एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही...



आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम रचना पाहून वादळाला झाला पसार नाही (http://www.manogat.com/node/16718)


प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही
मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?

गेले अनेक वाचक सांगून रोज मजला
पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!

कवितेत रोज लिहितो मी काहणी 'मनोहर'
वृतात खरडले पण प्रतिसाद फार नाही!

कविता करीत जातो कडवी पाहत नाही
हा मोह लेखनाचा, की रोजगार नाही ?

थकतील वाचणारे मुक्ताफळांस माझ्या
ह्या शब्द-सागराला पण अंत, पार नाही

मी का न बडबडावे प्रस्थापितांप्रमाणे?
मी शाहजोग आहे! करतो विचार? नाही!!

गझलेत "केशवा"च्या , ना गझलियत जरा ही
ह्याच्या परीस कोणी इतका सुमार नाही

धिक्कार खूप झाला, वरती निषेध सुद्धा
वृतीत, "केशवा"च्या झाला सुधार नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: