एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, २२ मार्च, २००७

त्रास -२

आमची प्रेरणा चक्रपाणि यांची गझल त्रास

जास्तीच पावट्याचे झाले उगाच खाणे,
विसरू कसा अता मी? थांबे न वास येणे.

पत्नीत मेव्हणीचा हा रोज भास होणे,
मिळताच कारणे मी मग सासरास जाणे. (पत्नीस सोडण्याला मग सासरास जाणे)

सोसायचे किती मी हे बोल बायकोचे?
(होऊन तर्र का मग भार्यालयास येणे)

झाला सराव आता नुसताच पाहण्याचा,
(मदमस्त तारकांची चित्रे उश्यास घेणे)

शिकवीन मी तुला ही भाषा मुक्या मुक्यांची,
शिकण्यास एकदा पण माझ्या घरास येणे.

तू एकदा तरी रे घे ना मिठीत सखया
मी लांबवीन माझे मजलाच त्रास देणे.

1 टिप्पणी:

Chakrapani म्हणाले...

मेहुणी आणि मदमस्त तारका चांगल्या आहेत :)