एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०१५

माझ्या पोस्टीची हि धिंड त्यांनी काढली....

आमची प्रेरणा कंपूबाजी वरील 'कोलगे'ट प्रकरण...

गुप्तजनांचे, स्क्रीन शॉटनी, गुपित फ़ोडिले या हो
क्लोज ग्रुपातील रंगली चर्चा, देते वाचा हो !

माझ्या पोस्टीची हि धिंड त्यांनी काढली
कशी कंपूबाजी थट्टा पहा चालली !

जालावरी निर्मळ होतं फेसबुक गाव
सुखी समाधानी होतं रंक आणि राव
तेथे लेखनांन माझी किर्ति वाढली
कशी कंपूबाजी थट्टा पहा चालली !

अशा गावि होत्या एक लेखिका ज्वलंत
प्रस्थापित म्हणती त्यांना, कुणी नामवंत
त्यांना 'मनातले' पोस्ट हाती लागली
कशी कंपूबाजी थट्टा पहा चालली !

मस्करी करावी इच्छा लेखिकेस झाली
मजेसाठी पोस्टमाझी कंपूबाजी नेली
मस्ती मूड मध्ये कंपूबाजी पेटली
कशी कंपूबाजी थट्टा पहा चालली !

पिसाळलेल्या कंपूने त्या थयथयाट केला
उडवण्या खिल्ली सारा ग्रूप गोळा झाला
त्यांनी लाज-भीड-नीती सारी सोडली
कशी कंपूबाजी थट्टा पहा चालली !

हितचिंतकाच्या पायी समाजाला डाव
टोळक्यात ओळखीचे हि सापडल नाव
त्याला ट्यागची हि दोरी मी बांधली
कशी कंपूबाजी थट्टा पहा चालली !

खुळी मला कळला नाही, मुळी त्याचा खेळ
मनोभंग झाला माझा, मित्र ठरी फोल
त्याला लाज गावा मध्ये मीहि आणली
कशी कंपूबाजी थट्टा पहा चालली !

फेसबुकी फसगत झाली, तिचा हा तमाशा
जळुनिया गेली होती लिहायची इच्छा
पण काही मित्रांनी समजूत काढली
कशी कंपूबाजी थट्टा पहा चालली !

याची जाली त्या साऱ्यांना दावले मरण
स्क्रीनशॉट करूनी उघडे रचिले सरण
त्यांच्या कर्मसोहळ्याची यात्रा चालली
कशी कंपूबाजी थट्टा पहा चालली !

'L' केशवसुमार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: