एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०१०

एका स्थळात लिहिली, जी धोरणे अनेक

केसुरंगाशेठांचे विडंबन झळकले तेव्हा आम्ही चौपाटीवर भेळ खाण्यास गेलो होतो.. तिथे काही जालकंटकांची एक टोळि ही आली होती.. त्याच्या म्होरक्या मोठमोठ्याने जे काही बडबड होता, ते तुमच्या कानावर घालावे असे वाटले म्हणून हा धागाप्रपंच..

एका स्थळात लिहिली, जी धोरणे अनेक
शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही लोक

आधी विचारलेले, अपुल्या मतास सांगा
चर्चेस लोक तुम्ही म्हणता कशास दंगा?
अन पाहुनि अम्हाला, चेकाळती अनेक
शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही लोक

पाध्यास खाज भारी, नडतो सदा अम्हासी
पंचास काय बोलू, बोलू अता कुणाशी ?
चौपाटीच्या वरी हा , दावी उगाच धाक
शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही लोक

पंचास काय ऐसे एके दिनी कळाले ?
शंका विचारणारे, फटक्यामधे उडाले !!
प्रतिसाद आणि धागे त्या चौकशा अनेक
होते खरे तरी ते टिकले इथे क्षणैक

-केशवसुमार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: