एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? पुन्हा एकदा साहेब भिजून सत्ता मिळेल काय?

भोलानाथ तुतारी चिन्ह झेपेल काय? प्रचारात फुंकताना आवाज येईल काय?

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा बारामतीत खासदार होईन का रे चारदा?

भोलानाथ यंदा आहे भावकीचा पेपर वहिनी हरवून पुन्हा मी वाटेन का रे साखर ?


मंगळवार, ९ एप्रिल, २०२४

रात्रभर आपण कोडिंग करत आहोत...

 रात्रभर आपण कोडिंग करत आहोत... गोलाईव्ह होईल तेव्हा आपण कुठे असू ? मेंदूतले त्राण राखून ठेव. कुठेही असलो तरी गोलाईव्ह होणारच. तू धीर धर. आपण धीर धरू. रात्रभर आपण कोडिंग करत आहोत...

माझा हात हातात धर.
भिऊ नकोस. एक गोष्ट सांगतो
जी बॉसने न्यूकमरला सांगितली होती :
बॉस म्हणाला,"प्रोग्रॅम चालतो म्हणजे बग नसतो.
पण बग येतोच आणि मग प्रोग्रॅम चालत नाही."
न्यूकमर ने गोष्ट ऐकली आणि तो विश्वासाने झोपला .
हि गोष्ट फक्त रात्रभर कोडिंग करणार्यासाठीच आहे.
रात्रभर आपण कोडिंग करत आहोत... कोडिंग करताना आपण काळोखात या गोष्टीची सोबत असेल जी बॉसने न्यूकमरला सांगितली होती. आणि बॉस न्यूकमरशी खरे बोलत नाहीत. म्हणून तर बॉसला टक्कल पडतं . रात्रभर आपण कोडिंग करत आहोत... गोलाईव्ह होईल तेव्हा आपण जागे असू. तेव्हा आपण कुठे असू? कुठेही असलो तरी गोलाईव्ह होणारच . कुठेही असलो तरी आपण बग काढत असू . उडणाऱ्या न्यूकमरच्या केसांना टकलाचा हळुवार भास असेल. माझा हात तुझ्या हातात असेल . सर्वत्र सर्वत्र निरामय गोलाईव्ह असेल. रात्रभर आपण कोडिंग करत आहोत...करणार आहोत....... -केशवसुमार (भटके प्रोग्रॅमर )