एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, २४ मे, २०२४

साहेबांची जागा

(सदानंद रेगे ह्यांच्यासाठी)
ऑफिसची
        पायपीट केली
तेव्हा कुठं
तुमची ती
खरोखरीच्या साहेबांची जागा 
        अस्फुटशी  दिसली.

तिच्या अलीकडली
तुमची
रंगीबेरंगी धाग्यांची 
साहेबांची सेक्रेटरी
मात्र कालत्रयी
नव्हती अजिबात अस्तित्वांत
(असं शिपाई  शांताराम  म्हणाला).

जाता जातां
कॅन्टिनमध्ये लंचला   
तरी
अशी थाप
        मारायला नको होती तुम्ही.
अहो, आम्ही
शोधायचं काय काय
कसं
        नि किती?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: