डोकं फिरलंया र ह्याचं डोकं फिरलंया
सपाटून पडलंया म्हणिते अमीच जिंकलंया
ह्याला भरलंया न्यारं पिसं, ह्यो पाही ना रातंदिस
करमेचे सोडून डोक्या नेसं, हिंडे घेऊन मोकळे केस
वारं भरलंया अंगात वारं भरलंया
सपाटून पडलंया म्हणिते अमीच जिंकलंया
मन नाही ह्याचं स्थिर, ह्याला राहिला ना धीर
अकलेचं तोडतय तार, ह्याची नजर ती भिरभिर
भुतानं घेरलंया ह्याला भुतानं घेरलंया
सपाटून पडलंया म्हणिते अमीच जिंकलंया
काय सांगावी परवड, झोपेत ही बडबड
झाली घरात ही पडझड, दाढी झालाया वरचढ
कोंबडं आरलंया सत्तेच कोंबडं आरलंया
सपाटून पडलंया म्हणिते अमीच जिंकलंया
नवानवाच नखरा दावी मग बळंच डोस्क लावी
घ्या पेपर मतदान तुम्ही सांगे संपादक अनुभवी
पाणी मुरलंया कुठंतरी पाणी मुरलंया
सपाटून पडलंया म्हणिते अमीच जिंकलंया
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा