एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०१०

कटोरी

आमची प्रेरणा : मिपावरची अनेक बुडीत खाती , त्यांना मिळालेले उदंड प्रतिसाद आणि प्रदीप कुलकर्णींची अप्रतिम गझल "फांदी".


........................................
कटोरी
........................................

ही जरा घटना तशी आहे अघोरी!
मालकाने आपली भरली तिजोरी!

नाव खादाडी असे हे ठेवलेले...
सोबतीला टंच अन आहेत पोरी!

लोक सामोरे कसे एकेक आले...
समजता हाती अता उरली कटोरी!

बात फाट्यांची तशी ही ओळखीची...
आमचे तू बांधले बिस्तर नि बोरी!

जर तुझ्या केलेच होते धन हवाली...
का तरी केलीस लेका सांग चोरी?

वाचली कर्मे तुझी एकेक जेव्हा...
गाठली होतीस तू सगळीच गोरी!

आयडीबाहेर काढा ठेवणीतिल...
हा अता तुमचा लढा; ही बंडखोरी!

आयडी भलतेच बघ चमकून गेले
ओकले त्यांनी गरळ समजून मोरी

लोक या धाग्यास कंटाळून गेले...
"केशवा" तू बंद कर लिहिणे टपोरी

- केशवसुमार

........................................
रचनाकाल १४ मे २०१०
........................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: