एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०१४

टोल लावियेला महामार्गी ठायी ।

गेले दोन दिवस विविध दूरदर्शन वाहिन्यावर, अंतर जालावर आणि विविध भिंतींवर सुरु असलेले टोलयुद्ध बघून डोक्याची मंडई झाली ...डोके शांत करण्यासाठी तुकारामचे अभंग(http://www.aathavanitli-gani.com/Song/Khel_Mandiyela_Valavanti) ऐकायला सुरुवात केली ...डोके शांत झाले नाही पण एका अभंगाची वाट मात्र लागली ...

टोल लावियेला महामार्गी ठायी ।
त्रासुनी नागरिक जायी रे ।
बंद अभियान केले नाट्यनामी ।
टोलनाका फोडतील भाई रे ॥१॥

टीव्हीचॅनल करी भवतीने गोळा
हात हालविती बळां ।
कार मर्सिडीज निघे भरधाव ।
अनुपम्य सुखसोहळा रे ॥२॥

येताइलेक्शन आठवणी येती
एकएकी आंदोलने होती ।
निव्वळ टक्के खाती नियमीते ।
पाखंडा जनहित सुचती रे ॥३॥

होतो खळ्ळखट्ट गतिस्थंभ शहर
माजले हे सैनिक वीर रे ।
'केश्या' म्हणे सोपी केली पायवाट ।
फसवावया जनसागर रे ॥४॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: