आत्मक्लेश करण्यासाठी आळंदीला एम्पी गेला पश्र्चातापे बहरून आला, मिडिया हे बघायाला
तुम्ही केला नथुराम, अंगलटी तुमच्या आले
पाचवर्ष झाल्यावरती घोरपण त्याचे कळले
आव्हान भूमिकेचे समर्थन हे 'काशी' झाले !
तुम्हाला हे शोभतं नाही पुरोगामी मुखवट्याला
पक्षप्रमुख तुमचे भोळे दुरुनीच ते बघतात
तेव्हा नव्हते आमचे कोणी, कानाडोळा करतात
कलाकार भूमिकेतील,विचार न त्यांचे त्यात
पाठीवरी फिरवा हात, या हो काका एकच वेळा