एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०१४

येलेची डिग्री येलेची, डिग्रीही माझी येलेची...

आमची प्रेरणा ... तुम्हला सांगायला हवी का? ;)

येलेची डिग्री येलेची, डिग्रीही माझी येलेची
या डिग्रीचा कागद मोठा, डोळ फाडून आता का हो बघता?

बघा दिल्लीत कमळ फुललं, हो फुललं
बहु मतांनी हो रसरसलं, रसरसलं
मोदी द्वेषान किती जळता, डोळ फाडून आता का हो बघता?

साऱ्याच्यानेली गुऱ्हाळ भरलं, हो भरलं
तुमच्या हातात कोलीत घावलं, हो घावलं
माझ्या कशाला भावाला छळता, डोळ फाडून आता का हो बघता?

तुम्हा कशानं आली जाग?
ठाव हाय कोन ह्या माग
अर्थ बोलण्याचा भलताच लावता, डोळ फाडून आता का हो बघता?

कमळाशी हे जडले नाते धनुष्यबाणाचे...

कमळाशी हे जडले नाते धनुष्यबाणाचे
नि वाटप ठरले "खात्या"चे

मित्रांनी हे सहज उचलिले धनू स्वबळाचे
पूर्ण जाहले न जनकृपेने हेतु अंतरींचे
उभे ठाकलें भाग्य अल्पमत समोर कमळाचे

धुर्त घड्याळी दुरुन न्याहळी सैन्य धनुर्धारी
सपोर्ट देऊन दुबळी केली शिवशक्‍ति सारी
कळू लागलें सर्व हळुं हळू गुपित सत्तेचे

सभात्यागुनी निघता सेना संधी नामी ही
तडिताघातापरी भयंकर नाद 'हो'च होई
तांत्रिकतेने जिंकले बहुमत सदनि नादाचे

गोंधळात हे घडले सगळे, बावरले राजे
मुक्‍त हासतां, नागपुरी मनोमनीं लाजे
त्रस्त जाहले तात्त्विक लोचन क्षणांत संघाचे

हात जोडुनी म्हणे नृपति तो संघप्रमुखासी
"आजच करतो संपर्क मी नैसर्गिक मित्राशी "
आनंदाने खुलले डोळे सेना प्रमुखांचे

संघाज्ञानें उठति भरभर विजयमुग्ध सगळे
अधिर बोल ती, अधिर त्याहुनी सेनेचे बगळे
हपापले ते चरण गाठण्या मंदिर मलिद्याचे

वेशीवरती जसा भरावा ढोरांचा बाजार
तसा चालला 'वर्षा'महली 'खाते' व्यापार
पडद्यामागे मीलन झालें 'माया'-ब्रम्हाचे

झुकले थोडे ते हि, हे हि ठरला व्यवहार
टिव्हीवरती नेते करिती मैत्रीचा उच्चार
'बारा' हाती गाजर पडले मंत्रीमंडळाचे

लाज तत्त्व ही सोड, सर्व तू सत्तेच्या करता
फक्त येव्हढे कळले "केश्या" हे नाटक बघता
कमळाशीं हे जुळलें ऐसे धनुष्यबाणाचे

बहुमताचे साठी गेलो घड्याळासंगे...

बहुमताचे साठी गेलो घड्याळासंगे ।
अन झालो प्रसंगी घोटाळीत ॥१॥

मग लाज नाही तर्क सांगू काई ।
झाले हे जे काही होऊ नये ॥२॥

न मागता लभली साथ ना सोडली ।
लाचारी असली बहुमता बहुमता ॥३॥

म्हणे 'केश्या मेला' सत्ते तुझ्या साठी।
नीतिमूल्ये थिटी पडली ऐसी ॥४॥

मन तळ्यात, मळ्यात...

मन तळ्यात, मळ्यात,
कमळाच्या फुलात

मिच नाकारली मोदीलाट,
तेच आलेया गळ्यात

ऊरी सत्तेचे मृगजळ
झाला पाचोळा उगी तशात

इथे सार्‍यांना सांगतो नाही, मला घाई
आणि चुळबुळ माझ्या मनात

भिडू लागे कमळ घड्याळाशी
तुझा नन्नाचा बाण उरात

माझ्या नयनी वाजले बारा
आणि बहुमत तुझ्या डोळ्यांत

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०१४

सांग सांग भोलानाथ...

सांग सांग भोलानाथ, कमळ तरेल काय?
सेनेमध्ये फूट पाडून बहुमत मिळेल काय?

भोलानाथ घड्याळाची साथ लाभेल काय?
घोटाळ्यांच्या चौकशीत गजर होईल काय?

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
विदर्भाचे वेगळे राज्य जमेल का रे यंदा?

भोलानाथ परवा आहे विश्वासाचा पेपर
विधानसभी पास होऊन वाटेन का मी साखर?

रविवार, २ नोव्हेंबर, २०१४

अ आ आफ़झल, ख ख खान

अ आ आफ़झल, ख ख खान
मी जुना दोस्त दे मला स्थान

प प पतंग मातोश्रीत उडे
द द दिल्लीत शहामामा नडे
घ घ घड्याळ, क क कावा
काका भ्रष्टवादी, तरि तुला हवा?

श श शाखा आशीर्वाद देते
न न नाथाची पंचायत होते
भ भ भटजी, स स ससा
गादीवर बसा नि खुदकन हसा

क क कमळ सत्तेवर डुले
व व वाघ्या जळफळ जळे
ग ग गाडी झुकझुक नाही
'केश्या' मेला हसे खोड गाणे गाई

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०१४

अजुनी लपुनी आहे, मिळता कुणा मिळे ना

अजुनी लपुनी आहे, मिळता कुणा मिळे ना
मिटले असेच दार की बातमी कळे ना!

ब्लूप्रिंट मी करावी कुणीही न त्या भुलावे
बहुमतास मागता मी निवडून एक द्यावे
हे आज का घडावे? समजावणी पटे ना
धरिला असा अबोला की बोल बोलवेना!

की गूढ काही डाव वरचा न हा तरंग
पडणार पक्ष बंद? होणार स्वप्न भंग?
पडलो असा कसा हा? मज आपले कळेना!
अजुनी लपुनी आहे, मिळता कुणा मिळे ना

रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

नटवर दुष्टासमान...

नटवर दुष्टासमान लिहितसे जन्मा,
गुपित उघडले हे, फसवी कुकर्मा ॥

बहुत मनी ते आले होते,
परि मनाला उपरत झाला पुत्र महान ॥

शाळू नि बाजरी...

नुकत्याच झालेल्या गटारी निमित्य WA वर झालेल्या फॉरवर्ड मेसेजांचा मारा ताजा असतानाचा Somanकाकूंची अप्रतिम लयबद्ध कविता (https://www.facebook.com/gappisht/posts/10203565754656359) वाचनात आली...आणि गटारीचा व्हायचा तो परिणाम झालाच...

शाळू नि बाजरी मिसळे जागरी पिंपात कुजली शिवारी
मांडणे रांजणे गाळप साधने रचिली चुलीच्यावरी

एकाच नळीनी बाशपा रेखुनी गाळली सुरासाजणी
तापले उकळे रटरट फेसाळे पिसाट धावली झणी

लाखांची पुडकी पोलिसांच्या घरी पोचली खुशाली अशी
बोभाट गाळण बोभाट विकण बोभाटधंद्याची ख़ुशी

श्यामल सावळी कुंदन कोवळी सजली यमुनातीरी
आम्रतरूतळी मद्याची बुधली थाटली निवांत टपरी

चावळे लिखाण चावळे कवन "केशवा" स्पुरण आले
चावळले मन जाल चावळले काव्याचे वाटोळे झाले.

© केशवसुमार.

बुधवार, १८ जून, २०१४

अनफॉलो केलेली माणसं...

Kavita Mahajan ह्यांच्या (https://www.facebook.com/kavita.mahajan.5/posts/4101564113231?stream_ref=10) कवितेवरून बऱ्याच फेसबुकवासीयांच्या मनातील घालमेल विडंबनात मांडण्याचा मोह टाळता नाही आला ;)

अनफॉलो केलेली माणसं फार वेगळी वागतात

अनफॉलो केलेली माणसं म्हणजे काही आयडी नसतात नुसती
ती एक नेहमीची प्रवृती असतात
ज्यांचा अजूनही काही वेगळा अजंडा असू शकतो
हे माहीतच नसतं आपल्याला

ती येतात चर्चेमध्ये
असतात सतत सोबत विचारांनी
भूतकाळ कधीच बनत नाहीत

पाहत असतात आपल्या सगळ्या हालचाली
आपले कॉमेंट पाहत असतात अव्याहत वाहताना
आपला पोस्ट वाहत राहतात त्यांच्या अ-अस्तित्वातून

अनफॉलो केलेली माणसं
येऊन जातात भिंतीवर, मैत्रीत इतका काळ
आपल्यासोबत व्यतीत करता आलेला नसतो त्यांना
भरपाई करतात. घाबरून दचकून उठतो आपण चर्चेनं
तेव्हा पेटलेल्या चर्चेमागे गुप्त हात असतो तो त्यांचाच.

अनफॉलो केलेल्या माणसांना
संपुर्ण अंफ्रेंड करावं लागतं
निर्धारानं ठरवून.

लागल्या होत्या भुका अन...

आमची प्रेरणा सध्या सुरु असलेली भाऊबंदकी...

लागल्या होत्या भुका अन तू वडे ते आणिले
मी दिलेले सूप त्यांनी आवडीने चाखिले

हार्टच्या रोगामुळे तव गाठ हृदयी वाढली
काळजी काकास त्यांनी हाक मजला घातली
मी स्वतःच्या वाहनानी तुज घरी रे सोडिले

काम माझे, दाम माझे, सर्व होते चांगले
चोर बडव्यांनी तुझ्या पण विठ्ठलाला वेढले
शेवटी वैतागुनी सेनेस मी त्या सोडिले

माध्यमी चर्चा युतीची तू अशी करतोस का ?
थेट करण्या फोन मजला तू असा बुजतोस का ?
मोठेपणा घेण्या तुझे हे सर्व होते चालले

काढ तू खोडी पुन्हा मग काय मी ते सांगतो
काय ही औकात माझी ते तुला मी दावतो
मी घरातील लक्तरांना वेशीवरी या टांगिले

देवा मला रोज एक 'आप'घात कर...

देवा मला रोज एक 'आप'घात कर
आणि माझ्या टीआरपीत पडू दे या भर !

कानाखाली कुणीतरी खेचावी कडक
जनतेला आणि हे ही कळावे तडक
टिव्हीची ह्या सदा असो माझ्यावर नजर !

धरण्याचे सोंग माझे वाटावे खरे
टिव्हीवाले येता मला वाटावे बरे
प्राईम टाईम मध्ये या असतो असर !

कायदा हा तेव्हा नाही कळला मला
विचारले जेव्हा, "बेल हवे का तुला ?"
माराल मी त्याला अन फाटाच्या या वर !

काढल्यावर जेला मध्ये दिस तीनचार
डोके येई ताळ्यावर जीरुनिया पार
शब्दांचाच काय ? पडे तत्वाचा विसर !

पार्लमेंट भरताना...

पार्लमेंट भरताना माझा धरलान हात!
पुरता मी बावरलो, घाबरलो काळजात!

हरलेल्या पक्षातुन आलो मी एकटाच
दूर बरे लपलेले बसलो मागे अधीच
ह्या असल्या पळवाटा पण सारे जाणतात!

सांग कसे तुजसमोर आज पुसू स्वेदपूर?
हात एक तवहाती दुसरा खुर्ची धरुर!
भास तुझा दैत्य कंस! स्पर्श तुझा थरथराट!

मंगळवार, २५ मार्च, २०१४

लोकशाहीचे पाईक तुम्ही...

आमची प्रेरणा गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी आणि उमाकांत काणेकर यांचे सुरेल गीत ..(http://www.aathavanitli-gani.com/Song/Prakashatale_Tare_Tumhi)


लोकशाहीचे पाईक तुम्ही मतदानावर हसा
हसा मुलांनो हसा

तुम्हा सांगतो युक्ती कानी
मते टाकुया दोन ठिकाणी
मुंबई नंतर मतदानाला साताऱ्यातही असा

हारणे न हा धर्म आपुला
जिंकण्यास हा जन्म घेतला
घड्याळाच्या चिन्हावरतीच पुन्हा उमटु दे ठसा

सर्व कसे हे जमवू म्हणता
अरे कशाला त्याची चिंता
मतदानाची शाई पहिली इथर लावुनी पुसा

गुरुवार, १३ मार्च, २०१४

ह री श्चं द्र थो रा त

आमची प्रेरणा पुन्हा एकदा Thoratशेठची नवी पोस्ट (https://www.facebook.com/groups/576341029120570/permalink/601658889922117/?stream_ref=2)

ह री श्चं द्र थो रा त 
मुंबईत नसतात
तेव्हा ते कुठं असतात?

फेसबुकाच्या कंपूबाजी समुहात याच नावाचे गृहस्थ असतात
असे कळले म्हणून शोध घेतला
तर तेथेही ते असत नसतात
असे कळले.

त्यांचे जालावरचे लिखाण चाळलं 
तर तेथेही त्यांनी कथनमीमांसेच्या खाणाखुणा सुबोध करण्याऐवजी
दुर्बोधच ठेवल्या आहेत असे लक्षात आले.

शेवटी त्यांच्या आशयसूत्रांचाच माग काढत राहिलो
तर तो मिळत गेला प्ररुपात गूढपणे कोंबलेल्या कथनव्यवहारासारखा
बहुधा असतातच ते
नसताना
सापडतील आज ना उद्या
जातात कुठे?

पण ते सापडण्यासाठी
त्यांच्या संकेतव्युहाची भानगड
निस्तरायला हवी प्रथम
हे अधिकच अवघड आहे.

बुधवार, १२ मार्च, २०१४

ही कोणाची तरी संहिता आहे...

Thoratशेठच गूढ मुक्तक (https://www.facebook.com/groups/576341029120570/permalink/601259203295419/?stream_ref=2) वाचल्यावर आम्हाला काही दिवसांपूर्वी जालावर उठलेली स्वामित्वाधिकाराची वावटळ आठवली ... (जालावरील मृत अथवा जिवंत आयडींशी ह्या वि-मुक्तकाचा कसलाही संबंध आढळला तर तो निव्वळ योगायोग समजावा )

ही कोणाची तरी संहिता आहे
पण ती कोणाची आहे हे ते सुरुवातीपासूनच विसरून गेले आहेत.
म्हणून तिला ते त्यांचीच संहिता आहे असे म्हणतात.

कल्पनांच्या परस्परयोगायोगाच हे जाळे जालावर
फार पुरातन काळापासून टाकले आहे
या कल्पनांच्या सीमारेषा आता
त्यांना स्पष्ट करता येत नाहीत.

त्या त्यांचाच भाग झाल्या आहेत
त्यांनीच रचलंय त्यांनी
आणि सोडून दिलंय अथांग जालात

ज्याला उल्लेख नाही, परवांगी नाही, श्रेय नाही
पुसलेलं कृतज्ञताहीन पान नुसतं
आणि असंस्कृत असभ्यपणे बरळतोय मी.

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०१४

टोल लावियेला महामार्गी ठायी ।

गेले दोन दिवस विविध दूरदर्शन वाहिन्यावर, अंतर जालावर आणि विविध भिंतींवर सुरु असलेले टोलयुद्ध बघून डोक्याची मंडई झाली ...डोके शांत करण्यासाठी तुकारामचे अभंग(http://www.aathavanitli-gani.com/Song/Khel_Mandiyela_Valavanti) ऐकायला सुरुवात केली ...डोके शांत झाले नाही पण एका अभंगाची वाट मात्र लागली ...

टोल लावियेला महामार्गी ठायी ।
त्रासुनी नागरिक जायी रे ।
बंद अभियान केले नाट्यनामी ।
टोलनाका फोडतील भाई रे ॥१॥

टीव्हीचॅनल करी भवतीने गोळा
हात हालविती बळां ।
कार मर्सिडीज निघे भरधाव ।
अनुपम्य सुखसोहळा रे ॥२॥

येताइलेक्शन आठवणी येती
एकएकी आंदोलने होती ।
निव्वळ टक्के खाती नियमीते ।
पाखंडा जनहित सुचती रे ॥३॥

होतो खळ्ळखट्ट गतिस्थंभ शहर
माजले हे सैनिक वीर रे ।
'केश्या' म्हणे सोपी केली पायवाट ।
फसवावया जनसागर रे ॥४॥

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०१४

रात्रीस खेळ चाले या 'दीड' शाहण्याचा...

फेसबुक आत्मक्लेश उपास सोडून आम्ही पुन्हा उठाठेवीवर परतलो आणि तिथे सुरु असलेल्या चर्चा बघून आम्हाला सुधीर मोघेंच्या ' रात्रीस खेळ चाले' ह्या नितांत सुंदर गाण्याचं विडंबन करायचा मोह आवरला नाही ...

रात्रीस खेळ चाले या 'दीड' शाहण्याचा
संपेल ना कधीही हा खेळ फेबुकाचा

हा समुह अनिवासी जातीय वागतो हा
वर्चस्व दाखवाया आडनाव सांगतो हा
हा शोध थोर लावी हा दूत कायद्याचा

या रात्रीच्या घडीला जालावरी खुशीत
जमतात सर्व कुत्री झुंडीमध्ये मठीत
करतात भ्याड हल्ला हा भोग बहुजनाचा

आभासि या जगाचा अंदाज ना कुणास
वेलरेड भासती ते निघती मनी उदास
जळतात आत सारे हा दोष एनारायचा

रविवार, २ फेब्रुवारी, २०१४

बोकडाच्या रक्तीला चटावले फार ...

गेले काही दिवस जालावरील बिघडलेल्या वातावरणामुळे अचानक विडंबन सुचणे बंद झाले ...जे काही सुचेल त्यात त्याच त्या घटनांचा संदर्भ येत होता...फेसबुक खाते बंद करून जालसंन्यास घ्यावा इतपत डोक्याची कल्हई झाली होती...आपल्याला विडंबन सुचत नाही ह्या कल्पनेन रात्ररात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता ... पण काल कंपूबाजीचे ड्राक्युला Jadhavशेठ मदतीला धावले...त्यांच्या रक्तीच्या पोस्टने बघता बघता शतक केले. तिथल्या काही थोर्थोर लोकांच्या व्यासंगपूर्ण चर्चा वाचल्या आणि आमचा विडंबनाचा बोळा निघाला ...

बोकडाच्या रक्तीला चटावले फार
पोस्ट टाकी शिरीरंगा, जमवले थोर

धनगरी थाळी मिळते, कलेजी चाखले
पुण्यामध्ये सांगा कोठे मिळे मुंडीखुर

फक्तस्मरण नको आता, नको तो विचार
नको साहित्यातिल मजला व्यर्थ ती शिकार

चलाचला चापण्या हो जाऊ कोल्हापूर
'शिरीरंग' 'शिरीरंग'.. बेत करा थोर

बुधवार, २९ जानेवारी, २०१४

आज फेबुकात ब्लॉक खेळतो हरी...

आज फेबुकात ब्लॉक खेळतो हरी
केशवा, जरा जपून उठाठेविवरी !

तो विचित्र लक्षखोर मूढ वागतो
पोस्ट टाकुनी लबाड खोड काढतो
एडमिनास ब्लॉकुनी खुशाल टाकतो
सांगतो जगास शौर्य आपले वरी !

सांग राजीवास आज काय जाहले ?
ब्लॉक लावल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास ब्लॉक ब्लॉक ब्लॉक लागले !
एकटाच वाचशील काय तू तरी !

या इथे अखंड ब्लॉक खेळ रंगला
केशवासवे समूह सर्व दंगला
तो पहा लपून युयुत्सुही हासला
होय ! चालू दे अशीच रोज मस्करी !

युयुत्सु आज कसे जागले...

युयुत्सु आज कसे जागले
लोक हे ब्लॉकमुक्त जाहलें

ब्लॉक कृतीतील ती विक्षिप्ती
उठाठेवी ये पुन्हां प्रचिती
ब्लॉक जाहले लोक किती ते आनंदे नाचलें

पुन्हां लोचनां लाभे दृष्टि
दिसले मज ते , समुही स्पष्टि
साठसाठले शब्द तापुनी गीतातुन वाहिले

शब्दांना ये पुनरपि शक्ति
लगेच सुचली मज वक्रोक्ती
"ऊठ केशवा "- असें कुणीसें सुचकवच बोललें

मेंबर झालें झणी आडवें
दुजा पोस्टीचा अर्थ जाणवे
सेमीचावट स्टेटस पुन्हा समुहावर लागलें

केश्यालागी स्फुरलें लेखन
त्यास युयुस्तु ठरले कारण
तुझ्या कृतीनें उठाठेव हे विडंबने हासलें

सेमिचावट स्टेटसराजा !
काय बांधुं मी त्याची पूजा
नको पुन्हा हे लफडे म्हणुनी त्याला मी ब्लॉकले

दांभिक हो तुमच्यापोस्टी...

फेसबुकी नागरिकाच्या हास्य रोज येते ओठी
दांभिक हो तुमच्यापोस्टी

वावरता फिरता तुम्ही नित्य'सीन' अवघे करता
चालवता अपुल्या भिंती छुप्या उद्देशा करता
परि आठव येता अमुचा शूळ हा उठतसे पोटी

विनोदा विसरला तुम्ही चेष्टेस मुळी ना थारा
गांभीर्यलेऊन नेहमी बौद्धिकाचा होतो मारा
ऐकताच हे हास्याची गालात होतसे दाटी

उगवला दिवस मावळतो अन शीण दाटतो गात्री
मग जीव रमवितो आम्ही जालावर येऊन रात्री
समुहात येउनी पुन्हा गांभीर्य नको ते पाठी

सांगता तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य येथे महती
तुमच्यास्तव तुमचे चेले तुमच्यास्तव जालीलढती
कॉमेंट विरोधी कोणी फक्त टाकण्याची खोटी

समुहाच्या भिंतीवरती पोस्ट टाकली ग बाई...

काल जालवृक्षा खाली Jadhavशेठना ते विचारवंत झाल्याची अनुभूती झाली आणि आणि ते झपाटल्या सारखे स्टेटस टाकू लागले... त्याचे कालचे स्टेटस (https://www.facebook.com/groups/uthathev/permalink/642069925855532/) आमच्या आमच्या डोक्यात खिळा मारल्या सारखे घुसले.. आणि आज जाल संगीत ऐकताना आमच्या हातून एका सुरेख गाण्याचा खून झाला....

समुहाच्या भिंतीवरती पोस्ट टाकली ग बाई
आज माझ्या लेखनाला दाद का ग येत नाही??

सर्व झोपले देश्यात?, घोरतात एनारायी?
बघतात माडीवर वाट जशा वेश्या काही..
वाट पाहते कॉमेंटची इथे तशीच मी बाई

खुमखुमी असे पण नाही, भाग्य 'शतका'चे भाळी
हेच दुःख पचण्यासाठी, अनफॉलो मी कवटाळी..
जगावेगळी ही युक्ती, जगावेगळी चतुराई

जसे मोकळे होण्या थांबे, लांब प्रवासात गाडी
तसेच ही स्टेटससुद्धा, भासतात मजला थोडी..
प्रवासात पुढच्या त्यांचा मला उपयोग नाही

चालत नाही रागराग वा तिरस्कार करून...

आमची प्रेरणा Kavita Mahajan ह्यांचे स्टेटस (https://www.facebook.com/kavita.mahajan.5/posts/3870690941546?stream_ref=1)
आणि जालावरी काही घटना...

चालत नाही रागराग वा तिरस्कार करून
आंतरजालाचा
संकेतस्थळांचा
फेसबुकाचा
समूहाचा
अखेर रहायचं असतं
त्यातच

फुटायचं तर
एखाद्या कवड्यासारखं फुटून
विखरावं असंख्य कवितांनी
कोसळायचं तर कोसळावं
दुर्बोध समीक्षकासारखं भोंगळ लेखांवर
संपायचं तर संपाव फेकआयडीसारखं

या भयाण फसव्या आभासी जंजालात
स्टेटस उगवतात फुलतात कोमेजतात
तुडवली जातात कधी एखाद्या कंपूखाली
तरी उगवतात पुन्हा दुसर्‍या सकाळी
दुसरी स्टेटस
तितकं साधं बनवून टाकावं सगळं चक्र

करावी प्रार्थना :
करून टाक ब्लॉक माझा आयडी

पोस्टी पोस्टी....................

आमची प्रेरणा Sandhya Soman ह्यांची सुरेख कविता (https://www.facebook.com/gappisht/posts/10202281589913043?stream_ref=10) आणि फेसबुका वरील काही घटना...

पोस्टी पोस्टी....................

काव्याची पोस्ट टंकून

उकिडवे बसावे रिफ्रेश बटण दाबत

बारकाईने मापावे किती कॉमेंट मिळतात

प्रस्थापित-सुस्थापित आयडींकडून.

लाईका राजेहो, तसे सांगावे जमवलेल्या मित्रायादिंना.

ट्यागचे बटन दाबलेत तर सक्ती तुम्हाला, त्यांना.

फेक आयडीतले कुचकट सूर मग उंचावतात

अप्रस्थापितांच्या पोस्टकडे बघत.

स्टेटसला आलेल्या न आलेल्यांचे इकडे हिशेब.

कंपूतल्या टवाळ्यांच्या चोचीची

समूह्धार

कोणाला परवडणार.....

केशवसुमार

'केशवा'च्या पाठी ठरविला बेत...

आमची प्रेरणा उठठेवीवर शोधा...

'केशवा'च्या पाठी ठरविला बेत
पालखीचा घाट उठाठेवी ॥

पेटला 'श्रीरंग' 'यपा'ही जोरात
'केश्या' तावडीत सापडला ॥

एड्मिनाची साथ प्राण्याचे पार्थिव
ठरवी 'गौरक्का' प्रसादासी ॥

"संत"-माळेतील मणी शेवटचे
'राज' आणि 'बिका', सोकावती ॥

निखिल्या येशिल का परतून?

आमची प्रेरणा Naikशेठ चे आव्हान ...(https://www.facebook.com/groups/uthathev/permalink/646216388774219/?comment_id=647673315295193&offset=0&total_comments=265) आणि इथल्या काही घटना...

(मूळ कविता जालावर शोधून दिल्याबद्दल नाईकशेठ चे विशेष आभार ..
http://kavitabhavlelya.blogspot.com/2009/04/blog-post.html)

उठाठेवी तू केलेल्या सर्व जरा आठवून!
जातिवाद मिसळल्या तुझिया स्टेटसा वळखून!
प्रतिसादांचे उडता खटके जाशी तू भडकून!
थांब होऊदे त्रिशतक हे कॉमेंटी या भरुन!
कधीतरी तू वाच शांत ह्या तवचुकेची खूण!
विसर समुह, परि अमर्याद जगि राहीं नित्य जपून!
ये आता ये शेवटचे हे झालेले विसरुन !
निखिल्या येशिल का परतून?

केशवसुमार