एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०१५

इंद्राणिच्या पाठी ...

इंद्राणिच्या पाठी, नवऱ्यांची यादी
भंगली समाधी, मारियांची

साद्य पती राजा दावतो नेणीव
नव्हती जाणीव, मागच्यांची

रोजपडे थोडा नात्यांचा उजेड
मिडियात झाड फॅमिलीचे

अनाडी राहिले ओरड करून
मिडीया, अर्नब, एनडीटिव्ही

"केश्या" म्हणे झाला देशाचा हा प्रश्न
विसरा दुष्काळ, महागाई

ओक्साबोक्शी हसावं...

ओक्साबोक्शी हसावं जीच्या पायी , अशा कविततेचे लफ़डे घेउन तू आलीस
हसलीस फक्त तुच्छतेने...
कचकन् चावा घेतलास माझ्या विडंबक असण्याचा
खिजवलंस... झुंजवलंस....हसलीस
च्यालेंजची भीती घालत माझ्याकडे
तुझी अताची पोस्ट कंपुबाजीवर, वाचतानाच फक्त हासताहेत
अताशा मी फ़िरकत नाही दिवेलागणीच्या वेळी
किंवा शोधतही नाही शब्द कुजबुजत्या समुहातले
वर वर, वर वर, वर वरच राहतो....
इथे तिथे... तिथे इथे

तुमचं ठाऊक नाही ...

आज व्यग्रतेतून थोडा वेळ मिळाला तेव्हा लक्षात आले की बरेच फुलटॉस चेंडू आपल्या हातून सुटले ...तरी हा चेंडू सोडवला नाही  ...

तुमचं ठाऊक नाही ,
पण शिक्रेटग्रूपच्या चर्चेकडे
माझे विषेशपणे लक्ष असते .
एखाद्याच्या चर्चेत बाहेरच्यांची माप काढण्याचे
प्रयत्नपूर्वक भान जेवढे जास्त जाणवते
तेवढा तो ग्रूप मला
अधिक लक्षणीय वाटू लागतो .
बहुतांश शिक्रेटग्रूप हे
बाहेरच्यांची सतत काहीतरी थट्टा करत असतात,
त्यामध्ये आपण शहाणे आहोत आणि बाहेरचा मूर्ख आहे ,
असे अंतस्थ म्हणणे गोवलेले असते .
एक साधं उदाहरण देतो
आपल्या भिंतीवर कुणीतरी येतो
आणि भिंतीवर काय असायला हवे
त्याचे उपदेश करू लागतो
जसे की ,
'' नावापुढे L लावा ''.
तेव्हा मला वाटतं की हेच म्हणणे
- नावापुढे L लावयची ही कल्पना छान आहे नाही
- मी असतो तर नावापुढे L लावले असते
अशा अनाक्रमक रचना करत सुचवता येईल की !
पण नाही ,
लोकांना अक्कल पाजळायची असते
आणि शिक्रेटग्रूप हा मानसीक रोग आहे
हे बहुतेकांच्या गावी देखील नसतं .
व्देषभावनेतून एखाद्या व्यक्तीविषयी
-फार काय आसपासच्या समाजाविषयी-
काहीबाही सुचणे ही सहज प्रवृत्तीच असते …
प्रश्न आहे तो आपले म्हणणे कसे
आणि कोणत्या चर्चेत सांगावे ह्याचा
जेणेकरून चोरूनवाचणाऱ्याला ते
आक्रमक / लादल्यासारखे वाटणार नाही .
सुचल्यानंतर ओपन ग्रुपवर किंवा आपल्या भिंतीवर मांडले तर
कटू वाटणारी गोष्ट देखील सांगता येते
This is nonsense असे म्हणण्या ऐवजी
Thank you for not making sense
असे जोडलेल्या हातांची दृक - जोड देऊन
सांगण्यासारखे सोपे आहे ते !
मात्र त्यासाठी इथल्या शिक्रेटग्रूपवर
सतत लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे असते .
आणि तरीही बाहेरच्याला
ते दर वेळी कळतेच असे नाही.
मुद्दा भान असण्याचा आहे ,

आधुनिकोत्तर साहित्यातील पहिलं पाउल...

आमची प्रेरणा Patilशेठची अफलातून कविताhttps://www.facebook.com/groups/576341029120570/permalink/768804886540849/ वाचून आम्हाला काही आधुनिकोत्तर लेखकू आठवले...

आधुनिकोत्तर साहित्यातील पहिलं पाउल...
..................................
संपादकांच्या गंडी चाटून
ठरवला जाणारा प्रस्थापित लेखक
सोबत प्रलोभनाची सुरनळी

चाकोरीबद्धतेची पाटी
साहित्यमुल्याच्या डोइवर
भादरलेला
प्रतीकात्मक संताप

व्यामिश्र निष्ठेचे जानवे
सोयिस्कर सव्य-अपसव्य
आणि आपद्धर्मात
खुंटीला...

संध्यानंद !
संध्यानंद !!
संध्यानंद !!!

- केश्या

कोणा कशी कळावी, कंपुत काय खोडी...

आमची प्रेरणा गेले काही दिवसातील घडामोडी आणि राजा बढे यांचे कुमार गंधर्व यांनी गायलेलं सुरेख गाणे "कोणा कशी कळावी..."
http://www.aathavanitli-gani.com/Song/Kona_Kashi_Kalavi

कोणा कशी कळावी, कंपुत काय खोडी
शिक्रेटग्रुपची ती असते अवीट गोडी

शोधून दांभिकांना
अचरट स्टेटसांना
भरवीत चर्चिलांची ही करमणूक थोडी

फेबुवरी फिरावे
टिंगल करित जावे
हासोनि चाललेली कंपुत छेडछाडी

दिसती अजाण साने
परि हे फितूर होणे
इथल्या प्रतिक्रियांची करतात ते चहाडी

पोचलेल्या बाबाची ही कहाणी तुम्हाला !...

"वा! सुंदर! " अस म्हटलं ग कोणी
वयस्कर माणसाची चळलेली वाणी
लंपट वाटतो जर तरुण असेल
कस ही बोललं तरी पुरुष फसेल
समजले आहे कटू सत्य ग हे मला
भीती माझी अशी कशी सांगावी मी तिला
कालौघात मध्ये नको कोमेजून जाऊ
स्टेटस टाकून सल्ला फेसाबुकी घेऊ
सांगायाची आहे कधीपासून ही मला...
पोचलेल्या बाबाची ही कहाणी तुम्हाला !

जेव्हा पाळी आलीये ...

प्रत्येकरात्री बायकोस उद्देशून एक स्वगत - भारतीय नवरे

जेव्हा पाळी आलीये
तेव्हाच पाळी आलीय म्हणून सांग
रक्त विस्कटलेलं नसताना
फक्त पॅडला फसण्याइतपत
मी नाहीये मूर्ख का बच्चा
अंग दुखत असेल तरच
अंग दुखतं म्हणून सांग
सर्वांगानं मी भरून आलोय म्हणून
हाडे थिजवत मला घडऊ नकोस देहउपास
दोन दिवसांच्या खाण्याने अजिर्ण्याइतका
मी नाही अद्याप संभोगोत्तम तृप्त
तुझ्या देहाचा रेडियो चोवीस तास भजन लावतो
हे खरंय
पण याचा अर्थ
मी जेव्हा- तेव्हा माळकरी असतो असे नाही
प्रामणिक रहा
मोकळेपणाने स्पष्ट काय वाटतं ते सांग
मी कम्युनिकेशनमध्ये पक्का आहे
संकेतशास्त्राची एबीसीडी मला अवगत आहे
तेव्हा जे काळजात आहे
ते थेट माझ्या काळजात ओत
मूड नसेल तरच मूड नाही म्हणून सांग
प्रत्येक रात्रीचे तेच काय घेऊन बसलीयेस ?
शिष्टाचार साजरा करण्यात कसलं आलंय सुख
एक आहे
पाठ करून झोपून जा
माझ्या मिठीत उशी
लाइट ऑफ कर
झोपेत ती माझी
आणि मग स्वप्नात...........

पोस्ट - फसवी पोस्ट आणि कंपूबाजी नाका...

"पोस्ट - फसवी पोस्ट आणि कंपूबाजी नाका"

पोस्ट चाळत बाहेर पडलो जुन्या भिंतींकडे
मास्तरांच्या भिंतीपाशी नजर आमची अडे
लिंक कॉपी , लिंक पोस्ट आधी करून टाका
आणि मग भागवू चला 'उठाठेवी' भुका!

पोस्ट - फसवी पोस्ट आणि कंपूबाजी नाका
कंपूबाजी नाक्यावरती NRI मारे हाका!

गॉसिपसाठी केंव्हापन आपन तयार हुतो
शिक्रेट ग्रुपमधल्या बाहेर बातम्या कोण देतो ?
भट म्हणे निलकुंड मेला दोन्हीकडे जातो!
आणि त्या भडविच्यांला पुळका सुद्धा येतो"

आमची साली कविता शब्द अश्लीलमधला
मादरxद लिहिवत नाही, म्हणून x टाकला
तुमची पण एक दिवस कंपूबाजी मारेल
एक दिवस तुमचा शब्द तुम्हालाच गाठेल!

नवी भिंत , नवी पोस्ट , आहुती देऊन टाका
उद्या आले अंगाशी तर वर करू खाका
पोस्ट - फसवी पोस्ट आणि कंपूबाजी नाका
कंपूबाजी नाक्यावरती NRI मारे हाका!

कोणास ठाऊक कसा...

कोणास ठाऊक कसा
शाळेत गेला ससा
सशाने पाहिली गीता
डोळा एकच मिटता
गुरुजी म्हणाले ‘मामेकमनुस्मर’
ससा म्हणाला ‘णो Sir !‘

कोणास ठाऊक कसा
“Member” झाला ससा
Madam ने दिला number
सशाने फिरवला झरझर
Message आला “Welcome !”
ससा म्हणाला ‘सांगा रेट!’

कोणास ठाऊक कसा
शीक पडला ससा
सशाने गाठला Doctor
औषध एक अक्सर
Doctor म्हणे “गाईची सू”
ससा म्हणाला सेम्टू यू !

कोणास ठाऊक कसा
Radioत गेला ससा
Radio त होतेच “ते”
वसकन म्हणाले ‘नमस्ते !’
ऐका म्हणाले "मन की बात"
ससा म्हणाला ‘Report card ?’

कोणास ठाऊक कसा
कंपुबाजीत घुसला ससा
ससुलें अपुलें भोळें
जिभल्या चाटती कोल्हे
वर म्हणाले ‘ख़बरदार…
ओरडशील तर करू "सरात्कार !’

आम्ही चोकरं चोकरं या एस एची लेकरं...

आम्ही चोकरं चोकरं या एस एची लेकरं
या सेमीफायनलित ठरली अमुची हार

या अमुच्या खेळावर सदा आभाळाचा जर
या कणखर संघावर इतिहासाची झालर
त्याच्या मनात मनात नांदतेया ती हार

आल्या बरसाती घेऊन मेल्या डकवर्थाची धून
त्या रंगल्या खेळावर घातले विरजण
पोचण्या फायनल ठरलोया बेकार

परदेश दर्शनला अनि जायाचं नि जायाचं जायाचं...

खास Bhatशेठ आणि Nimbalkarशेठ साठी फक्त कंपूबाजी वर सादर आहे केश्या मेल्याच भारुड...

परदेश दर्शनला अनि जायाचं नि जायाचं जायाचं
( आता लगीच काय ? ..... लगीच लगीच )

परदेश दर्शनला अनि जायाचं नि जायाचं जायाचं
( आम्ही येणार ! )

अरे आनंद भक्तांत माझ्या ..... अरे चीनला ?
अरे आनंद भक्तांत माझ्या ..... मंगोलिया ? ..... साउथ कोरिया राहिलीये
अरे आनंद भक्तांत माझ्या ..... अरे बाबा शिंगापूर ..... (हा तिकडंच जाऊया आपलं !)

अरे आनंद भक्तांत माझ्या माईना रे माईना
आनंद भक्तांत माझ्या माईना

गेलो शियानपुरी थेट दिली टेराकोटा भेट
या या सेल्फीची भूक काही जाईना
अरे आनंद भक्तांत माझ्या माईना

गोगल सावळं सुंदर गोजिरवाणं हे मनोहर
नजरेस आणिक काही येईना
अरे आनंद भक्तांत माझ्या माईना

जगफिरतीचा हा खेळ खेळे पंतप्रधान केवळ
विदेश मंत्रिणीला खेळ खेळू देईना
अरे आनंद भक्तांत माझ्या माईना

कंपुबाज केशा दंग करी भारुडी अभंग
या विडंबनाची हौस पुरी होईना
अरे आनंद भक्तांत माझ्या माईना

हे दळण तुझे की कथन खुळे ?...

ऑफिसमध्ये कंटाला आला होता म्हणून कंपूबाजी उघडले कानात गदिमांची जुनी गाणी (http://www.aathavanitli-gani.com/Song/He_Vadan_Tujhe_Ki) लावली होती... पहिलीच चर्चा वाचली आणि नेहमी प्रमाणे एका चांगल्या गाण्याची वात लागली ...

हे दळण तुझे की कथन खुळे ?
का स्टेटस वाचुन कंपू चळे ?

रंजन झाले खूप आजवर
वदन जणू हे असभ्य घागर
फेसबुकि तव रूप मनोहर-
कंपूबाजी वर झळकले

कुठे मित्रांचा मेळा लपला ?
बघेच उरले, म्हणले "मि तिला"
यासाठी हा उपाय सुचला
फ्रेंड ओनली सेटिंग भले

बघा टीपीचा सोर्स मुकला !
कंपूबाज हा विवेक वदला
मतकरी तो, अन हा निखल्या
हलकट "केश्या" काव्य वळे

नवसागर भारत होवो, दिनरात झिंगुनी राहो

कवीश्रेष्ठांचे मनोगत ...

नवसागर भारत होवो, दिनरात झिंगुनी राहो

हे रांजण वरि बांधियले, अग्नीला खालून दिधले
मद्यार्क आत हे उरले, मी सिद्ध भरायाला हो

पिंपास रोज सजवीन, सर्वस्व त्यात अर्पीन
मदिरा शुद्ध गाळीन, या बंधु पिण्याला या हो

हातांत ग्लास घेऊन, ग्लासास ग्लास जोडून
चिअर्सचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो

करि दिव्य बाटली घेऊ, प्रिय मदिरागीते गाऊ
विश्वास पूर्ण ती रीचवू , घरि आज निजपदे जाहो

या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे पेय न जावो व्यर्थ, सरकारमन्यता होवो

हे मद्य थोर होईल, वैभवे ब्रांड वाढेल
जगतास मान्य देईल, तो सोन्याचा दिन येवो

असे असे करायाचे ?...

असे असे करायाचे ?
करायाचे आहे मला

लागतात गाड्या जवा
व्हरांड्यात व्हरांड्यात
सोडायाची आहे हवा

करायाचे
कुठे ? कुठे आणि केव्हा ?
कसे ? आणि कुणापास ?
इथे साऱ्या कंपूलाहा
सेमिचावट येतो वास

कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का त्या चालका ?...

डमीनतै च्या हस्ते श्री श्री सेमिचावट Upadhyeशेठ ह्यांच्या चरणी अर्पण

कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का त्या चालका ?
गाडी इथे लावू नको, वाचून घे अमुचा फळा

आधीच निघण्या देर ही आम्हास होती जाहली
त्यात आता दार अडवुन देत गाडी थांबली
कार पार्किंगचा असा हा त्रास होऊ लागला
आताच कंपूने मला हा तोडगा जालिम दिला

पंक्चराया चाके ड्रिलाला मी जसे हे घेतले
इतक्यात मेली वाजली त्या चालकाची पाउले
सांगाल का त्या चालका, की पार त्यांची फाटली
आणि काही बोलण्या आधीच गाडी काढली

'गे' 'ले' 'ते' अन 'सगळे'!...

मनाजोगता निकाल मिळता भरले त्यांचे डोळे
एकमेकां असे चुंबिले
'गे' 'ले' 'ते' अन 'सगळे'!

इंद्रधनुचा बांधुन झेंडा गच्चं-आलिंगित झाले
परस्परांनी दिले-घेतले
'गे' 'ले' 'ते' अन 'सगळे'!

हरितकेशरी निळेजांभळे पीतलाल हे ल्याले
अनेकांनी चित्र बदलले
'गे' 'ले' 'ते' अन 'सगळे'!

फेसबुकीचे हे देखावे बघुनी "केश्या" बोले
नवनव चाळे रोज चालले
'गे' 'ले' 'ते' अन 'सगळे'!

मज रोजच कानी भ्रमर सांगतो काही...

मज रोजच कानी भ्रमर सांगतो काही
मी गुनगुन ऐकुनी लिहिती होते बाई

तो वदलासी मज गोड येऊनी कानी
प्रतिभेचे अगणित पराग दे फुलराणी
सांगते तुम्हा 'हो असेच सुचते' बाई

जे लिहू नये ते लिहिले कवयत्रीने
हे कोलीत शोधून अणले शर्मिलेने
कंपूत अचानक थरार सुरु हा होई

झाली गहाल बुद्धी शहाची...

झाली गहाल बुद्धी शहाची
गोळी दिली पंचवीस वर्षाची

हाळी अच्छे दिनाची ह्यो देईल
असे सत्तेत कमळास आणील
जस बोलेल, तसं न चालेल
जुमलेबाजी आहे सांगायची

त्यांची आहे रीत चोरटी
गूज झाकून ठेवील पोटी
अस चुकून येतंय ओठी
हाय लागल ह्याला जनतेची

माझ्या पोस्टीची हि धिंड त्यांनी काढली....

आमची प्रेरणा कंपूबाजी वरील 'कोलगे'ट प्रकरण...

गुप्तजनांचे, स्क्रीन शॉटनी, गुपित फ़ोडिले या हो
क्लोज ग्रुपातील रंगली चर्चा, देते वाचा हो !

माझ्या पोस्टीची हि धिंड त्यांनी काढली
कशी कंपूबाजी थट्टा पहा चालली !

जालावरी निर्मळ होतं फेसबुक गाव
सुखी समाधानी होतं रंक आणि राव
तेथे लेखनांन माझी किर्ति वाढली
कशी कंपूबाजी थट्टा पहा चालली !

अशा गावि होत्या एक लेखिका ज्वलंत
प्रस्थापित म्हणती त्यांना, कुणी नामवंत
त्यांना 'मनातले' पोस्ट हाती लागली
कशी कंपूबाजी थट्टा पहा चालली !

मस्करी करावी इच्छा लेखिकेस झाली
मजेसाठी पोस्टमाझी कंपूबाजी नेली
मस्ती मूड मध्ये कंपूबाजी पेटली
कशी कंपूबाजी थट्टा पहा चालली !

पिसाळलेल्या कंपूने त्या थयथयाट केला
उडवण्या खिल्ली सारा ग्रूप गोळा झाला
त्यांनी लाज-भीड-नीती सारी सोडली
कशी कंपूबाजी थट्टा पहा चालली !

हितचिंतकाच्या पायी समाजाला डाव
टोळक्यात ओळखीचे हि सापडल नाव
त्याला ट्यागची हि दोरी मी बांधली
कशी कंपूबाजी थट्टा पहा चालली !

खुळी मला कळला नाही, मुळी त्याचा खेळ
मनोभंग झाला माझा, मित्र ठरी फोल
त्याला लाज गावा मध्ये मीहि आणली
कशी कंपूबाजी थट्टा पहा चालली !

फेसबुकी फसगत झाली, तिचा हा तमाशा
जळुनिया गेली होती लिहायची इच्छा
पण काही मित्रांनी समजूत काढली
कशी कंपूबाजी थट्टा पहा चालली !

याची जाली त्या साऱ्यांना दावले मरण
स्क्रीनशॉट करूनी उघडे रचिले सरण
त्यांच्या कर्मसोहळ्याची यात्रा चालली
कशी कंपूबाजी थट्टा पहा चालली !

'L' केशवसुमार