एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१३

युद्ध अम्ही करणार ...

अमेरिकेची आर्थिक परिस्थिती आणि त्यांची युद्धनीती ह्यावर आज बऱ्याच मित्रांच्या भिंतीवर आणि समुहात चर्चा वाचत होतो ...नेहमी प्रमणे कानात जाल संगीत वाजतच होते... शांता शेळकेंचे आनंदघन यांनी संगीतबद्ध केलेलं अप्रतिम गाण 'शूर आम्ही सरदार आम्हाला' सुरु झाले आणि आमचं डोके तिरक चालू लागलं ....

युद्ध अम्ही करणार अम्हाला काय कुनाची भीती ?
तेल, तेल अन्‌ तेलापायी युध्द घेतलं हाती !

हिस्ट्रीच्या गर्भात उमगली झुंजायाची रीत
इकोनॉमीशी युद्ध जोडल त्यावर सारी भिस्त
हवे तेव्हढे छापू डॉलर हीच आर्थिक नीती !

मुजाहिदाना  पुरवुन शास्त्रे तयार आम्ही केले
अंगाशी येताच तयांना अतिरेकी हे म्हटले
लाख कारणे देऊन लढवू अशी आमची ख्याती  !

जिंकावे ना, मधून पळावं हेच अम्हाला ठावं
लढुन पळावं, परत लढावं हेच अम्हाला ठावं
स्वार्थापायी मिडलइस्टची आम्हीच केली माती !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: