एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०१४

टोल लावियेला महामार्गी ठायी ।

गेले दोन दिवस विविध दूरदर्शन वाहिन्यावर, अंतर जालावर आणि विविध भिंतींवर सुरु असलेले टोलयुद्ध बघून डोक्याची मंडई झाली ...डोके शांत करण्यासाठी तुकारामचे अभंग(http://www.aathavanitli-gani.com/Song/Khel_Mandiyela_Valavanti) ऐकायला सुरुवात केली ...डोके शांत झाले नाही पण एका अभंगाची वाट मात्र लागली ...

टोल लावियेला महामार्गी ठायी ।
त्रासुनी नागरिक जायी रे ।
बंद अभियान केले नाट्यनामी ।
टोलनाका फोडतील भाई रे ॥१॥

टीव्हीचॅनल करी भवतीने गोळा
हात हालविती बळां ।
कार मर्सिडीज निघे भरधाव ।
अनुपम्य सुखसोहळा रे ॥२॥

येताइलेक्शन आठवणी येती
एकएकी आंदोलने होती ।
निव्वळ टक्के खाती नियमीते ।
पाखंडा जनहित सुचती रे ॥३॥

होतो खळ्ळखट्ट गतिस्थंभ शहर
माजले हे सैनिक वीर रे ।
'केश्या' म्हणे सोपी केली पायवाट ।
फसवावया जनसागर रे ॥४॥

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०१४

रात्रीस खेळ चाले या 'दीड' शाहण्याचा...

फेसबुक आत्मक्लेश उपास सोडून आम्ही पुन्हा उठाठेवीवर परतलो आणि तिथे सुरु असलेल्या चर्चा बघून आम्हाला सुधीर मोघेंच्या ' रात्रीस खेळ चाले' ह्या नितांत सुंदर गाण्याचं विडंबन करायचा मोह आवरला नाही ...

रात्रीस खेळ चाले या 'दीड' शाहण्याचा
संपेल ना कधीही हा खेळ फेबुकाचा

हा समुह अनिवासी जातीय वागतो हा
वर्चस्व दाखवाया आडनाव सांगतो हा
हा शोध थोर लावी हा दूत कायद्याचा

या रात्रीच्या घडीला जालावरी खुशीत
जमतात सर्व कुत्री झुंडीमध्ये मठीत
करतात भ्याड हल्ला हा भोग बहुजनाचा

आभासि या जगाचा अंदाज ना कुणास
वेलरेड भासती ते निघती मनी उदास
जळतात आत सारे हा दोष एनारायचा

रविवार, २ फेब्रुवारी, २०१४

बोकडाच्या रक्तीला चटावले फार ...

गेले काही दिवस जालावरील बिघडलेल्या वातावरणामुळे अचानक विडंबन सुचणे बंद झाले ...जे काही सुचेल त्यात त्याच त्या घटनांचा संदर्भ येत होता...फेसबुक खाते बंद करून जालसंन्यास घ्यावा इतपत डोक्याची कल्हई झाली होती...आपल्याला विडंबन सुचत नाही ह्या कल्पनेन रात्ररात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता ... पण काल कंपूबाजीचे ड्राक्युला Jadhavशेठ मदतीला धावले...त्यांच्या रक्तीच्या पोस्टने बघता बघता शतक केले. तिथल्या काही थोर्थोर लोकांच्या व्यासंगपूर्ण चर्चा वाचल्या आणि आमचा विडंबनाचा बोळा निघाला ...

बोकडाच्या रक्तीला चटावले फार
पोस्ट टाकी शिरीरंगा, जमवले थोर

धनगरी थाळी मिळते, कलेजी चाखले
पुण्यामध्ये सांगा कोठे मिळे मुंडीखुर

फक्तस्मरण नको आता, नको तो विचार
नको साहित्यातिल मजला व्यर्थ ती शिकार

चलाचला चापण्या हो जाऊ कोल्हापूर
'शिरीरंग' 'शिरीरंग'.. बेत करा थोर