एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ जून, २०१४

अनफॉलो केलेली माणसं...

Kavita Mahajan ह्यांच्या (https://www.facebook.com/kavita.mahajan.5/posts/4101564113231?stream_ref=10) कवितेवरून बऱ्याच फेसबुकवासीयांच्या मनातील घालमेल विडंबनात मांडण्याचा मोह टाळता नाही आला ;)

अनफॉलो केलेली माणसं फार वेगळी वागतात

अनफॉलो केलेली माणसं म्हणजे काही आयडी नसतात नुसती
ती एक नेहमीची प्रवृती असतात
ज्यांचा अजूनही काही वेगळा अजंडा असू शकतो
हे माहीतच नसतं आपल्याला

ती येतात चर्चेमध्ये
असतात सतत सोबत विचारांनी
भूतकाळ कधीच बनत नाहीत

पाहत असतात आपल्या सगळ्या हालचाली
आपले कॉमेंट पाहत असतात अव्याहत वाहताना
आपला पोस्ट वाहत राहतात त्यांच्या अ-अस्तित्वातून

अनफॉलो केलेली माणसं
येऊन जातात भिंतीवर, मैत्रीत इतका काळ
आपल्यासोबत व्यतीत करता आलेला नसतो त्यांना
भरपाई करतात. घाबरून दचकून उठतो आपण चर्चेनं
तेव्हा पेटलेल्या चर्चेमागे गुप्त हात असतो तो त्यांचाच.

अनफॉलो केलेल्या माणसांना
संपुर्ण अंफ्रेंड करावं लागतं
निर्धारानं ठरवून.

लागल्या होत्या भुका अन...

आमची प्रेरणा सध्या सुरु असलेली भाऊबंदकी...

लागल्या होत्या भुका अन तू वडे ते आणिले
मी दिलेले सूप त्यांनी आवडीने चाखिले

हार्टच्या रोगामुळे तव गाठ हृदयी वाढली
काळजी काकास त्यांनी हाक मजला घातली
मी स्वतःच्या वाहनानी तुज घरी रे सोडिले

काम माझे, दाम माझे, सर्व होते चांगले
चोर बडव्यांनी तुझ्या पण विठ्ठलाला वेढले
शेवटी वैतागुनी सेनेस मी त्या सोडिले

माध्यमी चर्चा युतीची तू अशी करतोस का ?
थेट करण्या फोन मजला तू असा बुजतोस का ?
मोठेपणा घेण्या तुझे हे सर्व होते चालले

काढ तू खोडी पुन्हा मग काय मी ते सांगतो
काय ही औकात माझी ते तुला मी दावतो
मी घरातील लक्तरांना वेशीवरी या टांगिले

देवा मला रोज एक 'आप'घात कर...

देवा मला रोज एक 'आप'घात कर
आणि माझ्या टीआरपीत पडू दे या भर !

कानाखाली कुणीतरी खेचावी कडक
जनतेला आणि हे ही कळावे तडक
टिव्हीची ह्या सदा असो माझ्यावर नजर !

धरण्याचे सोंग माझे वाटावे खरे
टिव्हीवाले येता मला वाटावे बरे
प्राईम टाईम मध्ये या असतो असर !

कायदा हा तेव्हा नाही कळला मला
विचारले जेव्हा, "बेल हवे का तुला ?"
माराल मी त्याला अन फाटाच्या या वर !

काढल्यावर जेला मध्ये दिस तीनचार
डोके येई ताळ्यावर जीरुनिया पार
शब्दांचाच काय ? पडे तत्वाचा विसर !

पार्लमेंट भरताना...

पार्लमेंट भरताना माझा धरलान हात!
पुरता मी बावरलो, घाबरलो काळजात!

हरलेल्या पक्षातुन आलो मी एकटाच
दूर बरे लपलेले बसलो मागे अधीच
ह्या असल्या पळवाटा पण सारे जाणतात!

सांग कसे तुजसमोर आज पुसू स्वेदपूर?
हात एक तवहाती दुसरा खुर्ची धरुर!
भास तुझा दैत्य कंस! स्पर्श तुझा थरथराट!