एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०१०

कंटकांचे मनोगत

निवेदनः कंटकांच्या कारवायांबाबत नाराजी व्यक्त करून वातावरण सुधारण्याचा प्रयत्न केल्याचे प्रायश्चित्त म्हणून काही दिवस स्वसंयमाची रजा घ्यायचे ठरवले आहे. त्यामुळे गढुळलेले वातावरण निवळेल असे वाटते.

परंतु दुसर्‍या बाजूकडून अपेक्षित असलेला संयम दिसत नाही. आणि मुद्दाम खाजवून काढल्याप्रमाणे धागा आला. (आणि तो उडाला नाही). म्हणून प्रायश्चित्त घेण्या आधी लेखन करीत घेतो. तो धागा उडाला नसल्याने हा ही उडणार नाही अशी अपेक्षा आहे.

अजून एक: विडंबन या लेखनप्रकारात माझा पहिलाच प्रयत्न नाही. तरीही यातल्या व्हेटरन्सनी सांभाळून घ्यावे ही विनंती.

कंटकांचे मनोगत


कोणती युक्ती अता मी वापरू |
शांतता लागो न येथे वावरू ||

जाहले निर्माण नव येथे जरी |
पालथे धंदे तरी अमचे सूरू ||

मूळ कारण आणिबाणी, हेच आहे |
प्रायश्चिता पूर्ण मी कैसे करू ||

ठोक हा पाध्या जरी देतो अम्हा |
काव्य पाडू सहज त्याला उत्तरू ||

मीच तो "तो साळसुद" मी सांगतो |
चांदणे चोरा मनी हो रूबरू ||

आमच्या कंपूस काही लाज नाही |
कंटकाची जात अमची "क्या करूं?" ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: