एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, ९ जानेवारी, २०१५

चला दोस्तहो 'मादकते'वर बोलू काही ...


जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही !
चला दोस्तहो 'मादकते'वर बोलू काही !

उगाच वळसे शब्दांना हे देत रहा तू
नडले नाहीत कोणी तोवर बोलू काही

तुफान पाहुन स्टेटसवर मागितली माफी
पडदा टाका, नकाच ह्यावर बोलू काही

हवेहवेसे 'व्यंग' तुला जर हवेच होते
नकोनकोते भलते त्यावर बोलू काही

नैतिकतेची किती काळजी फेसबुकातुन
'लक्ष्यार्था'ला समजा नंतर बोलू काही

मित्र असू दे यादीमध्ये सपोर्ट म्हणुनी
देत 'पांगळी' लॉजिक भरभर बोलू काही

टीप: हे विडंबन संपूर्णपणे काल्पनिक असून कोणाला ह्यात फेसबुकवरील काही घटनांचा भास झाल्यास तो केवळ आणि निव्वळ योगायोग समजावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: