एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

बजेटातली तरतूद सारी...

बजेटातली तरतूद सारी 'अच्छे दिन'चा वसा
हसा जनांनो हसा
तुम्हा सांगतो शक्कल नामी
'रोजगार' हा देतो हामी
'झीटिव्ही'च्या ऑफिसबाहेर 'भजी' तळाया बसा
मते मिळवण्या धर्म चांगला
'जुमल्या'चा 'आधार' घेतला
भारतभूला महान करण्या जगभर फिरतो असा
सर्व मागची विसरा वचने
चला उद्याची रंगवू स्वप्ने
बघा 'अरुण' हा 'बावीस'चे चित्र खुलवितो कसा

नको मारूस आख...

नको मारूस आख
तुला ‘सुमां’चा धाक
भर संसदी करिशी खुणा
करू नको पुन्हा हा गुन्हा
द्वाड भाजपचा डाव
तुझं जाईल नाव
तू रे ठरशील पप्पू जुना
नको उठण्यास सांग
जरा समजून वाग
तुझ्या डोळ्यांत अवखळपणा
का रे मारली मिठी
पडे कपाळी आठी
गूज कळले न सार्‍या जना
हा एकोणिसचा घाट
नको लावूस वाट
धर आवरून आपल्या मना

सोशल मिडियाच्यावरती , ढोल कवाचा वाजं जी...

सोशल मिडियाच्यावरती , ढोल कवाचा वाजं जी
धुत्लं थोडं पाय जरासं , झिम्मा फुगडी झालं जी

निवडणुकीच भरलं वारं, उधानसारं आलं जी
येड्यापिश्या भक्तांसाठी पुरतं लागीर झालं जी

मोडुन गेला कणाच सारा, हा बोभाटा केला जी
खुर्चीवरती डोळं ठेउनी, सेवक लाचार झालं जी

फेबुकाच्या भींतीवरती , कोयडं बोल बोलं जी
"केशवा"च मन थोडं, लिहून वंगाळं झालं जी

'भूषण' कसा? बघ चोरी ...

'भूषण' कसा? बघ चोरी !
बघ हा चोरी डॉक्युमेंटेशन ||

राफेल हे अडे , राफेल हे नडे
राफेलचिमुळे मम् झोप ही उडे
विफलयुक्तीवादा मार्गे चर्चेत शिरी ||

आता तरी देवा थोड थांबशील का?

आता तरी देवा थोड थांबशील का?
प्रूफ ज्याला म्हनत्यात ते दावशील का?

'पप्पू' तो कवाचान करी खळबळ
देई 'हिंदू' त्याला अन मारुतीचे बळ
न्यायालयी तरी खर बोलशील का?
प्रूफ ज्याला म्हनत्यात ते दावशील का?

चोरी करून चोर कसा पळतो
संशयाला जनतेला वाव मिळतो
मूळ फाईल गेली कुठ सांगशील का?
प्रूफ ज्याला म्हनत्यात ते दावशील का?

दिले निवडून जरी मागच्या वेळी
जनता ना रहिली ही इतकी भोळी
मन त्यांच आता तरी वाचशील का?
प्रूफ ज्याला म्हनत्यात ते दावशील का?

आला निवडीचा महिना...

आला निवडीचा महिना
झटपट खलिता पाठवा
मला लागलाय खोकला
युतीचा 'हात' कुनी भेटवा

साऱ्या देशावर टाकलय
नामोनी जादूच जाळं
काही सुचंना मजला
करतेया भलतंच चाळं
रोज सपनात येते
पीएम पदाची माळ
त्याच्या साठीच मांडलाय
सत्तेचा इथ मी खेळं
झोप लागं ना मजला
झोप लागं ना मजला
काँग्रेसला निरोप पाठवा
मला लागलाय खोकला

खुर्ची साठीचं आलो
मोडून शपथा नि वचनं
द्या सोडून तुम्ही बी
भ्रष्ट मी तुमाला म्हणणं
असं कसं चालायचं
नुस्तच धरून धरणं
युती वाचुन झालाय
मला बी अवघड जिकणं
लै वाढलया दुखणं
लै वाढलया दुखणं
ममताला मध्यस्थ बोलवा
मला लागलाय खोकला

नका झटकू पावणं
किती तुम्हा सांगावं
घ्या युतीत मजला
प्रेमानं कुरवाळा वो
पाया पडतो मी तुमच्या
थोडंसं ऐकाल का वो
ह्या वेळेस लढूया
विसरून भेदभाव
पण दिल्लीच कोकरू
पण दिल्लीच कोकरू
अडलंय कस बी पटवा
मला लागलाय खोकला

झाली गेम आतां मी फिरें माघारीं ...

झाली गेम आतां मी फिरें माघारीं ।
आपली ही बरी राज्यसभा ॥१॥

घररिघी जालें पुतण्याचे बाळ ।
धारिलें सोवळं मोठेपण ॥२॥

भावकीचा अंगसंग झाला आतां ।
हारण्याची चिंता 'केश्या' ह्मणे ॥३॥

'रागा' करुणाकरा...

सध्या काही माध्यमे, अँकर/पत्रकार,नेते,फेबु/ कायप्पा पंडित वगैरे वगैरे पोटतिडकीने/ काकुळतीने विरोधीपक्षांना युती करायचे सल्ले देताना आणि विनवण्या करताना बघून .....

'रागा' करुणाकरा करितसे धावा |
जा युती जुळवा लवकरी ||१||

ऐकोनियां आमुची करुणेची वचने |
व्हावे पक्षश्रेष्ठी उतावीळ ||२||

'शामो' पुढे अवघा दिसे रिता डाव |
घेउनि हाती 'झाडू' वाट पाहे ||३||

उशीर तो आता न पाहिजे केला |
आहो जी 'राहुला' मायबापा ||४||

उरले ते एक हेचि काज आम्हा |
अवघेची पर्याय शून्य जालें || ५||

युपीए हो आता करी कृपा दान |
पुन्हा जुने दिस दावी डोळा ||६||

"केश्या" म्हणे आले कैसें 'बुरे दिन' |
सारे 'चौकीदार' झाले आता ||७||

खेळ मांडीयेला ...

खेळ मांडीयेला निवडणुकिचाही ।
नाचती भक्तगण जाली रे ।
लाज स्वाभिमान गेला पावटणी ।
मतदारा लागतील पायीं रे ॥१॥

टोपीचंदनउटी नेत्यांच्या माळा
जानवं मिरविती गळां ।
ट्रोल सवंग होई पोस्ट वर्षाव ।
तारतम्य हीन सोंहळा रे ॥२॥

वर्णअभिमान आठवती जाती
एकमेकां लाथाळण्या देती ।
अन फेक वृत्तें जाल भरावीती ।
बेकारा रोजगार मिळती रे ॥३॥

होतो जयजयकार गर्जत अंबर
मातले हे भक्तगण दोन्ही रे ।
'केश्या' ह्मणे सोपा करा हा उपाय ।
बंद करा सोशल वावर रे ॥४॥