एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

गुजरात निवडणूक आमच्या नजरेतून

गुजरात निवडणूक आमच्या नजरेतून
१.
रागा बदलेना, रागा चालेना
रागा शर्थ करी, सत्ता काही मिळेना
गेला 'युपि'च्या बनी
म्हंटली 'अख्खि'सवें गाणी
त्यांनी गळ्यांत गळे मिळवून रे
गेला गुजरात बनी
रंग उधळले रणी
यज्ञोपवित मिळाले वरदान रे
चल ये रे, ये रे गड्या
बोलु कडू बदलू पगड्या
खेळु धर्म धम् पोरी धम् पोरी धम्
हे पक्षाचे अंगण
तुला दिले आहे आंदण
बिनविरोध आला निवडून रे
धन्य लॉजिकचे धडे
यांची धाव आलूकडे
सोने करू शुद्ध निर्माण रे
रागा जिथे आला बोलून
कमळ तिथे आले फुलून
कोण हा - रागा? जाणती सारे जण रे?
२.
विकास बोलेना, विकास चालेना
विकास खंत करी, काही केल्या होईना
गेला 'युपि'च्या बनी
म्हंटली लव्हजिहाद गाणी
त्यांनी त्वेषात गळे फाडून रे
गेला गुजरात बनी
जात दरवळली जनी
मतापुढे विसरले पदभान रे
चल ये रे, ये रे गड्या
बोलु रडू बदलू पुड्या
खेळु जुम्ला जुम्‌ पोरी जुम्‌ पोरी जुम्‌
हे देशाचे अंगण
तुम्हां दिले आहे आंदण
उणे करू नका दोघेजण रे
जन भाववाढीने रडे
यांची धाव बाह्याकडे
आपण करू परकिय धोरण रे
कमळ फुली आला फुलून
'तेजी' मध्ये गेल्या विसरून
कोण मी - विकास ? कोठे दोघेजण रे ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: