एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, २० जानेवारी, २०१५

नको मारूस हाक...

नको मारूस हाक
तुला केलाय ब्लॉक
भर ट्वीटरवर करिशी खुणा
करू नको पुन्हा हा गुन्हा

तू रे आणतोस चीड
नको निगेटीव्ह फिड
त्रास होतोय फॉलो जना

नको धरूस राग
जरा समजून वाग
तुझ्या मुळेच व्होटींग पुन्हा

लाख लोकांचे व्होट
नको सुचवुस नोट
धर आवरून आपल्या मना

द्वाड डिबेट्चा डाव
माझं जाईल नाव
तू ह्या खेळाचा पंटर जुना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: