आमची प्रेरणा इलाही जमादार ह्यांची नितांतसुंदर गज़ल
अंदाज तारखांचा, चुकला जरा असावा
बहुतेक बायकोचा, होरा खरा असावा
येतोय वास मजला अजुनी कसा सुगंधी
हातात बांधलेला, तो मोगरा असावा
लपवून तोंड अपुले का घेतले तुम्ही हो?
की वाटले तुम्हाला, तो सासरा असावा!
नाही अखेर कळले, आलो कसा घरी मी
गुत्यात भेटलेला, तो सोयरा असावा
दारात ती उभी अन्, हाती तयार झाडू
रणचंडिके प्रमाणे का चेहरा असावा ?
एका क्षणात गेली उतरून ढोसलेली
ज्याच्या वरून पडलो, तो, उंबरा असावा
ठोकून काढले मज इतके नका विचारू
हीच्या परी कसाई थोडा बरा असावा
वागो खुशाल "केश्या" हा मर्कटा प्रमाणे
डांबून घालण्याला , पण, पिंजरा असावा
Saturday, February 2, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
Sahi aahe.
Abhijeet Date
http://dilkhulas.wordpress.com
वा वा वा वा,
केश्या,
आमच्या अत्यंत आवडत्या नितांत सुंदर गझलेचे नितांत सुंदर विडंबन.
अभिनंदन
आपला,
(प्रभावित) धोंडोपंत
Post a Comment