एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१३

नच सुंदरि करूं कोपा...

Tarawadeशेठ च्या स्टेटसवरून (https://www.facebook.com/photo.php?fbid=556210874453286&set=a.108404802567231.14179.100001931350708&type=1) आम्हाला फेसबुकवर आमच्या मित्रांचे झालेले काही जुने संवाद आठवले...

नच सुंदरि करूं कोपा ।
मजवरि नको अवकृपा ।
रागानें फ्रेंड लिस्टी लावसि मज चापा ॥

फ्रेंड मज बहु असती ।
परि मर्जी तुजवरती ।
जाणसि हें तूं चित्तीं ।
मग कां ही अशि रीती ।
जरिं मी काही लिहीती ।
तरि तव लाईक मिळती ।
लोभा या मजवरिचा नेऊं नको लोपा ॥

फेस्बुकी पोस्टिला ।
टाकुनि करि शिक्षेला ।
पाडुनियां काव्याला ।
टॅगव्रत करि सकला ।
नोटस अन पेजाला ।
पोकुनि दुखवीं मजला ।
हचि दंड योग्य असे मेल्या तव पापा ॥

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

सांग सांग भोलानाथ, माहिती मिळेल काय ?...

Priyaलीतै च्या " 'सरा'ळलेला बाहुला " ह्या आगामी भयकथेतील आगामी गाण....

सांग सांग भोलानाथ, माहिती मिळेल काय ?
कँडीडेटच्या नावावरून जातss कळेल काय ?

भोलानाथ मसापला फुशिं येतील काय ?
फेस टू फेस फेसाला फेस येईल काय ?

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
निवडणुकीत 'पुरोगामी' जिंकेल का रे यंदा ?

भोलानाथ उद्या आहे मतदानाचा जागर
मतदारांच्या जातीवर फुटेल का रे खापर ?

सर...

सर एक नाव असतं
अध्येक्ष निवडणुकीत तडमडलेलं गाव असतं
सर्वत्र असते तेव्हा साहवत नाही
आता नसल कुठच तरी सुटलो म्हणवत नाही

भिंती पांगतात स्टेटस उठतात
पोरक्या ब्लॉगात उमाळे दाटतात
सर मतामतात तसच ठेउन जातात काही
जातीच्या जातीलाच कळावे अस जा(ता)त सांगुन काही

सर असतो एक धागा
अगाध ज्ञानाचा उजेड पाडणारी जालावरील जागा
ब्लॉग खरडतो तेव्हा त्यांना नसतं भान
पकडून दिली चोरी की सैरावैरा धावायलाही कमी पड़तं रान

सर समुहात नाहीत मग कुणाशी बोलतात कंपूत हंबरणाऱ्या आयडी ?
सर खरच काय असतात ,
जाणत्यात काढता पाय असतात, वासरात लंगडी गाय असतात
'विकी'च्या दुधावरची साय असतात, भौतिकशास्त्राच्या सिद्धांताला हाय असतात

सर असतात जन्माची मजबूरी
सरतही नाही आणि सुधरतही नाही.

-सर/ केशवसुमार

बायनरी to 'हेक्स'...

बायनरी भाषेतील मैलाची दगड असलेली हि (https://www.facebook.com/groups/dyataali/permalink/457990750986089/) 'कविता' फक्त बायनरी भाषेपुर्ती मर्यादित न राहता .. इतरभाषिक लोकांना हि तिचा आनंद घेता यावा ह्या साठी आम्ही ती कविता 'हेक्स' भाषेत भाषांतरीत केली आहे... पुढील काळात वेळ मिळेल तसा ती 'आस्की' भाषेत हि भाषांतरीत करायचा आमचा मानस आहे...

155F
107C0 1818
4AAA4,
10208
15512AA
1FFFFF
0
3C0 10AA
4A954
3F
0
3F
0
1FFFFFF
2AAAAAA
AAAAAA
1C00
AA0
1C2A8
1
1
1
0
0
0
0
.
.
.
.
.
0

----F

'बेला' हे जुलमि गडे...

Patilशेठ तुमच्या ह्या कवितेवरून काही घरात बेलावून चालणारे संवाद आठवले...

बेला हे जुलमि गडे
फेकुनि मज मारु नका
बल्लवगिरी तुमचि पुरी
जिथेतिथे दाऊ नका

घालु किती तूप त्यात ?
भाजू किती सांगु नका !
बोलून हे फिरफिरुनी
डोके अन फिरवू नका

गडबड किती होय मुखी !
हसतील मज सर्वजणी
येतिल का परत उगुनि
दात उगा पाडु नका !

कठिण कठिण कठिण किती...

कठिण कठिण कठिण किती बेला हे बाई ।
ते खाण्याप्रति झटता दंत उरत नाही ॥

भाजुनि तूपात मधुर ठिसूळ भासती ।
खात खात फसवुनी दंतस्थान सोडिती ॥

बेलांचे सुंदरसे चित्र टाकती ।
बघत बघत परि शेवटि सुचत गीत जाई ॥

नमन झुक्याला फेसबुकेश्वराला...

Sandhya Soman यांच्या अप्रतिम नांदी (https://www.facebook.com/gappisht/posts/10201728248799861) वरून
आम्हाला सध्या सर्वत्र सुरु असलेल्या भिंतनाट्याची नांदी पुढेमागे लिहायची वेळ आली तर ती कदाचित अशी लिहिली जाईल असं वाटते ...

नमन झुक्याला फेसबुकेश्वराला
भिंतनाट्याच्या आदिशक्तीला || धृ ||

तूच हास्य अन् लास्य स्वतःचे
तूच गीत गुणगान स्वतःचे
तूच स्टेटस तूच नोट अन्
तूच पेज तू स्तुतीसोहळा ||१||

कंडु-साहित्यिक तुज आचरती
मिळे समीक्षका फुकटच कीर्ती
सारे दुर्मती सजवती भिंती
धर्मजात दे त्रास जगाला || २ ||

---------केशवसुमार.

(दिवा)...

आमची प्रेरणा Pradeep Kulkarni यांची अप्रतिम रचना 'दिवा' (https://www.facebook.com/pradeep.r.kulkarni/posts/10151801021258924)

.........................................................
(दिवा)
.........................................................

गुत्यात या जवळच्या दारावरी उभा मी...
हलकेच सांज येई उतरून भोवताली
चोहीकडे दिवे हे अंधूक लावलेले...
अन संथ, धुंद होती गाणी हि लावलेली ...!

धड सांजवेळ नाही, धड रात्रही न पुरती...
मधलीच वेळ हॅपी आवर्स चाललेली ?
काळोख अर्धमुर्धा चोहीकडे तरंगे...
ह्या रम्यकल्पनेनी गात्रे तरारलेली...!

होणार नृत्यचालू घंटा अशात वाजे...
काळोख-धूर तेथे जमला कणाकणाने...
हळुवार नादलहरी...हलकी प्रकाशवलये
उठती क्षणाक्षणाने...विरती क्षणाक्षणाने...

मी ही अशा क्षणी मग घेतो भरून पेले !
हुरहूर कोणती ना माझ्या उरात दाटे
आलो इथे कशाला, आलो इथेच का मी ?
काहीतरी बरे मज येथेच फक्त वाटे !

कुठली अनाम मदिरा येते...रिचून जाते
...काळोख वाढलेला बाहेर-आत आता
कोणामुळे कळेना अजुनी असा उभा मी...
जुळले तरी न जुळती माझेच हात आता!

जाणीव-नेणिवेचा हा खेळ चाललेला...
मज भोवताल सारा अंधुक होत जाई...
मीही दिवा जणू ह्या क्षितिजात सोडलेला...
हलकेच शुद्ध माझी सोडून दूर जाई !

- केशवसुमार

(आठवणींचा अवरोह ----)

Joshi शेठची सुंदर कविता (https://www.facebook.com/uday.joshi.967/posts/10200994666929395) वाचून आम्हाला आमच्यावर गुदरलेला एक गंभीर प्रसंग आठवला..

आमच्या हि आठवणींचा अवरोह ----

लागुनी टोक अंधुकसे
विलगली नको त्या जागे
उसवले नकळत तेव्हा
ह्या घट्ट जीन चे धागे ....

हदरून जरासा गेलो
घेतले प्रभूचे नाव
गंभीर अवस्था आणि
त्यावर ओळखिचा गाव ....

अवतरली तिन्हीसांजा
बसलो मी निश्चलतेने
अंधार पडू लागता
वाचवले काळोखाने ....

कुणी शेजारून जाताना
अति विस्मयतेने बघते
अन पापण्यांत सर्वांच्या
हलकेच हासणे कळते ....

डुचमळतो आठवणींचा
त्या गर्दसावळा डोह
उमटून तळातून येता
कधी गंभिरसा अवरोह ....

केशवसुमार.

कलात्मकता म्हणा, मुलांनो, कलात्मकता म्हणा...

आमची प्रेरणा उठठेवीवर Upadhyeशेठनी टाकलेले धाडसी कलात्मक फोटो

फोटो बघुनी स्टेटस सुचते करू जुनी वल्गना
कलात्मकता म्हणा, मुलांनो, कलात्मकता म्हणा
प्रस्तरारोहण कल्याणम्‌, प्रस्तरारोहण कल्याणम्‌

अवघड डोंगर निर्भय तरुणी
उभी नग्न प्रस्तरारोहणी
कोनाकोनातुन तिच्या या दिसती यौवनखुणा

या फोटोंतील पहा संपदा
कुणा न वाटो यात आपदा
नग्न दृष्टीचा विनाश होता कला दिसे सृजना

दिव्य दिव्य हा स्तेटस्कार
टाकी धाडसी फोटो फार
सेमीचावट स्टेटस याचा रिवाज आहे जुना