एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, २ डिसेंबर, २०२४

मज निकाल उमगत नाही

मज निकाल उमगत नाही बाइट कसा मी द्यावा ! मतपेटीतील धक्याचा मी अर्थ कसा लावावा?

मत जनतेचे आक्रोश
बोटांनी नोंदवलेले
मत अपेक्षांचे रान
महागाईत अवघडलेले
मत धगधगते आवर्त
मत बेकारी, मत चकवा
मत जातीयतेचा गुंता
मत धर्माचे राऊळ
मत बहिणींचा हात
मत पैशाची चाहुल
दुबळ्या गळक्या सबबीत
हा ऱ्हास कसा लपवावा?
चेहरा-मोहरा पक्षाचा
हा भगवा उरला नाही
धनी बहुमताचे तरीही
का आम्ही ठरलो नाही
ह्या कौल न या जनतेचा
कुणी कसा बरे मग घ्यावा ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: