एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, २५ मार्च, २०१४

लोकशाहीचे पाईक तुम्ही...

आमची प्रेरणा गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी आणि उमाकांत काणेकर यांचे सुरेल गीत ..(http://www.aathavanitli-gani.com/Song/Prakashatale_Tare_Tumhi)


लोकशाहीचे पाईक तुम्ही मतदानावर हसा
हसा मुलांनो हसा

तुम्हा सांगतो युक्ती कानी
मते टाकुया दोन ठिकाणी
मुंबई नंतर मतदानाला साताऱ्यातही असा

हारणे न हा धर्म आपुला
जिंकण्यास हा जन्म घेतला
घड्याळाच्या चिन्हावरतीच पुन्हा उमटु दे ठसा

सर्व कसे हे जमवू म्हणता
अरे कशाला त्याची चिंता
मतदानाची शाई पहिली इथर लावुनी पुसा

गुरुवार, १३ मार्च, २०१४

ह री श्चं द्र थो रा त

आमची प्रेरणा पुन्हा एकदा Thoratशेठची नवी पोस्ट (https://www.facebook.com/groups/576341029120570/permalink/601658889922117/?stream_ref=2)

ह री श्चं द्र थो रा त 
मुंबईत नसतात
तेव्हा ते कुठं असतात?

फेसबुकाच्या कंपूबाजी समुहात याच नावाचे गृहस्थ असतात
असे कळले म्हणून शोध घेतला
तर तेथेही ते असत नसतात
असे कळले.

त्यांचे जालावरचे लिखाण चाळलं 
तर तेथेही त्यांनी कथनमीमांसेच्या खाणाखुणा सुबोध करण्याऐवजी
दुर्बोधच ठेवल्या आहेत असे लक्षात आले.

शेवटी त्यांच्या आशयसूत्रांचाच माग काढत राहिलो
तर तो मिळत गेला प्ररुपात गूढपणे कोंबलेल्या कथनव्यवहारासारखा
बहुधा असतातच ते
नसताना
सापडतील आज ना उद्या
जातात कुठे?

पण ते सापडण्यासाठी
त्यांच्या संकेतव्युहाची भानगड
निस्तरायला हवी प्रथम
हे अधिकच अवघड आहे.

बुधवार, १२ मार्च, २०१४

ही कोणाची तरी संहिता आहे...

Thoratशेठच गूढ मुक्तक (https://www.facebook.com/groups/576341029120570/permalink/601259203295419/?stream_ref=2) वाचल्यावर आम्हाला काही दिवसांपूर्वी जालावर उठलेली स्वामित्वाधिकाराची वावटळ आठवली ... (जालावरील मृत अथवा जिवंत आयडींशी ह्या वि-मुक्तकाचा कसलाही संबंध आढळला तर तो निव्वळ योगायोग समजावा )

ही कोणाची तरी संहिता आहे
पण ती कोणाची आहे हे ते सुरुवातीपासूनच विसरून गेले आहेत.
म्हणून तिला ते त्यांचीच संहिता आहे असे म्हणतात.

कल्पनांच्या परस्परयोगायोगाच हे जाळे जालावर
फार पुरातन काळापासून टाकले आहे
या कल्पनांच्या सीमारेषा आता
त्यांना स्पष्ट करता येत नाहीत.

त्या त्यांचाच भाग झाल्या आहेत
त्यांनीच रचलंय त्यांनी
आणि सोडून दिलंय अथांग जालात

ज्याला उल्लेख नाही, परवांगी नाही, श्रेय नाही
पुसलेलं कृतज्ञताहीन पान नुसतं
आणि असंस्कृत असभ्यपणे बरळतोय मी.