एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, ६ मे, २०१५

दिल्लीच्या घरामंदी ...

दिल्लीच्या घरामंदी जादूचं पानी व्हातं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं

'भाऊं'च्या झाडामंदी जादूचं जात पानी
वाढते दीडपट रान हे जोमानी
हसत डुलत मोत्याचं पीक येतं

सांगतो येक कामाचे ऐक
गुपित माझ्या शेतीचं

आयता युरीया, आयते नट्राईट
अमिनो मिथेनाईड देहात माज्या हाय
वाटंनं 'अघ्र्यम'च्या धावत मन जातं

गडनी, सजनी, गडनी सजनी गडनी ग

सांगतो 'भाऊ'राया मातीचं होत सोनं
लिटर पन्नास हे रोजच परीमाण
परसात पूर येतो, जादूचं पाणी व्हंतं

माय मराठी कशी विसरलो?...

माय मराठी कशी विसरलो?
नका विचारु मला !
आज मी पुरस्कार घेतला...

त्या चेकाची ऊब निराळी
नामोजींच्या मंजूळ ओळी
ज्ञानपिठाची रंगत-संगत,
फक्त जागलो तिला...

असे मराठी माझी आई,
देशीवादा कामी येई
परी इंग्रजी शिकवीत होतो,
असे जुना हा लळा...

जगा मराठी समजत नाही
तिथे इंग्रजी मदती येई
इतुके तुम्हा कसे कळेना,
कीव वाटते मला...

आज पप्पुला काय हे जाहले रे...

आज पप्पुला काय हे जाहले रे
तोंड उघडुनी लेकरु बोलले रे

असा लाजरा, बावरा, युवक असावा
म्हणे माउली लेक हा प्रमुख बनावा
असे आगळे चित्र हे रेखले रे

दोन महिने गुप्त असावे
रजा घेउनी धुंद फिरावे
थायलंड हे कामी या चांगले रे

गुपित समजले विपश्यनेचे
चिरंजीव जे मूक सदाचे
उभे राहुनी संसदी बोलले रे

कुणि जाल का, सांगाल का... जुगलबंदी

सध्या दिल्लीत सुरु असलेली आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी बघून आम्हला वसंतराव देशपांडेंनी गायलेलं " कुणि जाल का, सांगाल का" हे गाण का आठवलं काय माहित ...


कुणि जाल का, सांगाल का, कळवाल भुषण यादवा ?
रे माध्यमी जाऊ नका, काढू नका AAPला गळा

आधीच मोदीलाटही देशात होती चालली
परत मतदानास दिल्ली जात होती 'आप'ली
पुर्ण बहुमत देतील हा विश्वास होत वाटला
तेव्हाच प्रेफ्रन्सात मज तू तीसरा सांगितला

सांभाळुनी तेव्हा तुम्हाला मी तरीही घेतले
दिल्लीत होईल हार ऐसी तुम्ही उचलली पाउले
सांगाल का पक्षात याने लोकशाही वाढली?
सर्व समित्यातून तुमची म्हणून नावे काढली

.

.
कुणि जाल का, सांगाल का, सुनवाल का ह्या स्टॅलिना ?
खोट तरी बोलू नको, लाटू नको AAPला मळा

आधीच हरियाणातली मज हार आहे बोचली
परत दिल्लीच्या जयाने टीआरपी तव वाढली
आज पूर्वीचा तसा तो पक्ष नाही राहिला
आताच टीव्हीवर तुझा ड्रामा पुरा मी पाहिला

समजाउनी आम्ही तुला येथे किती सांगितले
एकाधिकाराच्या दिशेने पडली तुझी पण पाउले
सांगाल का त्या लोकपाला, मिटिंग कशी चालली
याचसाठी काय होती पार्टी "आप"ण काढली

विपश्यनेला चला, मुलांनो...

मूक राहुनी अक्कल येइल करू अशी प्रार्थना
विपश्यनेला चला, मुलांनो, विपश्यनेला चला
विपश्यनांति अध्यक्षम्‌, विपश्यनांति अध्यक्षम्‌

जेथे भाषण तेथे फजिती
वाट लावली माझीपुर्ती
दिशादिशांतुन मुलाखतीच्या दिसती पाउलखुणा

या मिडियाने सारी आपदा
तोंडी पडलो इथे कैकदा
मिडियापासून लपून बसता सौख्य मिळे जीवना

दिव्य दिव्य हा साक्षात्कार
जुनीच खोंडे छळतीफार
वारस पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना

झाली माध्यमि चर्चा बिलाची...

झाली माध्यमि चर्चा बिलाची
थाळी झाली उन्तीस रुपयांची

थाळी शाकाहारीच मी खाईन
कशी होईल बातमी पाहीन
असा चालन, असा उभा राहीन
चारचौघांत आहे सांगायची

आहे माझी हीच हतोटी
गूज छोटी हि दावीन मोठी
हसू खोटेच धरुन ओठी
दृष्ट लागल आपोजिशनची

सुट्टीला जातों मी ...

सुट्टीला जातों मी अज्ञातपुरा ।
देतो निज माते अर्ज युवराजेश्वरा ॥

चिंतन बहु थोर होत ।
मिळति न परि उपाय खचित ।
दिग्गी रमेश सर्व येत ।
बरखा निधी सकल जमत ।
न मिळे अशि मौज पुन्हा पाहण्या नरा ॥