसुमार यांचे काव्यकर्तनालय,
बर्मिंगहाम रोड, फ्रँकफुर्ट.
फोन नंबर: ००४९१७२१०३४६११

खिडकी...

आमची प्रेरणा राहुल गांधींची 'खिडकी'...
http://www.firstpost.com/politics/first-look-even-orkut-is-cooler-than-rahul-gandhis-khidkee-com-981263.html#disqus_thread

बदलले पेज अन साईट पुढची आली
अन डोळ्यांपुढती नवीच " खिडकी " आली
पहिले दृश्य ते कुणा सांगवत नाही
रोमांच तरारून कांटा भरला देही
सुस्नात एकला "तरुण" त्यातला पोर
पण नसे पांढरी गांधी टोपी थोर
तो उभा घालुनी हारतुरे कंठात
खिडकीतुन बघतो आणि हलवतो "हात"
हि जाहिरात हा मार्ग कसा अभिजात?
हि खिडकीतर हो खरी आद्य जाहिरात
खेचेल गिऱ्हाईक त्याची होई जाहिरात
ओरडे विचार माझा माझ्या कानात
उलटले पेज अन क्षणात कळली मेख
मेंदूत राहिली जळत वांकडी रेघ
विझवील काय ती कुण्या कवीचे ज्ञान ?
हि अशीच का हो जन्मे जाहिरात

परमश्रद्धेय ...

आमची प्रेरणा Gajooशेठची खतरनाक कविता
https://www.facebook.com/GajooTayde/posts/630842583613151

परमश्रद्धेय होतो मी

त्याच्या-तिच्या भिंतीवर...
दोन-चार अनाकलनीय कॉमेंट
संदर्भमुक्त
ब्लॉगविश्वात अधीच असणारे
आणि काही तिरकस तीर
सिद्धांतांचे
लगेच लिंक देणारे

फक्त सुगंधी अहंगंड धूर
मद मोहन

अन् अधूनमधून दर्शन
गांडीत उगवलेल्या
दंतांकुरांचे

स्टेटसला लाईक द्या मायबाप!!

गुत्तायात्रा...

स्मशानयात्रा
आमची प्रेरणा Gajooशेठ ची दाहक कविताhttps://www.facebook.com/notes/gajoo-tayde/स्मशानयात्रा/632305740133502

या कविते वरून आम्हाला एका स्मशानशेजारील हात भट्टी वर घडलेला प्रसंग आठवला...

मद्य भट्टीचे विदग्ध प्राक्तन
ज्वालांचीही लागट थरथर।
घट मातीचा भरति त्यातुन
नवसागर धुर गाळित झरझर॥

पोलिसी छापा पडता लगबग
गुत्ताकर्मी पांगति भरभर।
जाता हप्ता त्यांचा घेउनी
कारवाई ही केवळ वरवर॥

पहिल्या धारेची भरुन घेई
चाखुनी तो घेई भरभर।
मारुन पव्वा विडी ओढीत
हरहर गंगे, गंगे हरहर॥

धुम्मस...

धुम्मस
आमची प्रेरणा Balajiशेठ ची सुंदर कविता https://www.facebook.com/notes/balaji-sutar/धुम्मस/667222646640178

या समुहात
तसं सगळं छान आहे.

सगळे व्यवहार -
सामाजिक, राजकीय,
सांस्कृतिक,जातीय,
(अन् 'साहित्यिक', हे फार महत्त्वाचं.)
- ठीकठाक !

भाषिक व्याकरणाबद्दल
सांगायचं तर -
बरीच सैल झालीय
वीण सगळी.
कधी उसवेल सांगताच येत नाही.
धागा अजून तुटला नाही, म्हणून बरं !

खरंतर,
या सैल झालेल्या विणीला
सुरुंग लावून बत्ती द्यायची
खूप गरज भासतेय, विद्वानांना.

पण, झालंय काय, की,
इथली माणसं, त्यांचे अनुगामी,
आणि इथले विद्वान
फक्त बौद्धिक अगम्यागमन करून
आपल्यापुरताच सोडवतायत,
हा, शुद्धलेखनाचा प्रश्न.

- आणि, असं,
दुखणं हेल्याला असताना
औषध पखालीला देऊन
त्यांना 'मोकळं' झाल्यासारखंही वाटतं,
लगेचच !

असं, हे, सर्वत्र,
या समुहात !

सगळी गंमतच,
च्यायला !
---------------------------------------------
- केशवसुमार, फ्रँकफुर्ट

बेताबहून ...

बेताबहून गाठले गदर
म्हणावीतशी न झाली कदर
मी माझ्या ब्रदर आणि फादर...

हा मजकूर एक उत्तम कविता आहे असे आपल्याला म्हणता येईल.
भाषा व्यावहारिक वळणाची वाटत असली तरी अनुप्रास, यमक अशा खास कवितेशी निगडित विशेषांचा उपयोग येथे झाला आहे. तीन ओळींची हायकूसदृश रचना अल्पाक्षररमणीयतेचा विशेष प्रकट करते. बेताबहून गदर गाठणेमधून विशिष्ट ध्येयाच्या दिशेन केलेली निश्चयपूर्वक वाटचाल व्यक्त होते. गदर या शब्दाचा अर्थ विद्रोह असा असल्यामुळे व संघर्षाची क्रिया सुचवली जाते. तिचा कदरशी संबंध जोडून असंज्ञ स्वरूपातील अन्यायाची सूचनही केले जाते. पुढच्या ओळीतील ब्रदर आणि फादर यांच्या उल्लेखामुळे कुटुंबयंत्रणेचे सूचन होते आणि अगोदरच्या दोन ओळीतील व्यवहार अधिक व्यामिश्र होत जातात.

झाकोळ...

झाकोळ
गेले काही दिवस व्यामिश्र / शब्दबंबाळ कविता वाचून डोक्याची मंडई झाली होती... पण आज सकाळी Balajiशेठनी त्यांच्या एका जुन्या कवितेलाhttps://www.facebook.com/notes/balaji-sutar/झाकोळ/423911577637954 ट्याग केल्यामुळे अनिरुद्ध अभ्यंकराना एका अप्रतिम कवितेच्या पुनर्वाचानाचा सुखद आनंद मिळाला...पण केशवसुमारांना वाटले हे विडंबनासाठी आमंत्रण आहे...मग गप्प बसतील तो केसु कसला ...

शाई
कागदभर खाज.

अक्षर
वहीभर माग.

लिखाण
दैवी शाप.

कविता पडते, रोजच्या रोज.
लेखण्या झडतात, आवेगानं.
जोरकस.

लयबद्ध हुंकारणाऱ्या ओळी.

आसक्त प्रतिमांशी आरक्त प्रतिमा,
घट्ट सापासारखे सक्त विळखे,
वृत्त -छंदाशी करकचून.

शब्दांमध्ये एकाग्र ब्रम्हांड.

- संदर्भाची दारे सताड उघडी,
कुणाशी, कुणास्तव, कोण, व्यर्थ !!

सांगशील, कवितेचा अर्थ काय?

-----------------------------------
- केशवसुमार, फ्रँकफुर्ट

पुसतो कोण ? ...

Patilशेठचे स्फोटक काव्य https://www.facebook.com/groups/uthathev/permalink/557845514277974/
वाचून आम्हाला हि थोडी उठाठेव करावी असं वाटले...

व्यामिश्र समिक्षा , प्रासादिक कीव,
वाचकास इथे , पुसतो कोण ?

निर्गुणाची छाटी , सगुणाचे खुंटी
नो एंट्री मध्ये , घुसतो कोण ?

प्रसिद्ध समीक्षकांचे , काढावे वाभाडे
तया वाचण्यास , आसुसतो कोण ?

चालविती जे , रद्दीचीच सद्दी
अपेक्षितांवर , रुसतो कोण ?

-के सु

नार अपुली आकृती...

आज आम्ही जालसंगीत ऐकत होतो... गदिमांचे एक जुने गाणे ' रंगवि रे चित्रकारा' लागले होते आणि आम्हाला Upadhyeशेठ ची 'असे चित्र भारतात कधी बघायला मिळेल?' हि शतकी पोस्ट आठवली आणि नेहमी प्रमाणे आम्ही भलतेच गुणगुणायला सुरु केले http://www.aathavanitli-gani.com/Song/Rangavi_Re_Chitrakara

रंगते रस्त्यात उघडी नार अपुली आकृती
यायचि रे हि कधी देशात अपुल्या संस्कृती

कापडाझाकून देहा स्त्रीस पडते राहणे
गोरट्या या अंगरंगा सत्त्व 'डी' चे वांचिणे
कारणा या वैद्यकांची लाभलेली स्वीकृती
नार अपुली आकृती !

टाकला रे प्रश्न मी हा आज तुमच्या चौकाटी
या उठाटेवीकरांनो पेटवा ही आगटी
उमज माझी हीच आहे ही स्त्रीयांची जागृती
नार अपुली आकृती !

अंगलटी ही पोस्ट येते खाज पण ना भागली
पाशवी जमताच शक्ती बंद करतो टाकळी
अधीरलो मी शेंचुरीला म्हणून केली ही कृती
नार अपुली आकृती

एक प्याला सुखाचा...

समस्त बेवडे बंधू आणि भगिनींना गटारीच्या शुभेच्छा !

एक प्याला सुखाचा, नंतर सगळे दुःखाचे
पतियाली हे पेग भरुया गटार मुहुर्ताचे

दाविसी तू जरी खंबा फरडा, देसी निवडा, देसी उघडा
मद्यासाठी कश्यास नाटक तीन प्रवेशांचे

मुखी ही विडी गोल्ड्फ़ेकची, संगे सोबत अन चखण्याची
रिती बाटली उरे शेवटी देणे भंगाराचे !

या पेल्याते भरतो कोण ? एक सारखी असती दोन
कुणा न दिसले हात चलाखी बारटेंडराचे!

फेबु - भिंतीवरी ब्लॉगही 'सर'निर्मित नगरी...

फेबु - भिंतीवरी
ब्लॉगही 'सर'निर्मित नगरी...

त्या नगरीच्या विशालतेवर
उभ्या राहिल्या पोस्टी सुंदर
मधुन वाहते ज्ञान अवांतर
येशा, हेम्या, प्रशांत वाचती, थिजूनी त्यांच्यावरी

ब्लॉगाकू-कुल-कीर्ती-भूषण
राजा 'सर'पण धर्मपरायण
त्या नगरीचें करितो लेखन
गृहीं चंद्रसा, नगरिं इंद्रसा, सूर्य जसा संगरी

लिखाण सोप असत तोवर...

आमची प्रेरणा Gaanu Joglekar काकूंचे स्टेटस
https://www.facebook.com/photo.php?fbid=711667188849588&set=a.560794303936878.148530.100000189411178&type=1

लिखाण सोप असत
तोवर शब्द साधे आणि अर्थ स्पष्ट

लिखाण अवधड होता
तोच शब्द क्लिष्ट
आणि अर्थाचे केवळ गुंते

कविता यालाच म्हणतात बहुदा .

'सर'वात्मका 'सर'वेश्वरा ...

'सर'वात्मका 'सर'वेश्वरा
ब्लॉगाधरा 'शैव'सुंदरा ।
जे जे जगी घडते तया
माझे मुळे दावा करा ॥

आदित्य या समूहात व्हा
ऋग्वेद या समुहात व्हा
'सर'पणत्व द्या, द्या 'आर्य'ता
अनुदानीता दळता सरा ॥

मित्रांनो...

मित्रांनो,
तुम्ही भयकंपित होण्याचे
आता कारण नाही
लेखणी सांभाळा हातातील
रहा लिहित
कादंबरीला मरण नाही

माहित्येय मला
नाचरेपणा तुमच्यातील अन
तरुण उत्साही उन्मादही शक्तिशाली
आणि आता तर काय बुवा तुम्ही पोचलात सातासमुद्रापार
विकीपीडिया,विकीलीक्स असांजे अन काय काय
माहितीची मोहिनीच तुमची फ्रेण्ड झालीये
लेकरांनो
उमजून असा हा भुलभुल्लेय्या
नेट –इंटरनेटच्या मुखातील विश्वदर्शन मायावी
नेमकी निवडून घ्या कथा
जी भाषांतरावी लागते कष्टाने

कितीक समुद्रापलीकडचा ...

Smita Gaanu Joglekarकाकूंची https://www.facebook.com/photo.php?fbid=726446010705039&set=a.560794303936878.148530.100000189411178&type=1कविता वाचून काही वर्षापूर्वी एका जुन्या मित्राला आम्ही भेटले होते त्याची आठवण झाली

कितीक समुद्रापलीकडचा माझा मित्र
पुऱ्या सात वर्षांनी मायदेशी आला
तब्बल दहा दिवसांसाठी 

भेटलो नेहमीप्रमाणे
सहकारी मित्र दोस्त वगैरे

आता आम्हीच चाळीशीपार
आणि काही सहकारी तर साठीच्या पुढे
मित्र आणि बाकी सारे
मुबलक प्यायलो प्यायलो हसलो हिंदकळलो
पुऱ्या सात वर्षाची कसर भरत

निघताना तो गप्प गप्प , सुन्न
" ठरवलंय आता दरवर्षी यायचं "
दबल्या आवाजात तो पुटपुटल्यागत

आणि निरोपाच्या मिठीनंतर तर काहीच नाही उरली

गदगदणार्या त्याच्या देहातून
फक्त अगतिकता , स्वतःवर दोषारोपण
आणे सारी शुद्ध विसविशीत झाल्यानंतर येणारी
काळीज चिरून जाणारी
विकल निराश बोच फक्त

मला उगाचच फार शक्तिशाली वाटून गेलं
आणि मी अधिकच आश्वासक समंजसपणे
त्याला घट्ट खंद्याभोवती गुरफटून घेतलं

पुढची काही पावलं त्याला पुरेल इतकं .

माय बहिण ही नाती हरली ...

माय बहिण ही नाती हरली
कुठे निवाडा मला ?
आज मी निराधार अबला

या 'संतां'ची रीत निराळी
प्रभूनामाच्या मुखात ओळी
सत्संगाची रंगत-संगत,
करूनि शोषले मला

न्याय आंधळा बाई, बाई !
'बालका'स त्या पदरी घेई
कसे विसरता कर्म मुलाचे,
झणी फसवली 'तुला'

जगी जयाला कोणी नाही
तूच तयाची होसी आई
या अबलांची कशी येईना,
करुणा देवा तुला

आला निवडीचा महिना ...

सध्या सर्व वाहिन्या / वृत्तपत्रांमध्ये देखावा आणि लकवा हे दोनच विषय सुरु आहेत.. तेच तेच ऐकायचा \ बघायचा कंटाळा आला म्हणून आम्ही दादांच्या धमाल गाण्याची सीडी लावली ...
पण नेहमी प्रमाणे भलतच बरळायला लागलो...

आला निवडीचा महिना
भरभर फायली संपवा
ह्यांला मारलाय लकवा
युतीच धाक जरा दाखवा

समद्या राज्यात इनलय
खादाड नेतांच जाळं
काही समजना का ह्यो
करतेया भलतंच चाळं
रोज दारात येतंय
बोंबलत आमदार सार
त्यांच्या जीवावर मांडलाय
सत्तेचा इथ मी खेळं
काम होई ना काय बी
काम होई ना काय बी
दिल्लीला निरोप पाठवा
ह्यांला मारलाय लकवा

सत्ते साठीचं आलो
विसरून 'परदेशी' असणं
द्या सोडवुन फायली
ऐका की माझ मागणं
असं किती चालायचं
नुस्तच दुरून बघणं
सही वाचुन झालया
मला बी अवघड जगणं
लै वाढलया दुखणं
लै वाढलया दुखणं
खात्रीचा हकीम भेटवा
ह्यांला मारलाय लकवा

नका उचकवु पावणं
किती तुम्हा सांगावं
ह्या युतीत असल्या
कुणी कसं वागावं
पाया पडतो मी तुमच्या
थोडंसं ऐकाल कावं
करा मोकळ्या फायली
कोरून तुमच नावं
कसं दिल्लीच कोकरू
कसं दिल्लीच कोकरू
झोपलया हलवून उठवा
ह्यांला मारलाय लकवा

फेक फेक फेक फेक फेकिंगगाडी ...

'मामाची बायको सुगरण' ह्या पोस्टवरचे हेमंत राजोपाध्ये'सर' यांचे प्रतिसाद आणि यशवंत पाटीलशेठ चे 'फुक फुक फुक फुक सिगार बीडी' हे विडंबन वाचले आणि आमच्या डोक्यात त्यांची भेळ झाली...

फेक फेक फेक फेक फेकिंगगाडी
शोधांच्या फुसक्या हवेत सोडी
नवीन इतिहास वाचूया
सरांच्या ब्लॉगवर जाऊया

सरांचा ब्लॉग मोठा
साहित्याचा हा गोठा
थापा पाहुन येऊया

सरांचं लेखन 'शी'करणं
रोज रोज जाली 'सर'पण
बहुमोल माहिती घेऊया

सरांची माहिती चोरटी
म्हणतात इथली पोरटी
साईटची नावे सांगूया

सर हा मोठा तालेवार
निवडून येईल हजार वार
जाहीरनामा 'फेकू'या

( फार झाले)...

धोंडोपंत आपटे यांच्या सुंदर गजलेचे जरासे गंभीर विडंबन

आग भर दिवसात म्हणजे फार झाले
येत ना काबूत म्हणजे फार झाले

काय झाले हे असे सार्‍यास टाऊक
फाईली जळतात म्हणजे फार झाले

शाहणी जनता कधी होणार आता
मोजती मूर्खात म्हणजे फार झाले

भ्रष्ट हे सारे जरी नेते तरीही
निवडुनी येतात म्हणजे फार झाले

बोलण्याची स्पष्ट हे नाही मुभा अन
ह्या प्रथा छळतात म्हणजे फार झाले

चौकशी होईल ही दुनिये समोरी
सत्य गुलदस्त्यात म्हणजे फार झाले

देश हा आतून "केश्या" पेटलेला
ते तरी तोर्‍यात म्हणजे फार झाले"

फसवणूक नुसती !...

आमची प्रेरणा सुप्रियाताईची गझल 'फसवणूक नुसती !'

कशाला 'जिमे'ची मिरवणूक नुसती ?
बघ्यांचीच होते दमवणूक नुसती !

'तुला' टाळली मी सदोदीत माझी..,
स्वत:चीच केली फसवणूक नुसती !

उद्वाही संग मार्ग निर्धोक वाटे...
कशाला जीन्याची चिथवणूक नुसती !

तना रोज तागा असा वेढला अन...
वळ्यांचीच केली दडवणूक नुसती !

तनाला कशी या मुरड सांग घालू....
वजन हे तिहेरी फुगवणूक नुसती !

करा "केशवा"ला इथे बंद आता...
फुकटची सुरू ही छळवणूक नुसती !

पाहुनी फोटो न येते कल्पना...

आमची प्रेरणा डॉ. कैलास गायकवाड यांची गझल ' येत जा देवून थोडी कल्पना '

पाहुनी फोटो न येते कल्पना
भेटता उध्वस्त होशिल रे मना

ही वरु वा ती वरु की ती वरु?
केवढ्या माझ्या मनाच्या वल्गना

तीच ती मी पाहुनी कंटाळलो
पाचव्या गल्लीतली ती 'वंदना'

कालपावेतो जिला मी टाळले
आज झाला अन तिच्याशी सामना

'भावना' समजून गेलो भेटण्या
भेटल्या पण 'साधना','आराधना'

वाचणे पण वेदनाप्रद हे खरे !!
"केशवा"चे काव्य म्हणजे यातना

चुकले असावे...

एका जुन्या गझलेचे नवे विडंबन:
चुकले असावे

वाकणे चुकले असावे
पाहणे चुकले असावे

'पोच'ले तेथे कसे हे?
फेकणे चुकले असावे

आज ना होकार आला!
मागणे चुकले असावे

"अंतरे मिटली कशी ही"
मोजणे चुकले असावे

ती सदिच्छा भेट होती?
वागणे चुकले असावे

गाव माझा हा उजळला!!
पेटणे चुकले असावे!

"केशवा" आलास का तू
टंकणे चुकले असावे

भोगले सर्वस्व शेवट वृद्ध झाला...

आमची प्रेरणा मिलिंद फणसेंची अप्रतिम गझल "त्यागले सर्वस्व अन्‌ समृद्ध झाला" http://www.manogat.com/node/23249

सोडुनी घरदार "केश्या" बुद्ध झाला ?
भोगले सर्वस्व शेवट वृद्ध झाला

हरकती, मुरक्या प्रियेच्या, कान किटले
(कंठ गाताना कधी ना रुद्ध झाला)

बारली नवसागराचा घोळ केला
झाळला पिंपात मग तो, 'शुद्ध' झाला

ते विडंबन वाचुनी करतात चर्चा
बाप "केश्या"वर तिचा का क्रुद्ध झाला

दात अक्रोडामुळे ना हालला हा
पण तुझ्या चकल्यांपुढे, हतबुद्ध झाला

फाडले प्रत्येक कवितेला, सरावे
केशवाचा का कधी अनिरुद्ध झाला

लेवून मेकपाला...

लेवून मेकपाला

लेवून मेकपाला मिरवू नको सखे तू
भलतेच या जगाला कळवू नको सखे तू

दारापुढे तुझ्या मी दचकून थांबलो ना...
थोबाड हे असे ही सजवू नको सखे तू

अरसा अनोळखी हा ठेवू नको भरवसा
लिपस्टिक सारखे हे गिरवू नको सखे तू

कानामधे तुझ्या ह्या जाती बटा सदैवी
केसास फार पुढच्या वळवू नको सखे तू

येईल वेळ तीही थोबाड हे धुण्याची
दचकून चेहरा मग लपवू नको सखे तू

"केश्या"स ओळखा या ठेवू नको भरवसा
जालावरी कविता डकवू नको सखे तू

उरला न कविता...

आमची प्रेरणा जयन्ता५२ यांची गझल 'उरला न कोणी' http://www.manogat.com/node/23219

उरला न कविता तोडणारा
जोषात ओळी जोडणारा

पाडा तुम्ही कविता कधीही
तैयार आहे 'खोड'णारा

फुटतील अता कविता अजूनी
आला पुन्हा तो फोडणारा

टंकू नका, आता कुणीही
"केश्या"न कोणा सोडणारा

हा आपला इतिहास आहे
तू टंकता मी मोडणारा

व्यर्थ आहे ठेवणे ...

आमची प्रेरणा जयन्ता५२ यांची गजल http://www.manogat.com/node/23211

व्यर्थ आहे ठेवणे ह्या "केशवा"वरती पहारा
पाडतो कविता हजारो ,एकटा तो पाडणारा

भेटल्यावर चौकशी करतोस वजनाची कशाला?
दोन केजी तो कमी बघ सांगतो मग सांगणारा!

बाप अन आई वगैरे सोबती असले कुणी तर
मित्र तेंव्हा व्हायचे मग मी 'दुरूनी हासणारा!'

वाचतो उर्दूप्रमाणे मेनुकार्डाला कशाला..
डिश उंची मागवे तो फुकट पार्टी काढणारा

व्यर्थ सुजतो गाल माझा शेवटी होते असे की
बाप निघतो तो तिचा मज घरगडी जो वाटणारा

नेट...

गेल्या महिन्याभरात ऑब्लिवियन,पॅसिफिक रीम वगैरे वगैरे इंग्रजी चित्रपटातून २०५०-२०६० मध्ये जग कसे असेल ह्याचे अतिरंजित चित्रीकरण बघून आपण भारतीय किती मागासलेले आहोत ह्याचा जबरदस्त  न्यूनगंड तयार झाला होता,त्यातच  वेगवेगळ्या राजकीय पक्ष्यांच्या भविष्यातील भारत असा असेल तसा असेल अश्या वल्गना ही ऐकल्या होत्या त्यामुळे हल्ली मध्येच आमचा मुंगेरीलाल होतो आणि भारतात खेडोपाडी इंटरनेट पोचले आहे.‌..सगळ्यांकडे लॅपटॉप , स्मार्ट फोन आहेत ...सर्व गोष्टी ऍटोमॅटिक होता आहेत.. फक्त एक बटण दाबायचा अवकाश.. अशी सुरस आणि चमत्कारिक दिवा स्वप्न पाहण्याची सवय आम्हाला लागली आहे ... तशात  Balajiशेठची अप्रतिम कविता 'पाऊस'  (https://www.facebook.com/notes/balaji-sutar/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8/665775513451558) काल वाचनात आली आणि आमचा डावा डोळा फडफडू लागला

नेट अगदी मोडकळीला आल्यासारखं-

"आज तरी मेल उघडते की नाही कुणास ठाऊक?
नोटिफिकेशन अगदी मिळेनासे झालेत, चार दिवसांपासून."
लॅपटॉपकडे पाहत
रामभाऊ तलाठ्याची बायको वैतागवैतागून म्हणते.

"मायला, शेअरट्रान्फर व्हऊ देत न्हाई ह्यो बाबा,
आजूक चाराठ दिवस.."
धोंडू दलाल खोलीतून दलालस्ट्रीट्वर नजर टाकत
बिडीचे लोट सोडतो.

"आर्यन् , व्हॅटस अप खेळू नकोस,
आत ये नि फोन बंद कर पाहू आधी.."
कुलकर्णी मास्तरांची बायको पोरावर मंजुळ ओरडते.

"कुटल्या जल्माचा सूड घेतोय, सुडक्या.."
गुरवाची म्हातारी तोंडातल्या तोंडात शिव्या घालते.
उघडलेल्या ब्राउझरसोबतच
बुकमार्क केलेली यादी न्याहाळून घेत,
विण्डोज एक्स्पोलर मध्ये माउस फिरवत डाऊनलोडचा धांडोळा घेते.

"प्रिंटरकडं बगा जरा, चार दिसापास्नं कुरकुरतंय,
डाक्टराला दावाया फायजी..किती सांगू ? कितींदा सांगू ?"
डोळे सुजलेली लव्हारीण नवऱ्यापुढे तीनतीनदा काकुळती येते.

"मरू दे तिकडं, जाव दे, मायला, किरकिर जाईल जल्माची.."
जवळ कवडीसुद्धा नसलेला लव्हार बायकोला म्हणतो,
"ह्यो दावेदार असा मान टाकून पडलाय, आठदी झालं..
भनभन क्येलीस तर बरगाड मोडून हातात दीन बग, आयघाल्ये.."

लव्हाराला फेसबुकची भयाण तलफ आलेली,
मोडेम निजल्या गाढवासारखं स्तब्ध निपचीत, अन् ,
नेट, गावठी गुत्त्यासारखा, अगदीच वायद्यावर बंद झालेलं !

----------------------------------------------------------------------
                                 - केशवसुमार,फ्रँकफुर्ट.

बालिश सगळी बालिश ग...

नेहमी प्रमाणे आमचे जाल संगीत ऐकत जालभ्रमण सुरु होते...उठठेवी वरच्या काही गरमागरम चर्चा वाचताना पी.सावळाराम यांचे सावध हरणी सावध ग गाणे सुरु झाले...
http://www.aathavanitli-gani.com/Song/Savadha_Harini_Savadha
आणि आम्हाला काही भलतेच गाणे गुणगुणू लागले...

बालिश सगळी बालिश ग, चर्चा किती ही बालिश ग

मृत झाली हि संस्कृत वाणी, वापरते ना आता कोणी
सुभाषिताची अन बोळवणी , बालिश

प्रक्षोभक ते स्टेटस सारे, पिसाटले संस्कृत कळणारे
थयथय कॉमेंट पडती सरणी, बालिश

भोचक जमाती लगेच सगळी, क्षणात 'पोपट' चर्चा रंगली
मुद्यांची हि मग गरज संपली , बालिश

बारबोध + स्टिरियोटाइप...

बारबोध + स्टिरियोटाइप

एकस्मिन् दिवसेऽवसान समये
मै था गया बारमे ।
काचित् तत्र कुरंगबालनयना
थी नृत्य करती खडी ।
त्वां दृष्टवा नवयौवनां शशिमुखीं
मै मोह मे जा पडा।
ना जीवामि त्वयाविना श्रुणु सखे
तू यार कैसे मिले

कायकू...

Joshiकाकूंनी काही हायकू आणि कायकू वाचायला दिल्याhttp://www.aisiakshare.com/node/1966 ..कविता वाचना नंतर गप्प बसेल तो केश्या कसला... आम्ही पण ५ कायकू पाडल्या...

१) लहरी वारा
पदराची सळसळ
बघ्यांचा छळ

२) तारखेची हूल
धोक्याची चाहूल
बाई निष्प्राण

३) श्रीखंडाची वाटी
पुऱ्याच्या संगती
तन दे ताण

४) पाऊस गाणी
कवड्याची कहाणी
ऐकते कोण

५) केश्या हे पाही
कवड्याचं रुदन
खुनशी मन

डान्स रे पिकॉक, मॅन्गोच्या बनात...

काल दुपारी कॉफीच्या सुट्टीत आयुष्यमध्याच्या घोळापाशी पोचलेली आम्ही काही धेडगुजरे मित्र आपल्या पुढच्या पिढीचे कसं होणार या चिंतेत मग्न होतो...उरलेली चर्चा नंतर आमच्या स्वप्नात पुढे चालू झाली...जग, देशा पासून सुरु झालेली चर्चा भाषे पर्यत येऊन पोचली..माध्यमातील मराठी, मराठी व्याकरण, इंग्रजीचा वाढता प्रभाव ...पुढच्या पिढीतले पापा आणि मम्मी आपल्या किडाला मराठी किडसॉंग कसं सिंगून दाखवतील म्हणून एकाने जे गाण म्हटलं ते ऐकून दचकून जागा झालो ...खरच पुढच्या काळात काय काय बघाव आणि ऐकावं लागणार आहे कोण जाणे

डान्स रे पिकॉक, मॅन्गोच्या बनात
डान्स रे पिकॉक डान्स !

क्लाउडशि विंड झुंजला रे
ब्लॅक ब्लॅक कॉटन पिंजला रे
नाऊ युवर पाळी, वीज गिव्हिंग टाळी
फुलव पिसारा डान्स !

झरझर रेनिंग झरली रे
ट्रीजचि भिजली इरली रे
रेनात न्हाऊ, काहितरि सींगु
करुन पुकारा डान्स !

ड्रॉप ड्रॉप पाँडात डन्सिंग रे
टपटप लिफात वाजती रे
रेनिंगच्या लायनीत, प्ले खेळु दोघांत
ब्लू फ्रेंडा तू डान्स !

रेनिंगचि रिमझिम स्टॉपली रे
युअर मैन पेअर जमली रे
क्लॉउडात छान छान, सेव्ह्न कलरी कमान
कमानीबिलो त्या डान्स !

किती किती गांगलून जातो...

आमची प्रेरणा Supriyaतैची कविता https://www.facebook.com/supriya.jadhav.73157/posts/675640469117160

किती किती गांगलून जातो
नको नको ते लिहून जातो

'घडीत काना घडीत मात्रा'
'तुले' असे ही म्हणून जातो

मला कुठे गवसते तिथे मी
स्वतःच डंका पिटून जातो

हे सरांनो, धन्य व्हा...

हे सरांनो, धन्य व्हा
माहिती बहुमुल्य अपुल्या
ब्लॉगवरती टंकवा ॥

गोष्ट एकेका युगाची
बदललेल्या मानवांची
उघडुनी इतिहास सारे
पामरांना दाखवा ॥

नको रे बाळगु...

जालदिंडीचे अध्वर्यू ‌- गंडामहाराज कराडकर सर यांनी दिलेल्या मौलिक अर्थात महत्वाच्या माहिती अर्थात ज्ञाना ने प्रेरित होऊन आम्हालाहि आत्मस्तुती/निरीक्षण करावे वाटले

नको रे बाळगु । लेखनाचा गंड
मूढता प्रचंड । नको दाउ ॥

होशिल बा केव्हा । त्वा रे साहित्यिक
येवो कथानक । लेखनात ॥

तयापरी घाल । कवींवर गंडा
विडंबन फंडा । एकमात्र ॥

'केश्या ' म्हणे हेच । सोपे रे साधन
नको ते लेखन । आपापले ॥

जालदिंडीचे अर्धवायू ‌- केश्यामहाराज फ्रँकफुर्ट.कर

बेवड्याचा प्रयत्न ...

आमची प्रेरणा Karyakarteशेठची उत्सुकताhttps://www.facebook.com/groups/dyataali/permalink/402925339825964/?comment_id=403783086406856&offset=0&total_comments=13

Somanकाकूंनी केलेलं विडंबन
https://www.facebook.com/groups/dyataali/permalink/402925339825964/

आणि
मूळ कविता http://balbharatikavita.blogspot.de/2011/12/blog-post_694.html

बेवड्याचा प्रयत्न

[अभंग]

एका बेवड्याने एकदा आपुला।
पव्वा ठेवियेला उंच जागी ॥
तेथुनी सुखाने खालती तो आला ।
परी मग झाला कष्टी बहू॥
मागुती पव्व्याच्या-पाशी जाता ये ना।
मोड्यावरुनी पुन्हां पुन्हां पडे॥१॥

[कामदा]

चारवेळा तो हयापरी पडे। जाय बापुडा भागुनी, पुढे॥
आस खुंटली, येतसे रडे। अंग टाकुनी भूमिसी पडे॥२॥

[अंजनी गीत]

फिरुनि एकदा धीर धरुनिया।
लागे हळूहळू वरति चढाया॥
पव्व्याजवळी परि पोचुनिया।
आदळला खाली॥३॥

[साकया]

पाचहि वेळा यत्न करुनिया , आले यश न तयाला॥
गरीब बापुडा बेवडा तो, दुःखी अतिशय झाला॥४॥

हिंमत धरुनी फिरुनी आणखी, मोडा चढूनी गेला॥
परि पव्व्याला धरताना तो, झोक जाउनी पडला॥५॥

[दिंडी]

'अहा!मज ऐसी दैव-हत प्राणी।
खचित जगती या दिसत नसे कोणी!'॥
निराशेने बोलुनी असे गेला।
परी चित्ती स्वस्थता न ये त्याला॥६॥

[अभंग]

मग वेगे वेगे उठे। मोडा चढू लागे नेटे॥
बहू घेई खबरदारी। जाई, पोचे पव्व्याजवळि॥
हळुच मग तोंडि धरे।पोटी आनंदाने भरे॥
झटे निश्चयाचे बळे। अंती त्याला यश मिळे॥७॥

(केशवसुमार)

बाईंचे सूटले भान...

काल नेहमी प्रमणे कानात जालसंगीत वाजत होते...अनिल यांचे अप्रतिम गाणे 'केळीचे सुकले बाग..' सुरु होते.. (http://www.aathavanitli-gani.com/Song/Keliche_Sukale_Baag) तेव्हढ्यात Shindeकाकूंचा लुटुपुटुचा रुद्रावतार (https://www.facebook.com/groups/dyataali/permalink/403462993105532/) वाचनात आला ... आणि व्हायचा तो गोंधळ झालाच...आम्ही गुणगुणू लागलो...

बाईंचे सूटले भान बघुनिया पाणी
घरभर अशी हि तळी नवऱ्याची न निगराणी

झणी उठे लावला फोन धुमसती निखारे
कुठे अशी लाभते संधी, बोलते मग सारे

कशी शांत करु आता या कावल्या जिवा
जालातील समुहावर, उपाय शोधावा

सपासपा चालवी तेगा , लढाई केली
बाईंचा शमला राग रमुनि या जाली

जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही !...

आयुष्यावर बोलू काही वरून आठवलं (संदीप Thanks!)

जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही !
चला दोस्तहो स्त्रीगंडावर बोलू काही !

उगाच फाटे स्टेटसला फोडीत रहा तू
चिडला नाही पोष्ट्या तोवर बोलू काही

केस करीन हे ऐकून जमले काळे डगले
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही

उभ्या-उभ्याने करण्यावर हि फुटले फाटे
पुरुषगंड हा त्याचा हि वर बोलू काही

त्रिशतकी हे स्टेटस आहे लावा पैजा
किती राहिले बाकी त्यावर बोलू काही

हवेहवेसे मुल तुला जर हवेच आहे
नकोनको जे काही त्यावर बोलू काही

शब्द नसू दे कॉमेंट मध्ये काठी म्हणुनी
विसरून सगळे भांडण नंतर बोलू काही

हुश्श......

एक लाजरा न्‌ साजरा मुखडा...

एक लाजरा न्‌ साजरा मुखडा, चंद्रावानी सुजला ग
रोज दाबुन खातोय असा कि देह सारा फुगला ग

ह्या वेस्केलाचा मला इशारा कळला ग
पोट आडव येतय मला कि देह सारा फुगला ग
नको रानी नको नाचू, घरामदी नको नाचू
हितं नको तितं जाऊ, रामदेव शिबिरी राहु
का? ............ हालत्यात !

रेशिम सदरा घालुन सजना चला हो आसन करू
लगबग थोडी हलवुन कंबर बनू या फुलपाखरू
कसा करावा रोज साजनी व्यायाम असला ग

श्वासा रोखुन थोडं वाकुन करू चला हो फुडं
फासफुस फासफुस कपालभाती शिकूया बाबाकडं
लई दिसानं सखा घालुन मांडी बसला ग

बेजार झालो सोडव सजणी पेटका आला अंगा
पायाच्या बोटा धरता धरता भरून आल्या ढांगा
नकोच राणी मुळीच मजला योगा असला ग

नाम घेता मुखी कासवाचे...

आमची प्रेरणा http://www.aathavanitli-gani.com/Song/Naam_Gheta_Mukhi

नाम घेता मुखी कासवाचे
डास डेंगूचा भयभीत नाचे

लारव्ह्या उदरी जन्मला
डबक्या मधि वाढला
वाढणे वेगेपरी ज्याचे

खुप जंतू उरी घेउनी
डसु पाहे संधि साधुनी
करुनिया वहन रोगांचे

मारुनी नाशके सारी
लाविला जाळ्या हि घरी
भय महान डेंगूबळीचे

नित्‌ जळे चक्र कासवी
लोपला डेंगू पाशवी
गुण गाती जगि कासवाचे

पार्टीला येऊन आम्ही काय हो करणार ?...

पार्टीला येऊन आम्ही काय हो करणार ?
कोपर्यात बसून आम्ही 'चिमण्या' बघणार, 'कबुतर' बघणार

उंची पायताणाला भिणार ...लांबच रहाणार
उगीच तसल्या खोगीरींना भाव नाही देणार !

तुमच्या गोडं (?) आवाजातली सुरेल (?) गाणी कोण ऐकणार
मुन्नी ,शीला ,रझीया यांचा फुल टू दंगा मात्र बघणार

जुन्या-गोंडस आठवणींची मैफिल रंगवणार
आत्ता 'त्या' कुठे असतील म्हणत सेंटी सेंटी होणार

सगळ्यांपेक्षा आपण किती भारी हे समजून सुखावणार
तेव्हढ्यासाठी तरी पुढच्या पार्टीला नक्की ..नक्की येणार

लेखकेय...

आमची प्रेरणा Satish Tambe यांची कविता आणि त्यावरील प्रतिसाद ..

https://www.facebook.com/satish.tambe.54/posts/10200769999151242

https://www.facebook.com/satish.tambe.54/posts/10200769999151242?comment_id=5653366&offset=0&total_comments=26&comment_tracking=%7B%22tn%22%3A%22R9%22%7D

लेखकेय
..............................
एकमेकांच्या नादाने वा एकेकट्याने
कितीही ब्लॉग टंकले
तरी वेळ आल्यावर लाईक न करणारे लेखक
हे वाचकाच्या चामड्याचा अंगरखा परिधान केलेल्या
लेखकच असतात

स्टेटस टाकेन तिथे लाईक काढेन
समिक्षा लिहीन त्याच सोनं करेन
वल्गना करणारेही
जेवढ्यास तेवढेच लेखक असतात

' लेखाकोत्तम ' तोच असतो
जो पाडलेल्या कवितेला आपली मानून
तिला वेळप्रसंगी म्हणतो
इदं न मम !

कवड्यांची माळ उभी अजुनि अंगणात...

आमची प्रेरणा Gajoo Tayde याचे स्टेटस आणि त्यावरची चर्चा
https://www.facebook.com/GajooTayde/posts/618068544890555

कवड्यांची माळ उभी अजुनि अंगणात
काव्य त्यांचे ऐकावे हेतु हा मनात !!

आणिति डोळ्यात दीन भाव ओळखीचे
आणिक हातात दिसे बाड लेखनाचे
मी त्यांच्या सापडतो रोज तावडीत.

त्या कविता, त्या गझला, ऐकुनिया चाली
तारकांच मज दिसल्या भर दिवसा खाली
धडधडते हृदय ते विकल अंतरात .

भावासह चालींवर शब्द वाचताना
कवड्यांचे मात्रांचे गणित मोजताना
वेड्यापारी बडबडतो हासूनी घरात.

मी दिधले सोडुनि समिक्षण, ते मागे
धडपडून ते करते स्वप्न मला जागे
भरते ही धडकी मज अजून या उरात

शतकांच्या उतारावरून धावताना ...

आमची प्रेरणा Thoratशेठ ची सुरेख रचना
https://www.facebook.com/groups/uthathev/permalink/539191152810077/

शतकांच्या उतारावरून धावताना खूप दूरवर सोडलायस तू
तुझा अभेद्य फलंदाजपणा, वन्डेच्या निबिड अरण्यातून वावरत
असताना तू झळकवलेली सलग धावसूक्तं आता ऐकू येत नाहीत
कधीच लुप्त झाले आहेत असामन्यतेचे नेत्रदिपक फटके
जगड्व्याळ क्षेत्ररक्षणाच्या चिरेबंदी फटींमधून मरलेले
षटकार आणि चौकार आता अदृश्य झाले आहेत.
---समकालीन फलंदाजाची कथा-दोन या कवितेचा भाग.

शिर्षक वाटेल ते...

आमची प्रेरणा Waghmareशेठची अतिशीघ्र कविता..
https://www.facebook.com/satish.waghmare.31/posts/438130589619292

शिर्षक वाटेल ते..

शुभ्रदेखणी नव धार वारुणी
नवसागर पिंपगर्भा मधुनी
फेकीत चाले आंबट श्वास
जैसे नग्न नदीचे भास
आवळ टायर बाळग बळ
चिरड अशुद्ध शर्करा मळ
भट्टी आपली धपापलेली
वाट पाहती हपापलेली
नव्हाळ प्यारी फ़त्ते होते
महानगरीचे गुत्ते भरते..
छुन्नुक छुन्नुक बाईक भास
लुब्ध मिठी तो मंगल ग्लास...
-----------------------------------------
© नव(सागर)कवी केशवसुमार (महा नग)

किति तुज समजावु सांग ?...

किति तुज समजावु सांग ?
तू नियमा धरुन वाग

हास्यास्पद लेख नवा
स्वतःची फक्त हवा
भाषेला नियम नवा
हा का जाहिरातराग ?

वेलांट्याउकार सले
बाराखडी जीव छळे?
व्याकरण मुळात खुळे
का त्या नादास लाग ?

समुहाचे फेड बंध
गा तिकडे मुक्‍त छंद
एडमिनला नडु प्रचंड
कमरेचे शिरास टांग

पोष्टींचा ओघ अमुप
त्यात राबवी प्रकल्प
अनुलेखन हा र्विकल्प
करू दे त्या अभित्याग

अशुध्दलेखन करा , मुलांनो...

शुद्ध मराठी भाषा मरू दे करू अशी प्रार्थना
अशुध्दलेखन करा , मुलांनो, अशुध्दलेखन करा
अशुध्दलेखन गांगालम्‌, अशुध्दलेखन गांगालम्‌

जेथे व्याकरण तेथे सक्ती
अन नियमांतून नाही मुक्ती
साहित्यातुन या नियमांच्या पुसुया पाउलखुणा

या नियमांनी सारि आपदा
कानामात्रा गळो एकदा
ऱ्हस्वदीर्घचा विनाश होता सौख्य मिळे लेखना

दिव्य दिव्य हा 'सुलभि'कार
भाषे वरती बलत्कार
नव्यास पाहुन छळतो फार हा रिवाज याचा जुना

माझ्याविण पीएमपदी कोण बैसतो ??...

माझ्याविण पीएमपदी कोण बैसतो ??
राजीनामा शस्त्र धरी लोह पुरुष तो

या पदास, मी समर्थ
मोह असे मजसि सार्थ
हाव मला सत्तेची उघड सांगतो

वरहि नव्हे, वचन नव्हे
मज पीएमपद हे हवें
वर्षे मी कैक हेच स्वप्न पाहतो

बैसणार मीच पदीं
'आडवा न ' येइ मधीं !
मोडता कमळाला अता मीच घालितो

विनवु देत सर्व लोक
घालिन ना त्यांस भीक
पाहूं देत वृद्ध मला कोण समजतो

नमो मतंगजापरी
संघ त्यास साथ करी
'श्रीरामा', चाल अशि का तू खेळतो

आता पुन्हा पाऊस येणार ...

आता पुन्हा पाऊस येणार,
मग फेसबुक काळं निळं होणार,
मग कवींना कोंब फुटणार,
मग बदाबदा स्टेटस पडणार,
मग त्यांना कविता होणार,
काय रे देवा...

मग त्या कविता कुणाला दाखवता नाही येणार,
मग त्या ते लपवणार,
मग लपवूनही त्या कुणाला तरी कळावंस वाटणार,
मग त्यांना कोणीतरी डिवचणार,
मग मित्र असतील तर कॉमेंट टाकणार,
आणि मित्र नसतील तर नुसते लाइक करणार,
मग नसतंच कळलं तर बरं, असं वाटणार...
आणि ह्या सगळ्याशी मला काहीच देणं घेणं नसणार...
काय रे देवा...

मग त्याच वेळी दुसऱ्या भिंतीवर चर्चा चालू असणार,
मग त्यात एखादा भजी खातानाचा जुना फोटो टाकलेला असणार,
मग त्याला अबकने लाइक दिलेली असणार,
मग कखगने त्यावर कॉमेंट लिहिलेली असणार,
मग त्यात 'तिचा' उल्लेख आलेला असणार...
मग ती नेमकं अत्ता अशीच भजी खात असेल का? असा प्रश्न पडणार,
मग उगाच दोघतिघं हळहळणार,
मग ना घेणं ना देणं पण फुकटची कांदाभजी खाणार...
काय रे देवा...

मग कवितांचे समूह ओव्हरफ्लो होत जाणार...
मग त्याला ट्यागची आर्जवं लगडणार,
मग खिडकी घट्ट लावून ठेवलेल्या आपल्या भिंतीवर ते टपकणार...
मग प्राव्हसी सेटिंग मधले ऑप्शन अपुरे अपुरे वाटणार,
मग अकौन्ट बंद करून जावंस वाटणार,
मित्रयादीतून त्यांना काढून त्या ब्लॉक यादीत टाकावंस वाटणार...
मग सारं कसं मूर्खासारखं फ्रस्टेट फ्रस्टेट होत जाणार,
पण तरीही फेसबुकवर यायची फ्रिक्वेन्सी फक्त कमी जास्त होत राहणार, पण बंद नाही पडणार,
काय रे देवा...

पाऊस पडणार...
मग कवीला कविता होणार...
मग भिंती भिंतीवर कविता दिसणार,
मग आपल्या मनाच पिंपळ पान लाज सोडून कविता करू पाहणार,
पण आपल्या ते नाही जमणार,
मग आपल्या एकदम खरं काय ते कळणार, मग आपण ओशाळणार,
मग पुन्हा वृत्तीशी परत येणार,
कविता होऊ नये म्हणून लोकांना काळजी घ्यायला सांगणार,
कॉमेंट/लाइकसाठी जालावरती कुडमुडे ' इन्स्पिरेशन कोट' शोधणार,
भज्यांचे फोटो तोपर्यंत मागे पडलेले असणार,
त्या भिंतीवरची चर्चा अनफॉलो केलेली असणार,
मग तीच्या जागी ती असणार, आपल्या जागी आपण असणार,
स्टेट्समधलं वादळ इन्स्पिरेशन कोटच्या लाइकनी भिंतीवर निपचीत झालेलं असणार...
काय रे देवा...

कविता गेल्या वर्षी पडल्या,
कविता यंदाही पडल्या...
कविता पुढच्या वर्षीही पडणार...
काय रे देवा...

सखा रोज लावे मला ग्लास घ्याया...

आमची प्रेरणा Joshiशेठ चे सुंदर विडंबन
https://www.facebook.com/uday.joshi.967/posts/10200108593058102

सखा रोज लावे मला ग्लास घ्याया
नको मोजणे ते नको बाटल्या त्या ...

जरासा कुठे सूर्य जातो न खाली
पिण्याची तयारी सुरु आत झाली
खुशीने पहा तरतरे सर्व काया...

किती माप तोलून हा पेग होतो
कितीही मी भरला तरी खालि होतो
कुणाला कळाव्या पिण्याच्या तऱ्हा या...

न चकणा जीभेला न पाण्यास ओठ
मला लागते रोज पिण्यास नीट
पराजीत माझ्यापुढे होई राया .... ;)

सांग सांग मय्यपन ...

सांग सांग मय्यपन , विकेट पडेल काय ?
बॉलर वरती पैसे लावून , सट्टा मिळेल काय ?

मय्यपन दुप्लेसिस बॉलिंग टाकेल काय ?
बॉल वाईड टाकताना सिगन्ल होईल काय ?

मय्यपन मय्यपन, खरं सांग एकदा
ओव्हरमध्ये नोबॉल, येतील का रे तीनदा

मय्यपन उद्या आहे, सिएस्केचा समना
टॉस जिंकून धोनी घेईल फिल्डिंग बरोबर ना

पाऊस जसा हा पडतो कवड्यांना फुटती पान्हे...

पाऊस जसा हा पडतो कवड्यांना फुटती पान्हे
दचकून जाग मज आली कवितांच्या ढास पुराने.

शब्दात उतरते पाणी, वाचूनच डोळे फिरती
अर्थाचा उडला पारा..... या उथळ निर्मितीवरती.

मज सांग कशी विझवावी ही भद्र कवींची ज्वाला ?
मेल्यांना प्रसवे कविता पाऊस जसा कोसळला.

संदिग्ध कवींच्या ओळी, हा जाल ढवळतो सारा
माझ्या मग भिंतीवरती अनुमतिचा सख्त पहारा !

वास्तव-आभासच्या सीमारेषेवर ये...

आमची प्रेरणा पुन्हा एकदा Thoratशेठची सुरेख कविताhttps://www.facebook.com/harishchandra.thorat.1/posts/174262776062929

वास्तव-आभासच्या सीमारेषेवर ये
तिथल्या ग्रेएरियामध्ये असंभवांचे अपरंपार आयडी आहेत
ते पळव

फेक
मानसशास्त्राची घरंदाज अंगवस्त्रे बिनधास्त
येथल्या एखाद्या निष्पाप नावाखाली घुसून
विरेचीत कर
अज्ञातमीमांसेच्या जमेल तेवढ्या चर्चांनी

कोल नैतिकतेला
प्रत्येक नव्या आयडीबरोबर
ओढून काढ
समाजशास्त्रीय बरगड्यांमधील सैद्धान्तिक लेखण्या
वाहू दे शब्द

वाहू दे मर्यादित अक्कलाना
तोड पाट मोड घाट
प्रगटित हो अज्ञानाच्या राजधानीत हवे असल्यास
रीतसर विजयाचे निशाण फडकवत

ये
वास्तव-आभासच्या सीमारेषेवर
तिथे मी तुझी वाट पाहतो आहे
निरपेक्ष असत्याच्या अनेक अवतारांपैकी एक
मल्हार

तलमलीत वस्त्रातून दिसणारी...

आमची प्रेरणा पुन्हा एकदा Thorat शेठच प्रतिम मुक्तक आणि Tambe शेठ ने दिलेली सुपारी ;)
https://www.facebook.com/groups/uthathev/permalink/507442949318231/

तलमलीत वस्त्रातून दिसणारी अंत:वस्त्रं
बाह्य पृष्ठावरची औरस अनावृत
कितीही पेपरात बांधली तरी पीतपुस्ताकाचा
आक्षेपार्ह भाग डोकावत राहतो तुझ्यामाझ्या आंतरिकतेतमधून

अ‍ॅम्स्टरडॅमच्या गल्यांतुन भटकताना कितीही चोरली पावले
तरी डोळ्यातील सर्वमान्य सांकेतिक नजरा
भिर्भिरीत राहतात अंतर्बाह्य खिडकीच्या पडद्यातील फटी शोधत
गुंफून घेत नैतिक प्रमेयांचे सिद्ध आधार

प्रत्येक राजमार्ग आडवाटेला मिळत राहतो पुन्हापुन्हा
करतात वांझ अदृश्यातीत होण्याचे एकूणएक आदिम प्रयत्न
घेतो लपेटून नैतिकतेचे शेवाळ प्रवाहातील प्रत्येक दगड
तोंड दाखवायला जागा मिळत नाही ना ही राहता येत बुरखाधारी

आपण गुरफटतो बांधले जातो एकमेकांशी अपरिहार्य, ओढतो पाय
एकमेकांचे, प्रहसनीय होतो, होतो विडंबनाचे एक पान निरर्थक

दूरवरून तुझ्या हाका ऐकू येतात...

Thoratशेठच अप्रतिम मुक्तक वाचले आणि क्षणात आमच्या डोळ्यापुढून आमच्या आयुष्यातील काही घटनां तरळून गेल्या
https://www.facebook.com/groups/uthathev/permalink/507085466020646/

संवेदनाशून्य अवस्थेत न-शुद्धीच्या ढगात तरंगताना
दूरवरून तुझ्या हाका ऐकू येतात

काचेच्या पेल्यात पहिल्यधारेचे मद्य ओतले जाते
आणिआयुष्याची सलगता तुटली जाण्याची प्रक्रिया सुरू होते
होते मद्यांची घुसळण संभाषणाच्या परस्परनिगडित संबंधांची
होऊ लागते गोची, स्वनिमांचे कडे कोटाबद्ध व्यवस्था
सीमारेषांचे उल्लंघन होते

होते सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र संपूर्ण गात्रागात्रातून
निमित्तमात्र जाणिवेच्या तळाशी महामायेची पूर्वकल्पना
साकार होऊ लागते जाणिवेच्या पुनर्रचनेतून उभी राहत जातात शकले शकले
संसारिक संवेदनांच्या आंतरलाथातून
अस्तित्वाच्या कडेकपारी दृग्गोचर होऊ लागतात

... दूरवरून तुझ्या हाका ऐकू येत राहतात

काश्मिर ची नार तू ...

आमची प्रेरणा https://www.facebook.com/groups/dyataali/permalink/362269600558205/

काश्मिर ची नार तू
मनातून ही गार तू

फक्त जांगीया तनी
सलमानचा यार तू

चिलीम ओढतो आणि
सांगतोस सिगार तू

अणून उष्ण चाय दे
करून बंद दार तू

मि सांगतो खरेखरे
फरार मी पवार तू

हातभट्टीची बरी
नकोस शोधु बार तू

बोलुन गेली शान हि
प्रचंड बिग-गटार तू

नको लिहूस 'केशवा'
कवी अती सुमार तू

( गेली शान --- आली शान च्या विरोधी --साभार पूज्य )

तुझ्या मळा, माझ्या मळा...

"तुझ्या मळा, माझ्या मळा
बांधू धरणांच्या माळा "
"ताई, आणखी कोणाला ?"
"कर रे दादा घोटाळा !"

"तुज मंडळ, मज समिती !"
"आणखी खाते कोणाला ?"
"वेड लागले ताईला !"
"माल आयता? दादाला !"

"तुज धमकी , मज टिमकी!"
"श्वेतपत्रिका कोणाला ?"
"दादा, सांगू काकांला ?"
"टांग तिकडच्या स्वारीला !"

"सुसू सुसू , करू सुसू "
"वरती प्रेक्षक हसू हसू "
"आझाद मैदानी नको बसू"
"पाण्याविना ना येई सू सू."

"कशी कशी, आज अशी"
"गंमत जनतेची खाशी !"
"अता कट्टी फू दादाशी"
"तर मग गट्टी कोणाशी ?"

कसं काय पाटील बरं हाय का...

कसं काय पाटील बरं हाय का, अहो बरं हाय का ?
काल काय ऐकलं, ते खरं हाय का ?

अहो राव तुम्ही, ते नाही तुम्ही, अहो गॉगलवाले तुम्ही
न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय, नीळासदरावाले तुम्ही
सांगा काय ऐकलं ते खरं हाय का ?

काल म्हनं तुम्ही शिंचनाला गेला, फायलीत धरण इसरुन आला
खरं काय हो पाटील ?
इसरल्या ठायी, गावलं का न्हाई, एक तरि आजवर बाधलंय का ?

काल म्हनं तुम्ही निंबोडीला गेला, कमरंच सोडून बोलून आला
आरंरं
केली टगेगीरी, सकाळच्या पारी, आणि काय शिल्लक र्‍हायलंय का ?

काल म्हनं तुम्ही हितं-तिथं गेला, मुतता मुतता घोटाळा झाला
आगं बया बया
काय झालं पुढं, सांगा तरि थोडं, खाली नका बघु आता लाजताय का ?

वेडात लेखकु भ्याड दौडले सात !...

जालावर उठली फेक आयडी साथ
वेडात लेखकु भ्याड दौडले सात !

ते जमले ठरवून सगळे इप्सित अपले
शहरात सहा पसरूनी फ़ेकले जाळे
'मल्हार' निवडले नाव, ठेवले भोळे
मिसळले समुही चोर सात, निमिषांत
वेडात लेखकु भ्याड दौडले सात !

आश्चर्यमुग्ध टाकून प्रतिसादांना
आकर्षित केले सर्व इथे लोकांना
समूहात शिरले न्याय, गुरुला देण्या
जमविली माहिती शिरून इथे गोषात
वेडात लेखकु भ्याड दौडले सात !

खालून आग, वर आग, आग बाजूंनी,
समजताच त्यांची ही खेळी बेइमानी,
गर्दीत पांगले सात भ्याड वेगानी
नग सात कळाले जे लपले बुरख्यात
वेडात लेखकु भ्याड दौडले सात !

भिंतीवर दिसतिल अजुनि त्यांच्या टाचा
चर्चेत तरंगे अजुनि रंग घाताचा
जालावर उठतो अजुनि रोष द्वेषाचा
पाडली विडंबन कुणि इथे जोषात
वेडात लेखकु भ्याड दौडले सात !

एका समूही होता तो आयडी सुरेख...

गेले दोन दिवस जालावर चालू असलेला फेक आयडीचा सावळा गोंधळ वाचून आमच्या हातून नेहमी प्रमाणे एका चांगल्या गाण्याची वाट लागलीच

एका समूही होता तो आयडी सुरेख
होते लपून त्याला चालवीत सात लोक

सारेच तयास घेती बोलावयास संगे
सर्वांहुनी निराळे तो वेगळेच सांगे
दावूनि बोट त्याला म्हणती हुशार लोक
होते लपून त्याला चालवित सात लोक

सातास खाज भारी,साहित्य चर्चण्याची
भीती परंतु वाटे संबंध बिघडण्याची
जो तो जपीत होता आपापलेच भोक
होते लपून त्याला चालवित सात लोक

एके दिनी परंतु समुहास त्या कळाले
आदर, बूज सारे वार्‍यासवे पळाले
होता करीत गोळा तो माहिती अनेक
साऱ्यास अन कळाले ते लांडगे अनेक

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

इ-विडंबन ...

आमची प्रेरणा Patilशेठ ची धमाल इ-गझल
https://www.facebook.com/yashvant.patil.9/posts/445475015532706

इ-विडंबन
---------------------------

लॉगीन केले , राहून गेले
अन तात माझे ,पाहून गेले

त्या एक्स रेटेड , फाईल सार्‍या
मनोभाव त्यांचे ,हदरून गेले

उरला ना काही ,तिळमात्र डाटा
असे तीनतेरा , वाजून गेले

कुणाचे पहावे ? मी इ-स्वप्न आता
ते चित्र सारीच , डिलिटून गेले

आली अशी ही , मला इ-गरीबी
जगणे असे हे ,त्रासून गेले

पाड पाडुनी विडंबन का रे थकला जोश्यांच्या नंदलाला !...

पाड पाडुनी विडंबन का रे थकला
जोश्यांच्या नंदलाला !

निलाजरेपण कटिस नेसुनी फेड दुज्याचा शेला
आत्मस्तुतीचे बोळे कानी भी न कुणाच्या बा ला
उपहासाच्या शब्दशरांनी कंठस्नान त्या घाला

विषय जो असे त्याच प्रमाणे फिरव जरा शब्दांला
अर्थ अनर्थ करुनी त्यातून काढ जरा हास्याला
रोज नवीन तू प्रसंग घे जो या जाली घडला

स्वतःपुरते लिहित राहावे 'व्वा' आला तर आला
प्रस्थापीत तो असला तरिही जो नडल तो मेला
ह्या बाण्याला नाकारिल जो विडंबना तो भ्याला

निघाली डिलिटुनी ही स्वारी...

गेले काही दिवस जालावर काही कवी लोकांनी चला मी फेबुक सोडतो , चाललो घरी, चाललो पैलतीरी वगैरे वल्गना करणारी कवने प्रसवली ती वाचून समस्त जालकरांनी आनंदून लाईक, वावा कॉमेंट चे पाऊस पडले.. त्याच आनंदात काही लोकांनी आम्हाला एक काव्य प्रसवण्याची सुपारी दिली ... म्हटलं नेकी और पुछ पुछ... हे घ्या काव्य ;)

निघाली डिलिटुनी ही स्वारी

ऐकताच हे खुशीत येई करुनी खातरी घेई
पहा 'लाडका' कवी आपुला फेबुक सोडुनि जाई
हा सुटकेचा स्वर्ग मानती समस्त जालावरी

पडतो पाया तुमच्या आणिक एक मागणे मागू
तुम्ही अम्हाला छळले इतुके नका कुणाला ट्यागू
त्या काव्याच्या भडीमारातुनी सुटका झाली खरी

जावा भाऊ, विसर आजवर जे काही बोललो
नव्हती लज्जा म्हणून तुम्हाला रागावून वागलो
परतुनी येईल मेला पुन्हा एकच चिंता उरी

जीवनात ही घडी कधी न येऊ दे...



दोडका - विकिपीडिया

mr.wikipedia.org

आमची प्रेरणा शोधा म्हणजे सापडेल ;)

जीवनात ही घडी कधी न येऊ दे
झींग्याच्या करीपरी शिराळ* येऊ दे

शेजारील बंगाली आज बोलली
झींगाची भाजी मी आज बनविली
थोडी ही चाखाया तुम्हास देऊ दे

रंगविले मी मनात प्रॉन्स देखणे
आठवता चविस त्या तोंड खवळणे
स्वप्‍नातिल कोळंब्या जीभेस लाभु दे

भाजीत त्या झींगा मी शोधशोधला
झींग्याचा बंगाली अर्थ वेगळा
धक्यातुन आज मला शांत होऊ दे

बापू का असेच मला नित्य हासता
सेटल मी स्कोर करीन शब्द हा दिला
'केशवा'स वाचून हे घाम येऊ दे

*http://mr.wikipedia.org/wiki/दोडका

दाहक...

Digheशेठ ची सुरेख कविता (https://www.facebook.com/ganesh.dighe.942/posts/428299253927233) वाचून आमच्या वर काही वर्षांपूर्वी गुदरलेला एक प्रसंग आठवला

हा मज असण्याचा किंतु
उदरातले घातक जंतु
दंशत अपरंपार निर्हतु
सदेह-विव्हळत उभा मी
देहाचा सांकेतिक सेतू.
(मी डॉक्टर भजतो नित्य
प्रेषितांच्या लेखी स्तुत्य
मी निव्वळ गलीत गात्र
चाळीच्या लांबरांगेत रुतलेला
तो मीच की दाहक 'भग'वंत )

नितंबांच्या हलण्यावरती आवधूत लिहिती काही...

नितंबांच्या हलण्यावरती आवधूत लिहिती काही
आणि त्यांच्या स्टेटसाला क्लांत ही ग येत नाही

नार नाचती टीव्हीत , तमाश्यात काहीबाई
थेटरात पडद्यावर नाचल्या ग काहीकाही
बायका ह्या दुसऱ्यांच्या हाले कुल्याची गोलाई

स्वेच्छा नसे मी बाळा, भाग्य नाचण्याचे भाळी
चरीतार्थ चालवण्याला केली देहाची ही होळी
वस्तूकरण हे अब्रूचे , आता हीच रे पुंण्याई

रित्या पोकळ्या या चर्चा मिळे काय याने हाती
शब्द फक्त उधळून झाले आणि वेळेची ही माती
हुंदका गळ्याशी येता पाहुनिया ही शिष्ठाई

एक बोका...

एक बोका
वाटे तरवडेंना धोका
एक बोका

मांडीवारी छातीवरी
छातीवरी मांडीवारी
ठेवी बायकांच्या डोका

नाही कधी नाहायचे
नुसते बसुनि गिळायचे
हाच याचा हेका

पायाला खेटायचे
गालाला त्या चाटायचे
फक्त मजा, नाही धोका

आमची प्रेरणा Tarawadeशेठ ह्यांना बोक्याचा वाटणारा हेवा ;)

सांगा मिलिंद कुणि हा पाहिला...

सांगा मिलिंद कुणि हा पाहिला
सांगा मिलिंद कुणि हा पाहिला

रासक्रीडा करी फेसबुकी, हो
मेला आहे भारी विषयविचारी
टाकुनि फोटो गोगलधारी
किती मुर्कून बाई हा राहिला
सांगा मिलिंद कुणि हा पाहिला

हेहे आळवितो , हे ब्रिदभुषणा हे
विलाप आम्हांलागी अता ना साहे
फ़ेसबुके वनिता मुखाच्या, हो
कोलाजुनि छबीप्रती नायिकांच्या
जाळनिघे जोशीकुळऱ्हदयाचा
म्हणे केश्याजी हा, जोमि हा पाहिला
सांगा मिलिंद कुणि हा पाहिला

आमची प्रेरणा द्या टाळीवर शोधा ;)

टांग टिंग टिंगा ...

घेऊन या पॉपकोर्न अन घेऊन या शेंगा
थत्त्यांच्या स्टेटस वर घालू या दंगा ...उंग SSSSS
टांग टिंग टिंगा के
टांग टिंग टिंगा के
टांग टिंग टिंगा
के टिंग

नटण्याच्या नादात विसरलाय लेंगा
फ्याशनच्या नावावर दाखवू या 'टांगा'...उंग SSSSS
टांग टिंग टिंगा के
टांग टिंग टिंगा के
टांग टिंग टिंगा
के टिंग

नारळाच्या ट्रेडरशी मेंबरांचा पंगा
एडमीनच्या नावाने करुया हो शिमगा...उंग SSSSS
शिमगा ग पोरी शिमगा ग पोरी शिमगा ग पोरी शिमगा
बोबोबो SSSSSबोबोबो SSSSS.उंग SSSSS
टांग टिंग टिंगा के
टांग टिंग टिंगा के
टांग टिंग टिंगा
के टिंग

खाज...



गाज

Jopaleशेठ आणि Tarawadeशेठ यांनी टाकलेली अलिशियाची स्टेटस आणि Balajiशेठ ची अप्रतिम कविता गाज (https://www.facebook.com/notes/balaji-sutar/गाज/592348777460899) एकामागोमाग एक वाचल्यामुळे आमच्या नेहमी होतो तसा घोळ झालाच...

नाव-प्रोफाइल
सबंध रुतून बसतं
काळिजभर .

घनगर्द रात्री,
ती रेशमी स्मरणं,
दाटी करतात,
मेंदूभर.

मेसेज-
विसरता विसरत नाही
त्या अलीशियाचा,
आणि,
कहाणी-
सांगता सांगवत नाही.

ही खाज,
का छळते, अशी,
निरंतर?

"केश्या" म्हणाला,
तुझी मेलआयडी लिहीलीय, नं, 'तिथे' ,
म्हणून....!!!

---------------------------------------
केशवसुमार,फ्रँकफुर्ट.