एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, ६ मार्च, २००७

मराठमोळी -२

आमची प्रेरणा कुमार जावडेकरांची सुंदर गझल मराठमोळी

नकोस समजू साधी भोळी...
जरी नेसते साडी चोळी!

हसून घेते हळूच चिमटे...
मी रे मुलगी मराठमोळी!

तुझ्या मनीचे रहस्य दिसते
तुझ्याच लोचट लुबऱ्या डोळी...

नकोस छेडू पुन्हा मला तू,
बाप माझा घालेल गोळी...

फकीर आम्ही! जगास लुटण्या
आता फिरतो करून टोळी!

तुला "केशवा" जमणे नाही
जो तो येथे गोंडा घोळी!

- केशवसुमार, पुणे

1 टिप्पणी:

खोडसाळ म्हणाले...

हा हा हा!जबरदस्त!
हसून घेते हळूच चिमटे...
मी रे मुलगी मराठमोळी!

मजा आहे राव तुमची.
तुझ्या मनीचे रहस्य दिसते
तुझ्याच लोचट लुबऱ्या डोळी...

फिरायला जाताना काळा चष्मा लावा, केशवराव.