एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १३ ऑगस्ट, २०२५

मन तुझं भोळभाबड...

मन तुझं भोळभाबड गावठी तुझा साज
दरवेळी आपली वाटते ' ए आये' ची गाज
बोल तुझे चावट तरी पिक्चर दगाबाज नाही
चड्डीला काज नाही नाडीची ह्या लाज नाही

किती नट आले गेले तुला काय घेणं
गिनीजबुकात नाव तुझ सिल्वर जुबिली लेणं
मान सन्मान दोन्ही काय काल होते आज नाय
चड्डीला काज नाही नाडीची ह्या लाज नाही

मन तुझं साधभोळ...

मन तुझं साधभोळ बेरकी तुझा साज
दरवेळी कशी येते विडंबनाची गाज
टीका तुझी वर्मी तरी गाणे राडेबाज नाही
कवड्यांना लाज नाही केश्याला इलाज नाही

किती कवडे आले गेले तुला काय घेणं
फेसबुकी वावर तुझा गावामधलं बेणं
लाइक कॉमेंट दोन्ही काय काल होते आज नाय
कवड्यांना लाज नाही केश्याला इलाज नाही