एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, १९ मार्च, २००७

अता फक्त मी हात हे चोळते ....

आमची प्रेरणा अदितीताईची कविता मनाला तुझे चांदणे माळते ....

लिहावे अता ऊर दाटून येतो
लिहावे परी "केशवा" मी कसे?
तुझी याद येता उरी घाबरे मी
कश्या काढशी सांग माझी पिसे

तुझे भास होतात, साऱ्या ठिकाणी,
अनामी भीती ही मला वाटते
तुझे बेरकी ते प्रतिसाद येता
कुठे लाज माझी इथे राहते ?

कळेनाच काही कसे मी लिहावे?
लपाया अता मी कुठे जायचे?
पुरी लावलेली इथे वाट माझी
अता मायबोली कडे जायचे?

फणा काढलेल्या नागिणीपरी मी
तुझा 'चेहरा' पाहते कोसते
तुझी सर्व ती विडंबे आठवोनी
अता फक्त मी हात हे चोळते ....

--केशवसुमार(१८ मार्च २००७)
(फाल्गुन वद्य चतुर्दशी शके १९२८)

४ टिप्पण्या:

माधव कुळकर्णी म्हणाले...

व्वा व्वा केशवा.....
जोरदार धुमधडाका !

MilindB म्हणाले...

ह्यात मनोगताने न प्रकाशित करण्यासारखे मला तरी काहीच दिसले नाही.
- मिलिंद

संजीव कुलकर्णी म्हणाले...

वा वा!
'मायबोली' आणि 'चोळण्या'चा उल्लेख यामुळे प्रशासकांच्या शेंडीचे केस जळालेले दिसताहेत!

Chakrapani म्हणाले...

वरकरणी सामान्य वाटत असले, तरी विडंबन पूर्णपणे व्यक्तिगत रोखाने गेलेले आहे, हे पाहून वाईट वाटले. कदाचित हेच मनोगतावर प्रकाशित न होण्याचे कारण असावे.