एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

तोच गेम खेळायचा कंटाळ्ळा आल्लाय...



आमची प्रेरणा..
https://www.facebook.com/kavita.mahajan.5/posts/10200200067640185?pnref=story

तोच गेम खेळायचा कंटाळ्ळा आल्लाय
त्याच सोशलमिडीयावर
नवं हवं नवं हवं नवं हवं
नवं हवं सावज
सावध नसलेलं
मज्जा येते मारायला...

नव्वा हवा फोटो
डिपीला लावायला
नवी हव्वी आय्डी गुलाबी टकाटक
पण त्याच त्याच रंगाची टपकते लाळ
सगळ्यांचीच लाळ फेसाळ फ़ेसाळ

लाळ फेसाळ फ़ेसाळ
त्याच त्याच नात्यांचा कंट्टाळा आलाय्य
नवा हवा मित्र

तीच्तीच लाईक
तीच्तीच कॉमेन्ट
तेच्तेच चाट
तोच्तो भूतकाळ तोच्तसाच वर्तमान तेच्ते भविष्य अनिश्चित निश्चित
तेच्ते प्रश्न तोच्तो संभोग तीच्ती उत्तरं तीच्ती चळवळ

तीच्ती स्टेटसेस तीच्ती धमकी तेच्ते कावळे अतृप्त
तोचगेमखेळायचाकंटाळ्ळाआल्लायतोचगेमखेळायचाकंटाळ्ळा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: