एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, २७ मार्च, २००७

शोभते ना वागणे हे फारसे

आमची प्रेरणा अदिती यांची अवघड वृत्तातली गज़लॉईड कविता शब्द माझ्या अंतरीचे आरसे

रोज मजला वाटते लाचारसे
शब्द त्याचे बोचरे फटकारसे

ही अवस्था कोणती सांगू कसे?
बोलता ही येत नाही फारसे

काल रात्रीचा तुझा पिंगा असा
शोभते ना वागणे हे फारसे

जाऊ दे ना सोड माझी पाठ ही
संपले माझे लढाऊ वारसे

आठवे ना घेतलेले नाव ही
रोज माझे चाललेले बारसे

"केशवा" झाला पुरे अचरट पणा
तू पुणेरी ही पहावे आरसे

--केशवसुमार(२७.०३.०७)
टीप : ही कविता विडंबन म्हणून खपेल का?
ह. घ्या.

२ टिप्पण्या:

आशुतोष म्हणाले...

आठवे ना घेतलेले नाव ही
रोज माझे चाललेले बारसे
वा !!! छानच !!!
पण विडंबन म्हणुन न खपणारा, हा तर खरा गझलेतला शेर वाटतोय...

चित्तरंजन भट म्हणाले...

जबरदस्त!!!!!! हहपुवा.