जुन्या विडंबनात काही बदल करून
एकूण पृष्ठदृश्ये
गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४
कमळाला जड झाले नाते धनुष्यबाणाचे
सोमवार, २ डिसेंबर, २०२४
नसतेस घरी तू जेव्हा...
नसतेस घरी तू जेव्हा
जीव हलका हलका होतो
पीण्याला जमती सारे
अन् एकच गलका होतो
नभ फाटून वीज पडावी
जल्लोश तसा मी करतो
ही शुद्ध जरा क्षीण होते
अन् पती बोलका होतो
येताच विड्या ओठांशी
मी दचकून बघतो मागे
खिडकीशी थांबून ओढा
मग गंध तयांचा जातो
तव घरात अवतरण्याच्या
मज स्मरती घातकवेळा
घर भरभर अवरून सगळे
मी पुन्हा सात्त्विक होतो
तू सांग सख्या मज काय
तू केले मी नसताना ?
माझा मग जीव उगाच
भात्यासम धडधड करतो
ना अजून झालो चालू
ना हुशार अजुनी झालो
तुज पाहून मी डगमगतो
अन् चरणा वर तव पडतो !
जेव्हा तिची नि माझी धडकून भेट झाली
जेव्हा तिची नि माझी धडकून भेट झाली
जाडी दहा मणाची माझ्या गळ्यात आली
पायातल्या खुब्याचे ते हाड मोडलेले
तोंडात बत्तिशिने अन स्थान सोडलेले
स्ट्रेचर वरून अमची मग पालखी निघाली
नव्हतीच शुद्ध तेव्हा, नुसतेच हात वारे
अन काळजीत होते, माझ्या घरात सारे
हे लोक कोण माझ्या जमलेत भोवताली
कित्तेक मास नंतर खोलीत बंद होतो
बोलीत मंद होतो चालीत मंद होतो
आजन्म सोबतीला काठी मला मिळाली
डोकं फिरलंया र ह्याचं डोकं फिरलंया
डोकं फिरलंया र ह्याचं डोकं फिरलंया
सपाटून पडलंया म्हणिते अमीच जिंकलंया
ह्याला भरलंया न्यारं पिसं, ह्यो पाही ना रातंदिस
करमेचे सोडून डोक्या नेसं, हिंडे घेऊन मोकळे केस
वारं भरलंया अंगात वारं भरलंया
सपाटून पडलंया म्हणिते अमीच जिंकलंया
मन नाही ह्याचं स्थिर, ह्याला राहिला ना धीर
अकलेचं तोडतय तार, ह्याची नजर ती भिरभिर
भुतानं घेरलंया ह्याला भुतानं घेरलंया
सपाटून पडलंया म्हणिते अमीच जिंकलंया
काय सांगावी परवड, झोपेत ही बडबड
झाली घरात ही पडझड, दाढी झालाया वरचढ
कोंबडं आरलंया सत्तेच कोंबडं आरलंया
सपाटून पडलंया म्हणिते अमीच जिंकलंया
नवानवाच नखरा दावी मग बळंच डोस्क लावी
घ्या पेपर मतदान तुम्ही सांगे संपादक अनुभवी
पाणी मुरलंया कुठंतरी पाणी मुरलंया
सपाटून पडलंया म्हणिते अमीच जिंकलंया
ला.भावा ला.भावा चिडलास का?
ला.भावा ला.भावा चिडलास का? गावाकडे जाऊन लपलास का? कमळाचे फुल गेमाडपंथी, दादांच घड्याळ खिशामंदी ! गृहपदावर अडलास का? उगाच एकटा नडलास का? वेळेत परतुनी येशील का? मिळतंय ते गुपचुप घेशील का? सेना बिचारी रूसत बसेल दादांचा भाव चढत असेल! असाच बसून राहशील का? बहिणींची बोलणी खाशील का? ला.भावा ला.भावा कशाला गेलास? बघता बघता आजारी झालास! शामोंना तरी ओ देशील का? ऐनवेळी मुंबईला येशील का?
मज निकाल उमगत नाही
मज निकाल उमगत नाही बाइट कसा मी द्यावा ! मतपेटीतील धक्याचा मी अर्थ कसा लावावा?
मी काय करू माझे चुकले?
आमची प्रेरणा ( https://www.aathavanitli-gani.com/.../Mi_Kaay_Karu_Majhe...)
पाहिलेली, ऐकलेली, माणसे गेली कुठे?
पाहिलेली, ऐकलेली, माणसे गेली कुठे? एक्झिटपोली बोललेली , माणसे गेली कुठे? रोज अत्याचार होतो मिडियाचा ह्या अता, मिडियाला भावलेली, माणसे गेली कुठे? अंदाज मिडियाचा चुकला जरा असावा सामान्य माणसांचा, होरा खरा असावा जखमा कशा सुगंधी झाल्यात सर्वपक्षी केलेत वार ज्याने, तो सोयरा असावा नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली नाराज बंडखोरी चा भोवरा असावा का आळ मिडियावर, घेता तुम्ही खर्याचा? की वाटले तुम्हाला, 'ए.पो.' खरा असावा! पोलामध्ये उतरली स्वप्नें तहानलेली बहुतेक लक्ष्मीचा आटला झरा असावा भेटून एडिटरला, इतुके जरा विचारा शाबूत एवढासा मेंदू जरा असावा दारात ती उभी अन्, नयनी अबोल अश्रू लाचार लोकशाही , तो चेहरा असावा माथ्यावरी जनांच्या ओझे सदा निवडणुक हे संविधान 'केश्या' , पण पिंजरा असावा
बुधवार, १३ नोव्हेंबर, २०२४
झडती माझी घेतली ग जाता प्रचाराला...
झडती माझी घेतली ग जाता प्रचाराला चुगली लगे केली मी सार्या मीडियाला
आज अचानक पुढे तो आला
पोलिस फाटा अन जोडीला
फार द्वाड तो मजसी गमला
नाव गाव विचारलं थेट मी , त्याला शिपायाला
माझ्या समोरी उभा राहतो
टकमक टकमक मला तो पाहतो
ब्याग खुणेने उघडा म्हणतो
तरी नाही मी भुलले ग बाई, त्याच्या इशार्याला
ब्याग उघडता त्याने बाबा
माझा मजवर कुठला ताबा
त्याची धिटाई तोबा तोबा !
बरळू लागले मी ही बाई, बघता कॅमेर्याला
युरीन पॉट ही बघा उघडून
सांगणार मी जनास जाऊ
मग पुसतील हा व्हिडिओ पाहून
किती छळाल सांगू मी ग बाई, ह्या बिचार्याला
मिंधे फडणीस शहा मोदी
यांच्या ब्यागा उघडा आधी
त्याची मजला धाडा सीडी
वेड्यावाणी बोलत ग गेले, मग मी प्रचाराला
बुधवार, ५ जून, २०२४
आता तरी 'देवा' जरा थांबशील का?
आता तरी 'देवा' जरा थांबशील का? कौल हाय दिला त्यो वाचशील का?
युवक तो बेकारीनं करी खळबळ
द्या त्यांच्या हातांना नोकरीचे बळ
महागाईला चाप जरा लावशील का?
कौल हाय दिला त्यो वाचशील का?
चोरी करून नेता कसा वाचतो
पक्ष तुमचा त्याला क्लीनचिट ही देतो
भ्रष्टाचाऱ्यांना ह्या आळा घालशील का?
कौल हाय दिला त्यो वाचशील का?
दिले निवडून जरी आताच्या वेळी
जनता ना राहिली ही इतकी खुळी
घमंड आता थोडीशी तू सोडशील का?
कौल हाय दिला त्यो वाचशील का?
- केशवसुमार
शुक्रवार, ३१ मे, २०२४
ध्यानाला जातों मी दक्षिणपुरा ...
ध्यानाला जातों मी दक्षिणपुरा ।
देतो निज समय पूर्णं कॅमेरेश्वरा ॥
मिळतील टीआरपी बहुत।
रुग्ण ,भक्त सर्व येत ।
नट नर्तक सकल जमत ।
न मिळे अशि मौज पुन्हा पाहण्या नरा ॥
-केशवसुमार
शुक्रवार, २४ मे, २०२४
साहेबांची जागा
(सदानंद रेगे ह्यांच्यासाठी)
ऑफिसची
पायपीट केली
तेव्हा कुठं
तुमची ती
खरोखरीच्या साहेबांची जागा
अस्फुटशी दिसली.
तिच्या अलीकडली
तुमची
रंगीबेरंगी धाग्यांची
साहेबांची सेक्रेटरी
मात्र कालत्रयी
नव्हती अजिबात अस्तित्वांत
(असं शिपाई शांताराम म्हणाला).
जाता जातां
कॅन्टिनमध्ये लंचला
तरी
अशी थाप
मारायला नको होती तुम्ही.
अहो, आम्ही
शोधायचं काय काय
कसं
नि किती?
मंगळवार, ३० एप्रिल, २०२४
भेसुरगाऊन छळले इतुके...
भेसुरगाऊन छळले इतुके छळण्याच्या पलिकडले
प्रथम तुला ऐकियले आणिक भलेभले ते रडले
अर्थ जुन्या गीतास मिळाला
छंद नवा अन् ताल निराळा
त्या दिवशी अन प्रथमच सारे सूर पहा गडबडले
आठवते फ्युजनच्या रात्री
लक्ष सुर गळपटले गात्री
गितात तुझिया गर्दभांचे रहस्य मज उलगडले
शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? पुन्हा एकदा साहेब भिजून सत्ता मिळेल काय?
भोलानाथ तुतारी चिन्ह झेपेल काय? प्रचारात फुंकताना आवाज येईल काय?
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा बारामतीत खासदार होईन का रे चारदा?
भोलानाथ यंदा आहे भावकीचा पेपर वहिनी हरवून पुन्हा मी वाटेन का रे साखर ?
मंगळवार, ९ एप्रिल, २०२४
रात्रभर आपण कोडिंग करत आहोत...
रात्रभर आपण कोडिंग करत आहोत... गोलाईव्ह होईल तेव्हा आपण कुठे असू ? मेंदूतले त्राण राखून ठेव. कुठेही असलो तरी गोलाईव्ह होणारच. तू धीर धर. आपण धीर धरू. रात्रभर आपण कोडिंग करत आहोत...
सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४
शूर अम्ही सरदार अम्हाला लाज न कसली भीती !
शूर अम्ही सरदार अम्हाला लाज न कसली भीती ! देव, देश अन् जनतेसाठी केली आम्ही युती!
जीवनात ही 'घडी' अशीच राहु दे
जीवनात ही 'घडी' अशीच राहु दे कमळाच्या फुलाकडे 'अजित' जाऊ दे
जगीं हा खास वेड्यांचा । पसारा माजला सारा ।
जगीं हा खास वेड्यांचा । पसारा माजला सारा । गमे या भ्रान्त संसारीं । ध्रुवाचा 'वेड' हा तारा ॥
चल रे सख्या चल रे सख्या चौकशीला
शक्यता
आमची प्रेरणा
1.