एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१३

लक्तरे...

Balaji Sutar यांची लक्तरे हि कविता (https://www.facebook.com/balaji.sutar.3/posts/722375987776800) वाचून आम्हाला जालावरील काही कंपूबहाद्दरांची लक्तरे आठवली.

लक्तरे...
--------------------------------------------

आजही,
जेव्हा मी वावरतो,
या ध्येय/उद्देश हरवलेल्या
आदिम सनातन समुहात-

ऐकतो-
-निर्मितीमूल्य अन साहित्याचा
विझलेला जयघोष,

-नग्न करून
धिंड काढलेल्या स्टेटस बद्दलचे
भाड्याने आणलेल्या लढवय्यांचे
मुक्त फुल्याफुल्यांकित परिसंवाद,

-'कॉमेंट-हटाव' आणि
'मुद्दा यहीं बनाएंगे' च्या
भंपक गर्जना.

पाहतो,
- कंपूशाहीच्या 'काही'
'कंपूं'कडून स्टेटसवर
झालेले 'शाही' बलात्कार.

निर्विकारपणे,
मनावर एकही ओरखडा
उमटू न देता,
मी मित्रांसोबत चाट करतो,
विडंबन पाडतो,
विंग्लिश सिनेमा पाहतो,
xxxच्या भिंतीवरून चक्कर मारतो..

मग, पहाटे, मी जागताना,
अंतरात्मा झोपी जातो, तृप्तपणे.

माझ्यातला मी
मला सांगतो,
"कसा बनवल मी मुर्ख, आजही?"

--------------------------------------------
-केशवसुमार, फ्रँकफर्ट.

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

sagalyach widambana kawitanchya iithe mul kawita prakashit kelyas jast aaswad gheta yeel.
dhanyawad!