एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०१०

काम करी दाम येड्या काम करी दाम रे

नेहमी प्रमाणे आम्ही संगीत तबकडी सुरु केली आणि मिपा वाचायला सुरुवात केली... पराशेठचा खुषखबरी धागा वाचून संपायला आणि तबकडीवर खेबुडकरांचे दाम करी काम येड्या लागयला एकच गाठ पडली आणि आम्हाला तबकडीतून भलतेच बोल ऐकू येउ लागले

बारा डोळ्यांनी धागं सारी वाचकजन बगतो
प्रतिसादावर माणूस मरतो प्रतिसादावर जगतो

प्रतिसादाला पैसं मागतो 'परा'स नाही काम रे
काम करी दाम येड्या काम करी दाम रे

टिआरपीची जादू लई न्यारी, सार्‍या जालाला त्याची हाव
काम सोडून लिवतय लेख, प्रतिसादा मागूनी धाव
जल्मापासून सारी माणसं ह्या रोगाची गुलाम रे

कुनी टुकार कौलेबाज कुनी कुनी टंके पांचट फुटका
चांडाळ चौकडी जमवी कुनी रमवी जिव दो घटका
शंभर अकडा नक्की ठरला, सोडला त्यानं लगाम रे

ह्या वाव्वा बाडिस पाई, कुनी भंपक लावी जीव
कुनी खरडी निरोप धाडी, कुनी बदलून टाकी नाव
बगलंमंदी सुरी दुधारी, मुखी मैत्रीचं नाम रे

अचरटावानी लेखनी, धाग्याच्या गळ्याला फास
टंकल्यालं लगीच उडवितं. लेखाच होतय फसं
वाचक मेलं शरमंदीनं, वाचन होई हराम रे

पानावर पुढच्या जाती, हे धागं टाकोटाक
प्रोत्साहन मंडळ निघते, पॅकेज काढल झाक
शेड्युल ठरवून प्रतिसादाच,अता करावा अराम रे

वाढेल टिआरपी आता छनछन्नुक तालावरती
पैशानं नवोदित खुस, पैशानं ज्येष्ठ बी खुलती
प्रतिसादांच्या बादशहाला, "केश्या" करतो सलाम रे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: