एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, ७ मार्च, २००७

कवितेचा चोळामोळा

आमची प्रेरणा संपदा१ यांची कविता दाद

कोणत्या नावने मी रे
आता लिहावे ना कळे
ह्या विडंब वणव्यात
काव्य कोवळे हे जळे

शब्द दाहक, बोचरे
त्यांना घाबरले मन
प्रश्न सतावतो पुन्हा
कसे करावे लेखन

कसे आवरावे त्याला
द्या हो कुणी त्याला मार
आग ओकतो येव्हढी
लाज काढतो हा पार

सांग "केशवा" रे तुला
कसा येईना कंटाळा
थंड रक्ताने करीतो
कवितेचा चोळामोळा

केशवसुमार

1 टिप्पणी:

खोडसाळ म्हणाले...

"तुम्ही मला जमीन द्या, मी तुम्हाला विडंबन देतो"
ब्लॊगचे बोधवाक्य वाचून कविजनांत अभूतपूर्व घबराट निर्माण झालेली आहे.
कसे आवरावे त्याला
द्या हो कुणी त्याला मार
आग ओकतो येव्हढी
लाज काढतो हा पार

सत्यवचन महाराज. कोण आहे रे तिकडे? जा, त्या केशवाला पकडून आणा.