एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

ही जात काढली...

सध्या इथे चालू असलेल्या काही चर्चा आणि स्टेटस मधील जातीवादि उल्लेख बघितले आणि मन व्यथित झालं ...कधी संपणार हे :(

ही जात काढली, ती जात काढली
का इथल्या सदस्यांनी सारी लाज सोडली?

समद्या चर्चेत, समद्या चर्चेत
कॉमेंट कॉमेंट टाकती
अन चार्चेची ते पार
वाट लावून टाकती

ह्या जालावरती, अक्कल पाजळती
अन मुक्‍त बेअबस काहि, स्टेटसात लिवती

अंगात त्यांचिया भिनल्यात जाती या
ही दलदल ह्यातून कोणी ना बाहेर आली
ही बेशर्मी, मनमानी, घाई कुतास आली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: