एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

आताशा...

बालाजीशेठची अप्रतिम कविता 'आताशा..' वाचली आणि आमची 'आताशा' जी परिस्थिती आहे ती सांगितल्या शिवाय राहावे ना ...

आताशा..
---------------------------------

तळवे
पायाचे दिसत नाहीत.
उभे, असताना.

खास
निर्लेप फायबरयुक्त,
अस्सल.

धुतलेली
कापलेली पाने,
झाडांची.

निकस आहार
कधी नसतोच आता.

थोडेसुद्धा न सुटलेलं पोट
सिक्सपॅक कमावलेलं देह,
डोळ्यात मावत नाही,
अशी, गोडगुलाबी स्वप्न,
इथं वस्तीला.

आताशा,
दरदरून घाम येतो,
अंगभर,
या जीमेतल्या
सरकत्या पट्यांवरुन
चालताना.!!

--- केशवसुमार, फ्रँकफर्ट.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: