एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०१०

सल्ल्यासाठी विजूभाऊनी, इथ फोडिला टाहो,

सल्ल्यासाठी विजूभाऊनी, इथ फोडिला टाहो,
प्रतिसादातून पडती लाथा, श्रोते ऐका हो !

त्याच्या धाग्याचीच वाट आज लावली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

गंगेवानी निर्मळ होतं, असं पुण्य गाव
सुखी समाधानी होतं, रंक आणि राव
त्याची गुणगौरवानं किर्ती वाढली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

अशा गावि आला एक चालू जालवंत
महाचालू म्हणती त्याला, कुणी म्हणे चंट
त्याला पुण्यामंन्दी नोकरी हि लागली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

स्वस्त घरासाठी त्यांन शोधाशोध केली
हवेशीर कोठी एक पाहण्यात आली
पण अट मालकानं, अशी घातली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

फॅमिलीस आणा अधी असा हट्ट केला
घरासाठी विजूभाऊ त्या पार येडा झाला
त्यांनी लाज भीड निती सारी सोडली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

करारस गेला तेव्हा, त्याने केला डाव
मैत्रिणीस करूनी पत्नी सांगितले नाव
त्यानं लबाडीने वेळ होती मारली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

खुळ्यास त्या कळला नाही, नियतिचा खेळ
मैत्रिणीच्या नवर्‍यानेच पुढे केला घोळ
त्याने घरमालकाची कामं घेतली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

योगायोग पाहा तरी कसा अता झाला
कामासाठी मालक त्याच्या ऑफिसात गेला
तिथे मैत्रीण त्याला ह्याची भेटली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

क्षणामध्ये ओळखले त्याने फसगत झाली
सत्य शोधणास त्यांने खेळी एक केली
त्याने दोघींना त्या अवतान धाडली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

सुटण्यास लफड्यातून ह्या, ह्याने केला डाव
सल्ल्या साठी मिपावरती घेतली ही धाव
त्याच्या लेंग्याची अयती नाडी घावली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

मार बायकोला खोट्या, खरीस तू आण
किंवा त्याचा पापा घे तू गालावरी छाण
अश्या सल्ल्याची ही रांग बघा लागली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

याची देही याची डोळा पाहिले मरण
वाचकांनी देउन सल्ले रचिले सरण
त्यांचा कर्मसोहळ्याची यात्रा चालली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: