एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, ५ जुलै, २०२१

कशि झालीय माझी दैना...

 https://www.facebook.com/aniruddha.abhyankar/posts/4172589449495692:26

कशि झालीय माझी दैना । रे मला डांगडिंग बिगर करमेना !
घडिभरी माझिया मना, चैन पडेना, झोप येईना,
रे मला डांगडिंग बिगर करमेना !
मी राघु ती माझी मैना । परी एक प्रॉब्लेम आहे ना ।
हा पोरांचा शेजार, करी बेजार, संधी देई ना,
चैन पडेना, रे मला डांगडिंग बिगर करमेना !
कोणी कांपुबाज हो‍उनि यावे । फिलाडेल्फि औषध द्यावे ।
मग चुंबन साखरपाक, मिठीचा लेप, माझी चैना,
कंपूबाजा , रे मला डांगडिंग बिगर करमेना !

संपादका बरळेश्वरा...

 संपादका बरळेश्वरा

कळते न त्या 'हू' डॉक्टरा
जे जे बरे झाले तया
थॅंक्यु म्हणा कंपाउंडरा
कोव्हिडच्या काळात या
दररोज या टिव्हीत या
सुश्रुत्व द्या द्या उद्धवा
चमचेगिरी इतुकी करा !!

कॉरंटाईनचा शिक्का....

 कॉरंटाईनचा शिक्का....

तुझ्या हातावर
कॉरंटाईनचा शिक्का आहे म्हणजे
तूही नुकतीच परदेशातून
आली आहेस, ह्या जाणिवेने मी
मोहरुन जातो.
नावगाव माहीत नसतानाही तुझे, आपल्यात
एक तरल संबंध रुजून
आलेला मी पाहतो…
-केसु हॅम्बुर्गकर

असें? कश्या लिहायाचें?

 असें? कश्या लिहायाचें?

लिहायाचे सांगा मला
लिहीतच वेड्या जीवा
थोपटीत थोपटीत
बदनामीचा आहे कावा
लिहायाचे
कुठें? कुठें आणि केव्हां?
असें? आणि कश्यासाठी?
इथें रफ स्केचांनाही
असत्याचा येतो वास