एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, ३० जुलै, २०२०

मला डॉक्टर झाल्या सारख वाटतंय...

मुलाखतीचं भरलं वारं
मी तुझा उमेदवार रं
तुझ्या एका प्रश्नापायी
माझं काळीज तुटतय
जवा बघतोस तू माझ्याकड
मला डॉक्टर झाल्या सारख वाटतंय
जवा बघतोस तू ह्याच्याकड
ह्याला डॉक्टर झाल्यासारखं वाटतंय
तू आवाज देता,
मी राहीन दक्ष रं
करोनावर लक्ष फक्त हाच माझा पक्ष रं
मी दमलो लाइव्ह येऊन
तेच तेच रोज बोलून
तू दिसलास कि मनात या
भीतीचं वार सुटतंय
जवा बघतोस तू माझ्याकड
मला डॉक्टर झाल्या सारख वाटतंय
जवा बघतोस तू ह्याच्याकड
ह्याला डॉक्टर झाल्यासारखं वाटतंय
माझ्या मागं मागं किती
घोळत्यात गोंड रं
पण माझ्या काळजात रवला
तिनचाकीचा दांडा रं
हि 'हाता'चीही फडफड
अन घड्याळाची धडपड
किती आवरू मनाला
मन दचकून उठतय
जवा असतोस तू माझ्याकड
मला डॉक्टर झाल्या सारख वाटतंय
जवा असतोस तू ह्याच्याकड
ह्याला डॉक्टर झाल्यासारखं वाटतंय

शुक्रवार, १० जुलै, २०२०

ह्या 'मका'ला थांबवा...

ह्या 'मका'ला थांबवा
गायनातील दोष त्याच्या गुरुजनांना पोचवा ॥

वाट लावली स्वरांची
बडवलेल्या ड्रमांची
बेसुरी कॅसेट ती त्याच्याच कानी वाजवा ॥ 🙉🙉🙉

तुझ्या सवे जगायाचें ...

आमची प्रेरणा आरती प्रभूंचे अप्रतिम गीत "कसें कसें हासायाचे " (https://www.aathavanitli-gani.com/Song/Kase_Kase_Hasayache) आणि मामुंचे कालचे भाषण 😜🤣

तुझ्या सवे जगायाचें !
जगायाचे आहे मला ...

तेच तेच वेड्या जीवा
बडबडीत बडबडीत
लावायाचा आहे दिवा

जगायाचे
कुठें? कुठें आणि केव्हां?
कसें? आणि कुणापास?
इथें भोळ्या करोनाच्या
परवांगिचा लागे ध्यास

जे का रंजले गांजले...

जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपले
तोचि 'नेता' ओळखावा
'गेम' तेथेचि जाणावा !!