एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१३

चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून...

Kavita Mahajan यांची https://www.facebook.com/kavita.mahajan.5/posts/3525708997213 हि कविता वाचून आमच्या काही पट्टीचे पिणाऱ्या मित्रांची कैफियत आठवली...

चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून
गटकावा शॉट्ग्लास ओठावर लावून
गडद निळ्या रात्री खच्च भरलेल्य गुत्यावर
जो मिळतो मद्यार्क टाकलेला

कुणीच नसावं गुत्यातही
किंवा असावं संपूर्ण सशरीर सोबत
पायाखालची माती ढगासारखी मऊ
चालतोय चवड्यावर की उडतोय कळू नये

हरकत काय आहे कलीग्सना आणि
साथीदारांना मित्रमैत्रिणींना
बेरंगीखुर्चीला गुत्याच्या दारांना
गव्हाळ रंगाच्या यामासारख्या
मुख्यदारावरच्या शुंभाला
हरकत काय आहे

समजेल
कधी बाटलीवर नजर टाकलीस तर
: तळची काच दिसेल इतकी ढोसलेली असते
की पाय टेकवून चालताच येत नाही
म्हणूनही उडत असतो मी
रात्री अपरात्री.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: