एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

या झुरळांनो परत फिरा रे, पिसीकडे अपुल्या...

या झुरळांनो परत फिरा रे, पिसीकडे अपुल्या
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या

प्रतिसादांचा येई न आता, चव्हाट्याला पूर
अशा अवेळी असू नका रे जालापासुन दूर
हळहळ करती लोक उगाच चर्चा ह्या थांबल्या

 इथे दूरच्या देशावरती, आहो आम्ही भाई
अजून आहे उजेड इकडे, दिवसहि सरला नाही
शेळ्या, मेंढ्या अन कोंबड्या , चघळूनिया झाल्या

अवतीभवती असल्यावाचुन, कोलाहल तुमचा
उरक न होतो आम्हा आमुच्या कधिही कामाचा
या मेल्यांनो, या रे लौकर, चर्चा खोळंबल्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: