एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०१४

कमळाशी हे जडले नाते धनुष्यबाणाचे...

कमळाशी हे जडले नाते धनुष्यबाणाचे
नि वाटप ठरले "खात्या"चे

मित्रांनी हे सहज उचलिले धनू स्वबळाचे
पूर्ण जाहले न जनकृपेने हेतु अंतरींचे
उभे ठाकलें भाग्य अल्पमत समोर कमळाचे

धुर्त घड्याळी दुरुन न्याहळी सैन्य धनुर्धारी
सपोर्ट देऊन दुबळी केली शिवशक्‍ति सारी
कळू लागलें सर्व हळुं हळू गुपित सत्तेचे

सभात्यागुनी निघता सेना संधी नामी ही
तडिताघातापरी भयंकर नाद 'हो'च होई
तांत्रिकतेने जिंकले बहुमत सदनि नादाचे

गोंधळात हे घडले सगळे, बावरले राजे
मुक्‍त हासतां, नागपुरी मनोमनीं लाजे
त्रस्त जाहले तात्त्विक लोचन क्षणांत संघाचे

हात जोडुनी म्हणे नृपति तो संघप्रमुखासी
"आजच करतो संपर्क मी नैसर्गिक मित्राशी "
आनंदाने खुलले डोळे सेना प्रमुखांचे

संघाज्ञानें उठति भरभर विजयमुग्ध सगळे
अधिर बोल ती, अधिर त्याहुनी सेनेचे बगळे
हपापले ते चरण गाठण्या मंदिर मलिद्याचे

वेशीवरती जसा भरावा ढोरांचा बाजार
तसा चालला 'वर्षा'महली 'खाते' व्यापार
पडद्यामागे मीलन झालें 'माया'-ब्रम्हाचे

झुकले थोडे ते हि, हे हि ठरला व्यवहार
टिव्हीवरती नेते करिती मैत्रीचा उच्चार
'बारा' हाती गाजर पडले मंत्रीमंडळाचे

लाज तत्त्व ही सोड, सर्व तू सत्तेच्या करता
फक्त येव्हढे कळले "केश्या" हे नाटक बघता
कमळाशीं हे जुळलें ऐसे धनुष्यबाणाचे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: