एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

विद्वान...

विद्वान
-------

निर्लज्ज "केश्या"ने
निरागस कविता ठासावी,
बेगुमानपणे, भरदिवसा,
तसले सरकारमान्य विद्वान,
कला-साहित्याच्या उज्वल छाताडावर
अपरंपार पाय रोवून.

स्वच्छ नितळ लेखनाचे दिवस
कसे असतात कुणास ठाऊक?
कुठं सापडेल नि:ष्पाप शब्दांची नदी,
अन् कसे असते कसदार कथेचं बीज,
हेही कुणास ठाऊक !

वाचकांपासून तुटलेली अन्
समिक्षकांच्या आधार पोसलेलेच
लेखक जागोजाग,
जालापासून संमेलनांपर्यंत.

कुठल्या शिवारात वस्तीला आहेत
सृजनशील प्रतिभावंत नावं?

--------------------------------------------
केशवसुमार,फ्रँकफुर्ट.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: