एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, २३ मे, २००७

हवी आहे एक छबकडी..

गेल्या काही दिवसात मनोगताचे कुरुक्षेत्र करणाऱ्या सर्वसाक्षीयांच्या उडत्या छबकड्यांनी आमच्याही मनात वादळ उठवलं. पण कुरुक्षेत्रा वरचा रणसंगार पाहून प्रतिसाद कसा द्यावा ह्या विचारात असतानाच आमचे परमस्नेही जयंतरावांची हवं आहे एक आभाळ! ही अप्रतिम कविता वाचनात आली आणि आमच्या विमानप्रवासाच्या सुप्त इच्छा शब्दरूप घेऊन कागदावर उतरल्या.

हवी आहे एक स्मितसखी
कपड्याची अट नाही.
अगदी वीतभर किंवा चतकोर असले तरी चालेल!

हवी आहे एक बाहुली
कुठल्याही देशाची अट नाही.
अगदी भारतीय दिसली नाही तरी चालेल!

हवी आहे एक 'मधुमक्षिका'
अट फक्त एवढीच.
ती सुस्मिता असावी!
अगदी संपूर्ण प्रवासात एकदा जरी हसली तरी चालेल!
त्या हसण्याने
काही खडूस चेहऱ्यांनी
इंग्रजी वर्तमानपत्रातून असूयेचा नजरेने बघितले तरी चालेल!

कारण विमानतळावरची गर्दी. कोलाहल,गचाळ व्यवस्थापन, लांबलचक रांगा, ताटकळणे, तपासणीन
ेथकून गेलेल्या ह्या जीवाच्या
सुकलेल्या घशात
मार्टिनीचे दोन थेंब पडावे
एवढीच इच्छा!

हवी आहे अशी एक छबकडी
तातडीने!
अगदी माझ्या बोलण्याने चक्क लाजली आणि धूम पळाली तरी चालेल!

२ टिप्पण्या:

sarvasakshi म्हणाले...

वा कवीराज!

आमच्या छबकड्यांना थेट आभाळात नेउन ठेवलेत की! झकास. आवडले. आपली इच्छा लवकरच पूर्ण होवो या सदिच्छा!

सर्वसा़क्षी

Milind Phanse म्हणाले...

वा वा केशवा, मस्त.