एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, २९ जानेवारी, २०१४

आज फेबुकात ब्लॉक खेळतो हरी...

आज फेबुकात ब्लॉक खेळतो हरी
केशवा, जरा जपून उठाठेविवरी !

तो विचित्र लक्षखोर मूढ वागतो
पोस्ट टाकुनी लबाड खोड काढतो
एडमिनास ब्लॉकुनी खुशाल टाकतो
सांगतो जगास शौर्य आपले वरी !

सांग राजीवास आज काय जाहले ?
ब्लॉक लावल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास ब्लॉक ब्लॉक ब्लॉक लागले !
एकटाच वाचशील काय तू तरी !

या इथे अखंड ब्लॉक खेळ रंगला
केशवासवे समूह सर्व दंगला
तो पहा लपून युयुत्सुही हासला
होय ! चालू दे अशीच रोज मस्करी !

युयुत्सु आज कसे जागले...

युयुत्सु आज कसे जागले
लोक हे ब्लॉकमुक्त जाहलें

ब्लॉक कृतीतील ती विक्षिप्ती
उठाठेवी ये पुन्हां प्रचिती
ब्लॉक जाहले लोक किती ते आनंदे नाचलें

पुन्हां लोचनां लाभे दृष्टि
दिसले मज ते , समुही स्पष्टि
साठसाठले शब्द तापुनी गीतातुन वाहिले

शब्दांना ये पुनरपि शक्ति
लगेच सुचली मज वक्रोक्ती
"ऊठ केशवा "- असें कुणीसें सुचकवच बोललें

मेंबर झालें झणी आडवें
दुजा पोस्टीचा अर्थ जाणवे
सेमीचावट स्टेटस पुन्हा समुहावर लागलें

केश्यालागी स्फुरलें लेखन
त्यास युयुस्तु ठरले कारण
तुझ्या कृतीनें उठाठेव हे विडंबने हासलें

सेमिचावट स्टेटसराजा !
काय बांधुं मी त्याची पूजा
नको पुन्हा हे लफडे म्हणुनी त्याला मी ब्लॉकले

दांभिक हो तुमच्यापोस्टी...

फेसबुकी नागरिकाच्या हास्य रोज येते ओठी
दांभिक हो तुमच्यापोस्टी

वावरता फिरता तुम्ही नित्य'सीन' अवघे करता
चालवता अपुल्या भिंती छुप्या उद्देशा करता
परि आठव येता अमुचा शूळ हा उठतसे पोटी

विनोदा विसरला तुम्ही चेष्टेस मुळी ना थारा
गांभीर्यलेऊन नेहमी बौद्धिकाचा होतो मारा
ऐकताच हे हास्याची गालात होतसे दाटी

उगवला दिवस मावळतो अन शीण दाटतो गात्री
मग जीव रमवितो आम्ही जालावर येऊन रात्री
समुहात येउनी पुन्हा गांभीर्य नको ते पाठी

सांगता तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य येथे महती
तुमच्यास्तव तुमचे चेले तुमच्यास्तव जालीलढती
कॉमेंट विरोधी कोणी फक्त टाकण्याची खोटी

समुहाच्या भिंतीवरती पोस्ट टाकली ग बाई...

काल जालवृक्षा खाली Jadhavशेठना ते विचारवंत झाल्याची अनुभूती झाली आणि आणि ते झपाटल्या सारखे स्टेटस टाकू लागले... त्याचे कालचे स्टेटस (https://www.facebook.com/groups/uthathev/permalink/642069925855532/) आमच्या आमच्या डोक्यात खिळा मारल्या सारखे घुसले.. आणि आज जाल संगीत ऐकताना आमच्या हातून एका सुरेख गाण्याचा खून झाला....

समुहाच्या भिंतीवरती पोस्ट टाकली ग बाई
आज माझ्या लेखनाला दाद का ग येत नाही??

सर्व झोपले देश्यात?, घोरतात एनारायी?
बघतात माडीवर वाट जशा वेश्या काही..
वाट पाहते कॉमेंटची इथे तशीच मी बाई

खुमखुमी असे पण नाही, भाग्य 'शतका'चे भाळी
हेच दुःख पचण्यासाठी, अनफॉलो मी कवटाळी..
जगावेगळी ही युक्ती, जगावेगळी चतुराई

जसे मोकळे होण्या थांबे, लांब प्रवासात गाडी
तसेच ही स्टेटससुद्धा, भासतात मजला थोडी..
प्रवासात पुढच्या त्यांचा मला उपयोग नाही

चालत नाही रागराग वा तिरस्कार करून...

आमची प्रेरणा Kavita Mahajan ह्यांचे स्टेटस (https://www.facebook.com/kavita.mahajan.5/posts/3870690941546?stream_ref=1)
आणि जालावरी काही घटना...

चालत नाही रागराग वा तिरस्कार करून
आंतरजालाचा
संकेतस्थळांचा
फेसबुकाचा
समूहाचा
अखेर रहायचं असतं
त्यातच

फुटायचं तर
एखाद्या कवड्यासारखं फुटून
विखरावं असंख्य कवितांनी
कोसळायचं तर कोसळावं
दुर्बोध समीक्षकासारखं भोंगळ लेखांवर
संपायचं तर संपाव फेकआयडीसारखं

या भयाण फसव्या आभासी जंजालात
स्टेटस उगवतात फुलतात कोमेजतात
तुडवली जातात कधी एखाद्या कंपूखाली
तरी उगवतात पुन्हा दुसर्‍या सकाळी
दुसरी स्टेटस
तितकं साधं बनवून टाकावं सगळं चक्र

करावी प्रार्थना :
करून टाक ब्लॉक माझा आयडी

पोस्टी पोस्टी....................

आमची प्रेरणा Sandhya Soman ह्यांची सुरेख कविता (https://www.facebook.com/gappisht/posts/10202281589913043?stream_ref=10) आणि फेसबुका वरील काही घटना...

पोस्टी पोस्टी....................

काव्याची पोस्ट टंकून

उकिडवे बसावे रिफ्रेश बटण दाबत

बारकाईने मापावे किती कॉमेंट मिळतात

प्रस्थापित-सुस्थापित आयडींकडून.

लाईका राजेहो, तसे सांगावे जमवलेल्या मित्रायादिंना.

ट्यागचे बटन दाबलेत तर सक्ती तुम्हाला, त्यांना.

फेक आयडीतले कुचकट सूर मग उंचावतात

अप्रस्थापितांच्या पोस्टकडे बघत.

स्टेटसला आलेल्या न आलेल्यांचे इकडे हिशेब.

कंपूतल्या टवाळ्यांच्या चोचीची

समूह्धार

कोणाला परवडणार.....

केशवसुमार

'केशवा'च्या पाठी ठरविला बेत...

आमची प्रेरणा उठठेवीवर शोधा...

'केशवा'च्या पाठी ठरविला बेत
पालखीचा घाट उठाठेवी ॥

पेटला 'श्रीरंग' 'यपा'ही जोरात
'केश्या' तावडीत सापडला ॥

एड्मिनाची साथ प्राण्याचे पार्थिव
ठरवी 'गौरक्का' प्रसादासी ॥

"संत"-माळेतील मणी शेवटचे
'राज' आणि 'बिका', सोकावती ॥

निखिल्या येशिल का परतून?

आमची प्रेरणा Naikशेठ चे आव्हान ...(https://www.facebook.com/groups/uthathev/permalink/646216388774219/?comment_id=647673315295193&offset=0&total_comments=265) आणि इथल्या काही घटना...

(मूळ कविता जालावर शोधून दिल्याबद्दल नाईकशेठ चे विशेष आभार ..
http://kavitabhavlelya.blogspot.com/2009/04/blog-post.html)

उठाठेवी तू केलेल्या सर्व जरा आठवून!
जातिवाद मिसळल्या तुझिया स्टेटसा वळखून!
प्रतिसादांचे उडता खटके जाशी तू भडकून!
थांब होऊदे त्रिशतक हे कॉमेंटी या भरुन!
कधीतरी तू वाच शांत ह्या तवचुकेची खूण!
विसर समुह, परि अमर्याद जगि राहीं नित्य जपून!
ये आता ये शेवटचे हे झालेले विसरुन !
निखिल्या येशिल का परतून?

केशवसुमार