एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०१०

कोणत्या शब्दात दम त्याला भरू ?

आमची प्रेरणा पुन्हा एकदा चित्त यांची अप्रतिम गझल कोणत्या चिमटीत मी त्याला धरू आणि काही खरडवह्या ;;)

कोणत्या शब्दात दम त्याला भरू ?
माजले जालात जे फुलपाखरू

तू अता बघशील वाताहत खरी
लागले पाध्ये जसे हे अवतरू

पंचही तेव्हाच खाते कापतो
लागले उधळायला जर शिंगरू

पटवती सार्‍या पुरातन ओळखी
बघ पुन्हा आले जुने माथेफिरू !

फुरफुराया लागले धागे किती !
लागले कंपू पुन्हा कल्ला करू

आठवू इतके कसे मी आयडी ?
आठवू कोणास, कोणा विस्मरू ?

---------कलम १ -----------------

खूप नक्षीदार आहे लेख हा
एकमेकांना चला वाव्वा करू

आपल्या दोघांमधे कोणी नको
ये खरड टाकू जरा व्यनी करू

हा मला पाध्ये किती छळातो इथे
सांग मी आता कशा काड्या करू ?

काव्य, चर्चा, कौल, धागे, वा फिफा
(हे करू की ते करू की ते करू)


--------------------------------------------------------------------------------

१. मराठी संकेतस्थळांवर प्रतिसादकाला एखादा धागा भरकटवायचा असेल (एक किंवा त्यापेक्षा जास्त ) तर तेव्हा त्या धाग्यावर किंवा मध्ये किंवा दोन प्रतिसादांच्या मधल्या मोकळ्या जागेत तिथे +१ हे चिन्ह ठेवून खाली निर्धास्तपणे गप्पा चालू कराव्यात, असा प्रतिसादक निर्देश करतो. मराठी विडंबनात ही पद्धत राबवायची असल्यास मला कलम हा शब्द किंवा क हे अक्षर मला प्रस्तुत वाटते. कलम ह्या शब्दाचा एक अर्थ तुकडा करणे किंवा पाडणे. आणि दुसरा अर्थ ग्राफ्टिंग असाही आहे. (ह्याबाबतीत मार्गदर्शन केल्याबद्दल मी उर्दू-फारशीचे माझे जाणकार मित्र चित्त ह्यांचा अत्यंत आभारी आहे. )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: