एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

गुजरात निवडणूक आमच्या नजरेतून

गुजरात निवडणूक आमच्या नजरेतून
१.
रागा बदलेना, रागा चालेना
रागा शर्थ करी, सत्ता काही मिळेना
गेला 'युपि'च्या बनी
म्हंटली 'अख्खि'सवें गाणी
त्यांनी गळ्यांत गळे मिळवून रे
गेला गुजरात बनी
रंग उधळले रणी
यज्ञोपवित मिळाले वरदान रे
चल ये रे, ये रे गड्या
बोलु कडू बदलू पगड्या
खेळु धर्म धम् पोरी धम् पोरी धम्
हे पक्षाचे अंगण
तुला दिले आहे आंदण
बिनविरोध आला निवडून रे
धन्य लॉजिकचे धडे
यांची धाव आलूकडे
सोने करू शुद्ध निर्माण रे
रागा जिथे आला बोलून
कमळ तिथे आले फुलून
कोण हा - रागा? जाणती सारे जण रे?
२.
विकास बोलेना, विकास चालेना
विकास खंत करी, काही केल्या होईना
गेला 'युपि'च्या बनी
म्हंटली लव्हजिहाद गाणी
त्यांनी त्वेषात गळे फाडून रे
गेला गुजरात बनी
जात दरवळली जनी
मतापुढे विसरले पदभान रे
चल ये रे, ये रे गड्या
बोलु रडू बदलू पुड्या
खेळु जुम्ला जुम्‌ पोरी जुम्‌ पोरी जुम्‌
हे देशाचे अंगण
तुम्हां दिले आहे आंदण
उणे करू नका दोघेजण रे
जन भाववाढीने रडे
यांची धाव बाह्याकडे
आपण करू परकिय धोरण रे
कमळ फुली आला फुलून
'तेजी' मध्ये गेल्या विसरून
कोण मी - विकास ? कोठे दोघेजण रे ?

सोमनाथ पोहचता...

सोमनाथ पोहचता हेच उमजले नवे
जानवे अता त्वरित घातले मला हवे
लगेच ट्वीट टाकली, टीआरपी हि बहरली
मिडिया सुखावली हासली स्वत:सवे
नवीन सोंग "केशवा" नवीन धर्मसोबती
बदलले कसे किती, रंग रंग आठवे

उघड्या पहा जहाल्या ...

८ नोहेंबर रात्री ८ नंतर देशभरातील प्रत्येक घरात हे गाण वाजत होत ... उघड्या पहा जहाल्या नोटा घरातल्या लपवुनी ठेवल्या ज्या अंतःपुरातल्या सांगू कशी जमवली जिव्हा हि अडखळे नवऱ्यास सांगताना गुपितास आतल्या उठती तरंग देही हळुवार मग खुशीचे स्मरताच बायका त्या मजला भिशीतल्या हासोनिया विचारी पतीदेव दंगलेले तू ढापल्यास होत्या नोटा खिशातल्या

आज अचानक नोट उडे

आज अचानक नोट उडे

भलत्या वेळी भलत्या मेळी
असता डोळा 'ट्रंप'कडे

नजर वळविता सहज टिव्हीवरी
एकाएकी पंप्र पुढे

दचकुनि जागे सर्व निजेतुन
क्षणात काळे धन उघडे 

गूढ खूण ती कळून ना काळून
जना अतिविश्वास नडे

निसटुनि गेला संधीचा क्षण
"केश्या" मेला व्यर्थ रडे

कटु योजना ही ...

“संगीत #नोटबंदी” ह्या नाटकातील हे नाट्यगीत सध्या बरेच जण गाता आहेत... कटु योजना ही । "नमो"ची । अजि साहू कैसा । मज बल ना ॥ ढीगभर पैसा जरि मम घरी । परि सुख नाही हीच दुष्ट घटना ॥

मी बसता 'जेट' प्लेनी...

मी बसता 'जेट' प्लेनी माझा गळा दाबला । सुंदरीस कथिता सारे । उतरवले मजला ॥
असुनि खास स्नातक घरचा । म्हणति चोर मजला ॥
सौख्य-भोग मिळती सारे । कष्ट काय मजला ॥
मिडियाच माझी आता । होत पाठशाला ॥

नको वित्तमंत्र्या ...

नको वित्तमंत्र्या सेस आणी लावू खर्च हा सर्वथा वाढू पाहे द्रौपदीचे वस्त्र द्युती फेडियेले मजलागी जाहले तैसे देवा तुजविण ठावं न दिसे त्रिभुवनी दावा अच्छे दिन आता तरी कोकलूनी काय जाहला विकास ठरे “केश्या” आज नमोरुग्ण

मंदिरात अंतरात होत स्कॅन आहे

मंदिरात अंतरात होत स्कॅन आहे नाना देही नाना रूपी इथे दैत्य आहे
तीच मांगल्याची मूर्ती, तीच आदीशक्ती तीच अंबा, तीच दुर्गा, सरस्वती आहे
संकुचित विचारत, पुजाऱ्याच्या चिंतनात तोच ध्यास, तोच माज, होत ऱ्हास आहे
हेच सत्य, स्त्रीत्वही , निसर्गाचा नियमही तोच ऐल, तोच पैल, आदि अंत आहे

गाय बिहारी कुठे पावली

गाय बिहारी कुठे पावली कुठे निवारा मला ? आज मी पराभूत एकला... त्या लाटेची ऊब निराळी अन जुमल्यांच्या मंजूळ ओळी विजयाची ती रंगत-पंगत, अंतरलो मी तिला जरी नेमले खास शिपाई हिंदुत्व ही न कामा येई कशी विसरली प्याकेजाला, कसा घोटला गळा (मूर्ख मुळी हि जनता नाही मत पेटीतून उत्तर देई या हरण्याने आता येऊ दे , अक्कल थोडी मला )

त्यांनीच ओढले ग, माझ्या मनीं न होते

आमची प्रेरणा जालावरची हि बातमी त्यांनीच ओढले ग, माझ्या मनीं न होते टाळून दूर त्याला थोडी उभी मी होते करपाश तोचि आले कंठी गडे तयांचे भांभावल्या मनाने मी ग अबोल होते अपराध काहि नसता शिक्षा मला मिळाली माझ्याच मिडियाची मी बंदिवान होते दिनरात ट्वीटवरचे बेबंद ट्वीटणे ते असते हतात जर का, मी विसरलेच होते

टॅग लावला...

सूर्य उगवला, पिसी उघडला, फेसबुक बघणार फेसबुक बघणार, झुक्याला माझा नमस्कार अग, ग..... टॅग लावला देवा रे देवा..... टॅग लावला आता काय मी करू..... टॅग लावला अरे टॅग लावला, रे टॅग लावला, रे टॅग लावला, हो महाराज, महाराज काय झाले काय एकाएकी ? पेज, फोटो टॅग लावला तो नोटिफिकेशन भिंतीसी आला त्याने माझा फिड बिघडला काव्य स्टेटस अति दारूण मज टॅग मारिला ज्यानं सर्वांना नोटिफिकेशन जाण, त्या स्टेटसाची या टॅगाला उतारा, अनटॅग आधी मारा अनटॅग म्हणजे काय ? टॅगने जर नोटीफ़िकेशनचा फुगा फुगला असेल तर, टीक काढून थोडीशी हवा कमी करा. प्राव्हसीसेटिंगचा लावा पहारा, टॅग स्टेटस न येती झरझरा प्राव्हसी उतारा घेऊन अवघे टॅग काढून भिंतीवर आलेली भुणभुण, शांत केली 'केशवा'ने

या चिमण्यांनो परत करा रे, पुरस्कारा अपुल्या

या चिमण्यांनो परत करा रे, पुरस्कारा अपुल्या चालल्या अतिगमजा चालल्या कैक दिसांनी येईल तुमच्या प्रसिद्धिला पूर अशाच वेळी रहाल कैसे मिडियातुन दूर बकबक करितो टिव्ही उगाच चर्चा या रंगल्या जवळ जवळ हो विस्मृतीमध्ये होता, तुम्ही काही अजून होता जिवंत इतुके, कुणाहि स्मरत नाही शाली, पैसा मानमरातब परत करा सगळ्या अवतीभवती होत्या चालू हिंसा त्या तुमच्या फरक न पडला तुम्हां तेव्हा कधिही पण त्यांचा मग बाळांनो, का रे आता, वाटा ह्या धरल्या